10वी झाली आता पुढे काय? | इथे वाचा After tenth which course is best

After tenth which course is best आज प्रत्येक पालक आणि दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यासमोर या विषयी महत्वाचा प्रश्न उभा असलेला दिसून येतो. तो म्हणजे दहावीनंतर पुढे काय? कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील हे एक नाजूक वळण असलेले काळ आहे. आपण इथे घेतलेला निर्णय चुकू नये. यासाठी वेगवेळ्या अंगाने पालक व विद्यार्थी विचार करत असतात. म्हणून या महत्वाच्या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत.
After tenth which course is best

10वी झाली. आता पुढे काय?| इथे वाचा After tenth which course is best

मित्रहो, नुकत्याच दहावीच्या परीक्षा पूर्ण झाले आहेत. आजच्या या माहितीमधून तुम्हाला तुमच्या समोर दहावी नंतर कोण कोणते ऑप्शन आहेत, कोण कोणत्या क्षेत्रात आपण प्रगती करू शकतो, कोणत्या क्षेत्रातील शिक्षणाच्या वाटचालीमुळे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात याविषयी अचूक निर्णय घेता येईल. After tenth which course is best हा लेख पूर्ण वाचा. त्यामुळे नक्कीच तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्याची उकल होईल आणि नव्याने आलेले प्रश्न खाली लिहू शकता 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो सर्वात पहिला प्रश्न म्हणजे करिअर कसे निवडले पाहिजे? यातच जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या चुका करतात. तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच स्वप्न पाहिलेले असते की मी मोठा झाल्यावर डॉक्टर बनणार, इंजिनियर बनणार, पोलीस बनणार इत्यादी कोणताही विचार न करता ते डायरेक्ट या क्षेत्रामध्ये प्रवेश घेतात.

After tenth which course is best करिअर कसे निवडले पाहिजे? 

प्रत्यक्ष प्रवेश घेण्यामध्ये काहीच समस्या नाही पण एक गोष्ट तुम्ही विचार करा तुम्ही लहान होते तेव्हा तुम्हाला या परिक्षेत्र माहिती होते का? अनेकदा एखाद्या क्षेत्राविषयी काहीच माहिती नसते आणि आपण जास्त विचार  न करता फक्त ठरवून टाकतो की मला डॉक्टर बनायचं, मला इंजिनीअर बनायचं, मला पोलीस बनायचे, बस एवढंच माहिती होतं. परंतु तुम्हाला त्याबद्दल जास्त माहितीच न घेता डायरेक्टली त्या क्षेत्रामध्ये ऍडमिशन न घेता त्याविषयी थोडासा विचार केला पाहिजे.

आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे माझा दादा, माझा भाऊ, माझा काका,  माझा मामा, माझा कुणी एक नातेवाईक इंजिनियर झाला की लगेच बघ इंजिनियरला पगार जास्त आहे म्हणून मी पण इंजिनीअरिंग करणार. असेच वेगवेगळ्या पेशाबद्दल ठरवले जाते. परंतु हे सर्व गैरसमज आहेत.

तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे माझा बेस्ट फ्रेंड हे करतो म्हणून मी सुद्धा हेच करणार. ही सर्वात मोठी चूक असते आणि जास्तीत जास्त विद्यार्थी ही चूक करतात. आपण सर्वजण मस्तपैकी सोबत ऍडमिशन घेऊ. तू जे करेल तेच मी करेल. त्यातही मैत्री पुढे येते. अनेकजण म्हणतात कि ये दोस्ती हम नही तोडेंगे. परंतु मित्रहो,  दहावीनंतर प्रत्येक जणांना हे लक्षात घेतले पाहिजे की, दहावी नंतरचे एक एक पाउल ही करिअरची एक वाटचाल आहे.

after tenth which course is best करिअर घडत असताना, आपले व्यक्तिमत्व घडत असताना, कष्ट करावे लागतात, निर्णय घ्यावे लागतात, चांगल्या वाईट गोष्टी आपल्यालाच सहन करावे लागतात आणि यशाची गोड फळे सुद्धा आपल्याला चाखावे लागतात. आता आपण बघणार आहोत  ते म्हणजे ज्यांना कोणाला अमाप पैसा पाहिजे असतो त्यांनी बिझनेस करावा आणि बिजनेस क्षेत्राकडे वळावे. ज्यांना कुणाला  मान सन्मान प्रतिष्ठा पाहिजे असते टेक्निकल इंजीनियरिंग करावं, एम पी एस सी, यु पी एस सी क्षेत्राकडे वळावे.  म्हणजेच आपले काही ध्येय निश्चित असले पाहिजे. ध्येय निश्चित असले म्हणजे यश आपल्याला प्रत्यक्ष दिसू लागते. यशाकडे जाताना मनाची पूर्ण तयारी झालेली असते. 

