RTE Online Form 2024-25 | जाणून घ्या; आरटीई प्रवेशाचे फॉर्म कधीपासून सुरु होणार?

RTE Online Form 2024-25 प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्यातील नामांकित स्वयंअर्थसहाय्यीत शाळा, खाजगी विना अनुदानित शाळा व खाजगी कायम विनाअनुदानित शाळामध्ये RTE 25%  अंतर्गत Admission  दिले जाते. मोफत प्रवेशाची प्रक्रिया विविध टप्प्यामधून जात असते. लवकरच पालकांना विद्यार्थ्यांचे RTE Online Application भरण्यासाठी Maharashtra RTE Portal खुले केले जाणार आहे. सद्यस्थितीत पात्र शाळांच्या नोंदणी व माहिती भरण्याची प्रक्रिया चालू आहे.मोफत प्रवेशाची ही  RTE Admission Process कशा  प्रकारची असते आणि पालकांना फॉर्म कधी भरता येतील याविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.

RTE Online Form 2024-25
RTE Online Form 2024-25

 

RTE Online Form 2024-25 |जाणून घ्या; आरटीई प्रवेशाचे फॉर्म कधीपासून सुरु होणार?

RTE 25% Free Admission साठी खालील मुख्य तीन टप्प्यात प्रक्रिया पूर्ण केली जाते.

 1. भाग – पहिला : शाळा माहिती
 2. भाग – दुसरा : विद्यार्थीस्तर
 3. भाग – तिसरा : लॉटरी प्रक्रिया

भाग – पहिला : शाळा माहिती भरणे

RTE Online Form 2024-25 लवकरच सुरु होणार असून त्यासाठी प्रथम पात्र असलेल्या स्वयंअर्थसहाय्यीत शाळा, खाजगी विना अनुदानित शाळा व खाजगी कायम विनाअनुदानित शाळांकडून ही तयारी केली जाते. यामध्ये शाळांनी खालील तपशील भरावयाचा असतो. ज्यामध्ये खालील माहिती भरल्यानंतर पालक विद्यार्थीना RTE Online Form 2024-25 साठी ऑनलाइन शाळा निवडीसाठी शाळा उपलब्ध करून देण्यासाठी क्लस्टर/यूआरसी प्रमुखाची मान्यता घ्यावी लागते. या माहितीमध्ये खालील मुख्य बाबींचा समावेश

 • शाळेतील संपर्क
 • प्रवेशासाठी वैध वयोमर्यादा
 • एकूण संख्याबळ, (30 सप्टेंबर 2014) RTE 25% आरक्षणासाठी प्रवेश आणि रिक्त पदे
 • Google नकाशावर शाळेचे अचूक स्थान

भाग – दुसरा : विद्यार्थी फॉर्म भरणे

पहिला टप्पा पार झाल्यानंतर RTE Online Form या टप्प्यावर खालील प्रमाणे बाबींचा समाविष्ट आहेत.
RTE 25%Online portal वर तुमचा अर्ज भरणे. अर्ज क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर कळवला जातो.

 • प्रवेशपात्र मुलाची माहिती, पालकांची भरणे. (आवश्यक कागदपत्रे पहा)
 • विद्यार्थी /पालकांनी घरापासून 1 किमी आणि 1-3 किमीच्या आत शाळांची यादी करण्यासाठी पत्ता अचूकपण शोधून भरणे.
 • आवश्यक निकषावर आधारित माहिती निवडणे.
 • आवश्यक कागदपत्रे RTE Online Portal वर अपलोड करा.
 • अर्जाची माहिती तपासून माहितीची खात्री करणे.
 • त्यानंतर, प्रदान केलेल्या मदत डेस्कसाठी आवश्यक कागदपत्रांसह मुद्रित अर्ज घ्या.

भाग – तिसरा : RTE 25% प्रवेश लॉटरी

RTE Online Form चे पहिले दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर हा तिसरा आणि शेवटचा टप्पा येतो. यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो.

 • ज्या शाळांमध्ये जास्त जागा रिक्त आहेत आणि अर्जांची संख्या कमी आहे त्या सर्व अर्जदारांना जागा वाटप करतील.
 • ज्या शाळांमध्ये जागा कमी असतील त्या लॉटरी पद्धतीचा वापर करतील.
 • राज्य शासन यांच्यामार्फत सोडत काढली जाईल
 • निवड यादी RTE Portal वर प्रसिद्ध केली जाईल.
 • यादी पालकांसाठी ऍप्लिकेशन लॉगिन अंतर्गत उपलब्ध करून दिली जाईल. प्रवेशपत्र प्रिंट जाऊ शकते.
 • आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर पालकांनी संपर्क साधल्यानुसार शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश देतील.

8 thoughts on “RTE Online Form 2024-25 | जाणून घ्या; आरटीई प्रवेशाचे फॉर्म कधीपासून सुरु होणार?”

Leave a Comment

error: कॉपी करताय???