RTE Admission 1KM Rule: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी राज्य सरकारने लादलेली 1 किलोमीटरची जाचक अट (RTE Admission 1KM Rule) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगित केली आहे. सरकारच्या या मनमानी निर्णयामुळे हजारो विद्यार्थी RTE Online Admission Process मधूनबाहेर फेकले जाण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, न्यायालयाने दिलेल्या या दिलासादायक निर्णयामुळे गरीब आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग पुन्हा मोकळा झाला आहे. न्यायलयात काय घडले याविषयी माहिती खाली दिली आहे. RTE फॉर्म बाबत पूर्ण माहिती
RTE Admission 1KM Rule: आरटीई एक किमीची अट रद्द; नोंदणीचा आजचा शेवटचा दिवस
RTE Online form 2026-27 link
RTE Admission 2024-25 Registration Link क्लिक करा
RTE Admission 2026 -27 Registration Link for Parent Student क्लिक करा
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login
RTE Admission 1KM Rule
महाराष्ट्र शासनाने 12 फेब्रुवारी 2026 रोजी एक नवीन शासन निर्णय (जीआर) काढून आरटीई प्रवेशासाठी नवीन नियम लागू केले होते. यानुसार, विद्यार्थ्याच्या घरापासून 1 किलोमीटरच्या परिघात असलेल्या शाळेतच प्रवेश घेता येईल आणि केवळ 10 शाळांची निवड करता येईल, अशी सक्ती करण्यात आली होती.
RTE Admission बाबत काय घडले?
चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील शंकर आत्राम यांचे उदाहरण न्यायालयात मांडण्यात आले. त्यांच्या घरापासून एक किमी अंतरात एकही पात्र शाळा नव्हती, त्यामुळे त्यांना अर्जच करता येत नव्हता. अॅड. बोधी रामटेके आणि अॅड. दीपक चटप यांनी युक्तिवाद केला की, ही अट आरटीई कायद्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासणारी असून, संविधानाने दिलेल्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करणारी आहे.
RTE Admission 1KM Rule बेकायदा
या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागपूर खंडपीठाने सोमवारच्या सुनावणीदरम्यान आरटीईच्या या नवीन नियमांना स्थगिती दिली. ज्येष्ठ अधिवक्ता जयना कोठारी, अॅड. बोधी रामटेके, अॅड. दीपक चटप आणि अॅड. दीपांकर कांबळे यांनी न्यायालयात बाजू मांडली. आरटीई कायद्याच्या कलम 12 (1) (सी) नुसार किलोमीटर संदर्भात अशी कोणतीही अट नसताना सरकारने ती लादणे बेकायदेशीर आणि मनमानी असल्याचे न्यायालयाने मान्य केले.
आरटीईचा मूळ उद्देशच वंचित मुलांना दर्जेदार शिक्षण देणे हा आहे. एक किमीची सक्तीही ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील मुलांसाठी अन्यायकारक होती. न्यायालयाने ती स्थगित केल्यामुळे आता खऱ्या अर्थाने शिक्षणाचा अधिकार सर्वांना मिळेल.
अॅड. दीपक चटप, चंद्रपूर
नोंदणीचा आजचा शेवटचा दिवस
शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत राखीव असलेल्या 25टक्के जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रियेचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत आरटीईअंतर्गत 1लाख 90 हजारच्या जवळपास अर्ज आले आहेत. परंतु, अद्यापही अनेक पालक अर्ज भरत असल्यामुळे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी विविध पालक संघटनांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, यंदा राज्यातील 8 हजार 694 शाळांमध्ये एकूण 1 लाख 14 हजार 489 जागा आरटीईअंतर्गत उपलब्ध आहेत. या जागांसाठी 17 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली.