असे म्हणतात की प्रत्येकाकडे  विशिष्ट अशी एक कला असते.  आणि ते त्या कलेमध्ये सर्वांपेक्षा श्रेष्ठ असतो. त्याला ती  कला सर्वात जास्त चांगली जमते. परंतु आपलं दुर्दैव म्हणजे हीच गोष्ट प्रत्येकाला माहिती नसते. आपल्या मध्ये कोण कोणते टॅलेंट आहे हेच आपल्याला माहिती नसते. जर समजा तुम्हाला विचारले की, मला सांग की तुमच्या एखाद्या मित्रामधील कोणतेही पाच चांगल्या गोष्टी सांगा. तेव्हा तुम्ही तुमच्या मित्रामधील अनेक चांगल्या गोष्टी फाडफाड सांगून देता. पण तुम्हाला विचारलं कि तुमच्यामधील कोणत्याही पाच गोष्टी सांगा त्या  सांगण्यासाठी तुम्ही विचार करायला लागता. माझ्यामध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत? याचाच अर्थ म्हणजे तुम्हाला अजून कळलेलं नाही की आपल्या मध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी आणि कोणत्या वाईट गोष्टी आहेत हेच आपल्याला माहित नाही.

दहावीनंतर पुढे काय? after tenth which course is best

प्रथम आपण स्वत:कडे एकदा पहायला पाहिजे की आपल्याकडे कोणती उपजत देन आहे? आपल्यामध्ये कोणते गुण आहेत? कोणती कला आहे? आपली आवड कशात आहे?  हे लक्षात घेतल्यास करियरची निवड व पुढील वर्गात प्रवेश घेताना सोपे जाते.

after tenth which course is best

after tenth which course is best सर्व कोर्सची माहिती एकाच ठिकाणी

आता आपण बघुया करियर निवडताना काही पायऱ्या लक्षात घ्यावे लागतात. त्यामध्ये सर्वात पहिली पायरी म्हणजे आपली आवड, दुसरी म्हणजे  आपल्यातील कौशल्य (टॅलेंट), तिसरी म्हणजे निवड / प्राधान्य ठरविणे आणि चौथी म्हणजे ध्येय निश्चित करणे. या बाबीवर अधिक लक्ष केंद्रित केल्यास भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पश्चात्ताप होणार नाही. तसेच या वरील बाबीचा विचार करून घेतलेला निर्णय शक्यतो चुकीचे होणार नाही.

  • दहावीनंतरच्या शैक्षणिक वाटा 
  1. अकरावी – बारावी प्रवेश 
  2. डिप्लोमा पॉलिटेक्निक कोर्सेस 
  3. पॅरामेडिकल कोर्सेस 
  4. आयटीआय कोर्सेस
  5. कमी कालावधीचे सर्टिफिकेट कोर्स 
  6. इतर कौशल्याधारित कोर्सेस 

आता आपण एक एका कोर्स विषयी सविस्तर माहिती घेऊया What is Next After 10th

RTE Online Admission 2024-25

RTE प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

RTE मोफत प्रवेश संपूर्ण माहिती

 

अकरावी – बारावी प्रवेश 

पारंपारिक पद्धतीने सर्वप्रथम जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा कल हा अकरावी  बारावी प्रवेशाकडे असतो. आज तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा कल असा आहे की जर समजा गुणांची टक्केवारी जास्त मिळाली तर ते सायन्स या शाखेकडे वळतात. गुणांची टक्केवारी समजा मध्यम असेल तर ते कॉमर्स कडे वळतात आणि शक्यतो गुणांची टक्केवारी एकदम कमी अथवा काठावर पास झालेले विद्यार्थी किंवा अगदीच थोडीफार मार्क्स मिळून उतीर्ण झालेले असतात असे विद्यार्थी कला शाखेकडे जातात. यास काही अपवाद असू शकते परंतु ही सर्वात चुकीची गोष्ट आहे. प्राप्त गुण तसेच आपल्या निश्चित केलेल्या ध्येयानुसार व आपल्या त्या विषयातील आवडीनुसार आपण कोणताही क्षेत्र निवडून त्यात यश संपादन करू शकतो.

डिप्लोमा पॉलिटेक्निक कोर्सेस after tenth which course is best

दहावीनंतर पुढे आपण डिप्लोमा इन इंजीनियरिंग म्हणजेच पॉलिटेक्निक पदविका हे तीन वर्षांमध्ये डिग्री मिळवायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी या पॉलिटेक्निक डिप्लोमाला प्रवेश घेऊ शकतात.

पॉलिटेक्निक डिप्लोमामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ब्रांचेस आहे. त्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, बजेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चरल इंजीनियरिंग, इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, मरीन इंजीनियरिंग, यासारखे अनेक इंजिनियरिंगचे डिप्लोमा  कोर्सेस आहेत. त्या आपण आपले करिअर घडवू शकता.

