RTE Admission 2024-25 | आरटीई 25% मोफत प्रवेश संपूर्ण माहिती पहा; सर्व शंकाची उत्तरे

RTE Admission 2024-25 राज्यामध्ये बालकांच्या सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम RTE Act 2009 ची प्रभावी अंमलबजावणी होत असलेली दिसून येते. दरवर्षी RTE 25% Online Admission साठी राज्यातील स्वयंअर्थसहाय्यीत शाळा, खाजगी विना अनुदानित व खाजगी कायम विनाअनुदानित  शाळांमध्ये ऑनलाइन लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांना इयत्ता पहिल्या वर्गापर्यंत मोफत प्रवेश दिला जातो. या  RTE Admission 2024-25 बाबत पालकांच्या अनेक शंका असू शकतात म्हणून याठिकाणी पालकांच्या मनातील शंका दूर होण्यासाठी माहिती दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

RTE Admission 2024-25

 

RTE Admission 2024-25 | आरटीई 25% मोफत प्रवेश संपूर्ण माहिती; सर्व शंकाची उत्तरे

वंचित घटकातील सर्वच बालकांना दर्जेदार शालेय शिक्षण मिळावे या मूळ हेतूने RTE Admission 2024-25 राबविली जाणार आहे. अर्धवट माहितीमुळे व इतर वेगवेगळ्या कारणामुळे पालक व विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत म्हणून खालील संपूर्ण माहिती वाचावी.

RTE Admission 2024-25 साठी कोणती बालके पात्र आहेत ?

आर्थिक दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपयेएक लाखापर्यंत आहे अशा पालकांची बालके, वंचित गटांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके पात्र आहेत.

वंचित गटामध्ये आणि दुर्बल गटामध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो?

वंचित गटामध्ये :– अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व दिव्यांग बालकांव्यतिरिक्त वि.जा.(अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागासवर्ग (SBC), एच. आय. व्ही. बाधित/एच. आय. व्ही. प्रभावित बालके ,कोव्हीड प्रभावित बालके (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले), अनाथ बालके यांचा समावेश होतो..

दुर्बल गटामध्येः- ज्या बालकांच्या पालकांचे / ज्या बालकांचे पालन पोषण करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न 01 लाखाच्या आत आहे अशा बालकांचा सामावेश आहे. SEBC प्रवर्गाच्या बालकांना आर्थिक दुर्बल (01 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ) गटामधून प्रवेश अर्ज भरता येईल.

RTE Admission 2024-25 साठी कोणत्या शाळा पात्र आहेत ? (माध्यम व बोर्ड)

सर्व माध्यमाच्या, सर्व बोर्डाच्या (राज्यमंडळ, सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई.व आय.बी.सह) विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा जेथे वर्ग 1ली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहे. (मदरसा, मक्तब, धार्मिक पाठशाळा, अल्पसंख्यांक शाळा वगळून)

RTE Admission 2024-25 साठी पालकांना अर्ज केव्हा करता येईल?

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी ठरवून दिलेल्या कालावधी मध्येच अर्ज करता येईल.

पालकांना सन 2024-25 या वर्षात ऑनलाईन अर्ज किती वेळा भरता येईल?

पालकांना सन 2024-25 या वर्षात प्रवेशासाठी फक्त एकदाच अर्ज भरता येणार आहे.

RTE Admission 2024-25अर्ज कोठून भरावा लागेल?

पालकांना आरटीई प्रवेशासाठी मदत केंद्रांवर किंवा जेथे इंटरनेट सुविधा, संगणक, प्रिंटर इ. उपलब्ध असेल तेथून भरावा.

RTE Admission 2024-25 अर्ज भरताना कोणती कागदपत्रे अपलोड करावीत ?

अर्ज भरताना कोणतेही कागदपत्रे अपलोड करायची नाहीत. मात्र ऑनलाईन अर्ज भरताना पुढील कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे.