What is Next After tenth पॅरामेडिकल कोर्सेस

दहावीनंतर पुढे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पॅरामेडिकल कोर्सेस मध्ये प्रवेश घेऊन सेवा करू शकतो. त्यामध्ये  डिप्लोमा इन डेन्टल मेकॅनिक्स,  DMLT, DHFM, DOA, DOT, हेंल्थ इन्स्पेक्टर, सनीटरी इन्स्पेक्टर यासारख्या पॅरामेडिकल कोर्सेसला प्रवेश घेऊ शकतो याशिवाय डिप्लोमा इन रुरल हेल्थ केअर सेंटर, डिप्लोमा इन नर्सिंग असिस्टंट, सर्टिफिकेट ऑफ नर्सिंग असिस्टंट, टेक्निशियन डिप्लोमा इन हॉस्पिटल असिस्टंट, डिप्लोमा पॅरामेडिकल नर्सिंग या प्रकारची कोर्स पॅरामेडिकल कोर्सेस कोर्सेसमध्ये घेता येईल. यात तुमचा इन्कम  सुद्धा जनरेट होऊन जाईल. यापैकी कोणत्याही एका कोर्समध्ये तुम्ही तुमचे भविष्य घडवू शकता

आयटीआय कोर्सेस 

दहावी नंतर वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती म्हणजेच शिक्षणाचे मार्ग आपण पाहत आहोत. यानंतर आपण बघणार आहोत आयटीआयच्या कोर्सेस विषयी. अनेकांना असे वाटते की दोन वर्षात आपण शिक्षण पूर्ण करून सेटल व्हावे. दोन वर्षात लवकरात लवकर एक छोटीशी डिग्री मिळवून दिली तर बरं होईल. लवकरात लवकर आपला जॉब लागला पाहिजे. असे ज्यांना वाटत असेल ते विद्यार्थी आयटीआयकडे वळू शकतात. आयटीआय मध्ये काही कोर्स हे एक वर्षाची असतात तर काही दोन वर्षाचा आयटीआय असतो. विशेष म्हणजे त्यामध्ये वेगवेगळे भरपूर काही कोर्सेस आहेत. त्यापैकी आपल्या आवडीनुसार आपल्याला निवडता येतात. after tenth which course is best”

आयटीआयमध्ये फिटर, इलेक्ट्रिशन, प्लंबर, वेल्डर, काम्पुटर मेकॅनिक्स, मशीन टूल्स,  ड्रेस मेकिंग, मॅनिफॅक्चर इन इंजिनीअरिंग, डीजेल मेकॅनिक्स, मोटार मेकॅनिक्स, मरीन मेकॅनिक्स, सर्वेअर यासारखे अनेक कोर्स कम्प्लीट करू शकतात आणि लवकरात लवकर तुम्ही जॉब मिळू शकतात. कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही कंपनीत ऑपरेटर सारखे जॉब मिळवू शकता.  त्यानंतर स्वतः सुद्धा  स्वतःचा व्यवसाय टाकू शकता. गव्हर्मेंट जॉब करण्याची इच्छा असलेले विद्यार्थी हे सुद्धा स्पर्धा परीक्षा देऊन जॉब करू शकतात. त्याचबरोबर  विद्यार्थ्यांना रेल्वे फॅक्टरी, खाजगी कंपन्या मधून वेगवेगळ्या भरपूर मोठ्या प्रमाणात संधी मिळू शकते.

Short term Certificate Courses After tenth

दहावीनंतर एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्षाच्या कोर्स बरोबरच काही कमी कालावधीचे सर्टिफिकेट कोर्स (Short term Certificate Course) असतात. ही कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण जॉब मिळवू शकतो किंवा स्वतः सुद्धा  स्वतःचा व्यवसाय टाकू शकतो. हि कोणती कोर्स आहेत याविषयी  आता आपण बघणार आहोत.

ही वेगवेगळी काही कमी कालावधीचे सर्टिफिकेट कोर्स (Short term Certificate Cours) म्हणजे  यांचा कालावधी सहा महिन्याची / एक वर्षाचे असे असतात. त्यामध्ये आपल्याला  डीटीपी, सायबर सिक्युरिटी, डिझायनिंग ॲनिमेशन, इव्हेंट मॅनेजमेंट, ग्राफिक डिझाईन, सोशल मीडिया मार्केटिंग, या सारख्या कोर्सेसचा समावेश होतो.

इतर कौशल्याधारित कोर्सेस

विद्यार्थी मित्रांनो, दहावी नंतरच्या वेगवेगळ्या शिक्षणाच्या वाटा पाहत असताना काही कोर्सेस हे कौशल्याधारित कोर्सेस आहेत. ते आपण पूर्ण करून स्वःताच्या पायावर उभे राहू शकतो.

यामध्ये ब्युटी आणि कॉस्मेटोलॉजी, ज्वेलरी डिजाईन, फैशन डिजाईन, फोटोग्राफी यासारख्या कौशल्याधारित कोर्सेस चा समावेश होतो.

तर विद्यार्थी मित्रांनो दहावी नंतरच्या शिक्षण व व्यवसायासाठी आपले क्षेत्र व्यवस्थित निवडायचे आहे. हे निवडताना या माहितीचा नक्कीच उपयोग होईल. यात शंका नाही. अधिक माहिती साठी आपण गुगल वर आणखी माहिती शोधु शकता. ही माहिती आपणास कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.

Leave a Comment

error: कॉपी करताय???