  1. रहिवासी पुरावा
  2. जन्मतारखेचा पुरावा
  3. बालक वंचित घटकातील असल्यास जातीचे प्रमाण पत्र.
  4. आर्थिक दुर्बल संवर्गातून प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाच्या दाखल्याकरिता पगाराचा दाखला (salary slip), कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल.
  5. बालकाला लॉटरी लागल्यास शाळा प्रवेशाच्या वेळेस सर्व आवश्यक कागद पत्रे, असणे आवश्यक आहे अन्यथा मिळालेला प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

RTE ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची वेब-साईट कोणती आहे?

प्रवेशाचा अर्ज https://student.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर (वेब-साईटवर) ऑनलाईन भरावयाचा आहे.

RTE Admission 2024-25 साठी अर्जाला किती शुल्क आहे?

शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अर्ज मोफत स्वरुपात संकेत स्थळावर (वेबसाईटवर) उपलबध असून अर्ज वरील संकेत स्थळावर (वेब साईटवर ) जावून भरावयाचा आहे.

पालक किती शाळा व कोणत्या माध्यमासाठी अर्ज करू शकतात?

ऑनलाईन माहिती भरताना पालकांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रापासून 01 कि.मी. व 03 कि.मी. आणि अधिक अंतरापर्यंतच्या उपलब्ध असणाऱ्या शाळांपैकी जास्तीत जास्त कोणत्याही 10 शाळांचे पर्याय निवडता येतील. तसेच उपलब्ध सर्व माध्यमातून शाळेचे माध्यम निवडण्याचे स्वातंत्र्य पालकांना राहील.

RTE Admission 2024-25 साठी शाळेपासून किती कि.मी. अंतरातील रहिवासी अर्ज करू शकतात?

निवास स्थानापासून 01 कि.मी. व 03 कि.मी. अथवा अधिक अंतरावरील सर्व शाळांचा समावेश करता येईल मात्र शाळेपासून 01 कि.मी. परिसरातील अर्जदारांना नियमाने प्राधान्य मिळेल. 01 कि.मी. परिसरातील पुरेशा क्षमतेइतकी बालके उपलब्ध न झाल्यास 03 कि.मी. आणि त्या पेक्षा अधिक अंतराच्या परिसरातील बालके संबधित शाळेत प्रवेशास पात्र होतील. मात्र ३ कि.मी पेक्षा अधिक अंतराच्या शाळेकरिता लॉटरी लागली तर त्या वेळेस विद्यार्थ्याच्या वाहतुकीचा खर्च संबधित पालकास करावा लागेल.

ऑनलाईन अर्ज केला म्हणजे RTE मध्ये खात्रीशीर प्रवेश मिळेलच का?

शाळेच्या आरंभीच्या वर्गाच्या 25% प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत/लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जातील. अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जदाराच्या पाल्याला प्रवेश मिळेलच असे नाही.

RTE Admission 2024-25 साठी दिव्यांग बालकाच्या प्रवेशाचे निकष व आवश्यक कागदपत्रे कोणती?

सर्व जाती धर्मातील दिव्यांग बालके प्रवेशास पात्र. दिव्यांग असल्याचे प्रमाण पत्र 40% किंवा 40% पेक्षा अधिक असल्याबाबतचे जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांचे प्रमाणपत्र, जन्माचादाखला, रहिवासीपुरावा (आधारकार्ड/पासपोर्ट/मतदार ओळखपत्र/वीजबिल टेलिफोनबिल/पाणी पट्टी/घर पट्टी/वाहनचालविण्याचा परवाना, भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनाम्याची प्रत, यापैकी कोणतेही एक)

घटस्फोटीत महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

  1. न्यायालयाचा निर्णय.
  2. घटस्फोटित महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा.
  3. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील.

न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रेकोणती?

  1. घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा.
  2. घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा.
  3. बालक वंचित गटातील असल्यासबालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. इत्यादी कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील.

विधवा महिलेच्या बालकांसाठी आवश्यक कागद पत्रे कोणती?

  1. पतीचे मृत्यूपत्र.
  2. विधवा महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा.
  3. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. इत्यादी कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील.

अनाथ बालकांसाठी (वंचित घटक) आवश्यक कागद पत्रे कोणती?

  1. अनाथ बालकांच्या (वंचित घटक) बाबतीत अनाथालयाची / बालसुधार गृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील.
  2. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील.
  3. पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना single parent पर्याय निवडला असेल तर संबधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागद पत्रे ग्राह्य धरण्यात येतील.
  4. अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदा. वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही.

खुला प्रवर्ग, अल्पसंख्यांक, यांना प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत.

  1. जन्मतारखेचा पुरावा,
  2. रहिवासी पुरावा
  3. वार्षिक उत्पन्न रु. एक लाखापेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा दाखला.

RTE Admission 2024-25 प्रवेशा करिता उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे?

पालकांचा आर्थिक वर्ष 2022-2023 किंवा 2023-24 या वर्षाचा एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला असावा.

गुगलच्या नकाशात रहिवासाचे (घराचे) स्थान निश्चित करताना कोणती काळजी घ्यावी?

पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावयाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी रेड बलूनद्वारे निवास स्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरीता तो बलून जास्तीत जास्त 5 वेळाच निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी. त्यामुळे पालकांनी निवास स्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे. एकदा अर्ज कन्फर्म केल्यावर पुन्हा लोकेशन बदलता येणार नाही. अर्ज कन्फर्म करण्यापूर्वी तो पुन्हा तपासावा.

RTE Admission 2024-25 प्रवेशाची कार्यपद्धती कशी असेल?

शाळेच्या प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत/लॉटरी काढून प्रवेश निश्चित केले जातील व शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यास, प्राप्त झालेल्या अर्जापैकी सर्व पात्र अर्जदारांचा प्रवेशासाठी विचार केला जाईल.

शाळा निवडताना कोणती काळजी घ्यावी?

शाळा निवडताना आपल्या रहिवासाचे ठिकाण आणि शाळा यातील हवाई अंतर (Aerial Distance) प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याने रस्त्याने शाळा व घर यातील प्रत्यक्ष अंतरात फरक पडू शकतो त्यामुळे शाळा निवडताना दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे.

RTE Admission 2024-25 ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर पुढील कार्यवाही पालकांना कशी कळणार?

याबाबत पालकांना अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एस.एम.एस. (SMS) द्वारे सूचित केले जाईल. त्यामुळे अर्जात दिलेला मोबाईल क्रमांक अर्जदारांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतसुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. परंतु पालकांनी फक्त एस.एम.एस (SMS) वर अवलंबून राहू नये.आर.टी.ई. पोर्टल वर Application wise details या tab वर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पहावी.

लॉटरीद्वारे प्रवेश मिळाल्याचे अर्जदारास कसे कळेल?

सोडत/लॉटरी झाल्यानंतर याबाबत पालकांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एस.एम.एस.द्वारे सूचित केले जाईल. परंतु पालकांनी फक्त एस.एम.एस (SMS) वर अवलंबून राहू नये. आर.टी.ई. पोर्टल वर Application wise details या tab वर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पहावी.

प्रवेशासाठी निवड झाल्यानंतर प्रवेश कसा घ्यावा?

प्रवेशासाठी निवड झाली आहे असा SMS प्राप्त झाल्यानंतर rte पोर्टल वरील Application wise details या tab वर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पहावी लॉटरी लागली असेल तर अॅलोटमेंटलेटर ची प्रिंट काढावी आणि हमीपत्र या tabवर क्लिक करून त्याची प्रिंटकाढावी. अॅलोटमेंटलेटर वर आपल्या विभागात पडताळणी समितीचा पत्ता (address) दिलेला असेल त्या ठिकाणी अॅलोटमेंटलेटर, हमी पत्राची प्रिंट आणि अॅलोटमेंटलेटर वर दिलेली आवश्यक कागदपत्रे घेऊन जावे आणि आपला प्रवेश निश्चित झाल्याची प्रिंट पडताळणी सामितीकडून घ्यावी. SMS मध्ये दिलेल्या तारखेला पालक प्रवेशाकरिता आले नाहीत तर त्यांना पुन्हा दोन संधी (SMSद्वारे ) देण्यात येतील तरीही निवड झालेल्या बालकाने विहित मुदतीत पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश निश्चित न केल्यास ती जागा रिक्त राहील आणि त्या जागेवर लॉटरी द्वारा निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यास अनुक्रमे संधी मिळेल.

error: कॉपी करताय???