RTE Age Limit 2025-26: आरटीई मोफत प्रवेशाची प्रक्रिया आता गती घेतली आहे परंतु अनेक पालकांनाआरटीई मोफत प्रवेशासाठी बालकांच्या वयाची अट किती असते याविषयी अद्याप शंका दूर झाली नाही. त्यामुळे याठिकाणी RTE Age Limit 2025-26 देण्यात आली आहे. सविस्तर माहिती आणि कागदपत्र खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

RTE Age Limit 2025-26 : आरटीई मोफत प्रवेशासाठी बालकांच्या वयाची अट इथे पहा
RTE Age Limit 2025-26 : आरटीई मोफत प्रवेशासाठी बालकांच्या वयाची अट इथे पहा
आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2025-2026 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक पालकांना निवसापासून एक ते 03 किलोमीटर अंतरातील कमाल 10 शाळा निवडता येणार आहेत.
RTE Age Limit 2025-26
- वरील माहितीनुसार प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी 31 डिसेंबर रोजी किमान वय तीन वर्ष पेक्षा आधिक असावे तर इयत्ता पाहिलीसाठी किमान वय सहा वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- प्लेग्रुप / नर्सरीसाठी साधारणपणे बालकाचा जन्म सामान्यपणे दिनांक 01 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022 या दरम्यानचा असावा.
- ज्युनिअर केजीसाठी साधारणपणे बालकाचा जन्म सामान्यपणे दिनांक 01 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 या दरम्यानचा असावा.
- सिनिअर केजीसाठी साधारणपणे बालकाचा जन्म सामान्यपणे दिनांक 01 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या दरम्यानचा असावा.
- इयत्ता पहिलीसाठी साधारणपणे बालकाचा जन्म सामान्यपणे दिनांक 01 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 या दरम्यानचा असावा.
RTE Age Limit 2025-26
- दिनांक 25 जुलै 2019च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन 2025- 25 या शैक्षणिक सत्रात आरटीई 25 टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे.
- शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दि. 18/09/2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानवीन दिनांक 31 डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे. शासन निर्णयान्वये पूर्व प्राथमिक व इयत्ता 1ली मधील शाळा प्रवेशासाठीचे किमान वय वरीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे.
- शासन निर्णय दि. 25 जुलै 2029 नुसार शाळा प्रवेशासाठीचे किमान वयामध्ये जास्तीत जास्त 15 दिवसांची शिथिलता देण्यात आलेली आहे. तरी उपरोक्त प्रमाणे आरटीई 25 टक्के सन 2025-26 च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यात यावी. असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे..
RTE प्रवेश फॉर्म कसा भरावा?
पालकांनी RTE साठी ऑनलाईन फॉर्म भरावयाचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना खालील लिंकवर क्लिक करून NEW Registration वर क्लिक करायचे आहे.
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login
RTE ऑनलाइन फॉर्म भरावयाची दिनांक 14 जानेवारी 2025 पासून 27 जानेवारी 2025 पर्यन्त ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे.
FAQ वारंवार विचारली जाणारे प्रश्न
- RTE अंतर्गत मोफत प्रवेशकोणत्या वर्गासाठी दिला जातो?
इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर मोफत प्रवेश दिला जातो.
- RTE अंतर्गत इयत्ता दुसरी पासून पुढील इयत्तेत प्रवेश दिला जातो का?
नाही, RTE Act 2009 नुसार केवळ इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्गामध्ये प्रवेश दिला जातो.
- RTE अंतर्गत Free Admission साठी फॉर्म कसा भरावा?
RTE अंतर्गत free admission साठी शासनाने दिलेल्या वेळेत ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो.
- RTE ची अधिकृत वेबसाईट काय आहे?
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new
FAQ वारंवार विचारली जाणारी प्रश्न
प्रश्न – वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र (वडिलांचे/बालकाचे): उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता असते का?
उत्तर वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र (वडिलांचे/बालकाचे): उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकतानाही.
प्रश्न: जातीचा दाखला कोणत्या अधिकारी यांनी दिलेला असावा?
उत्तर तहसीलदार/ उपजिल्हाधिकारी/उपविभागीय महसूल अधिकारी याांचे प्रमाणपत्र. पालकाचा (वडिलांचा/बालकाचा) जातीचा दाखला आवश्यक. परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही.
प्रश्न : RTE मोफत प्रवेश दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळतो का?
उत्तर होय, RTE मोफत प्रवेश दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळतो. दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश वंचित घटकामध्ये केला जातो.
प्रश्न RTE Admission साठी दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाण पत्राचा पुरावा कोणता असाव?
उत्तर दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाण पत्राचा पुरावा जिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकीय अधीक्षक, अधिसुचित जिल्हा शासकीय रुग्णालय याांचे 40 टक्के आणि त्या पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
एच.आय.व्ही. बाधित / प्रभावित असल्यास प्रवेश मिळतो का कोणते पुरावे आवश्यक आहे?
होय. प्रवेश मिळतो आवश्यक कागदपत्रे: जिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र
अ) कोव्हीड प्रभावित बालक (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले) अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागद पत्रे – वंचित गटातील बालकांमध्ये कोव्हीड प्रभावित बालक (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले) प्रवर्गातील बालकांचा समावेश करण्यात आला आहे.
अ) सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबधित पालकाचे मृत्यु प्रमाणपत्र
ब) कोव्हीड 19 मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र. (Medical Certification of Cause of Death (Form No.4), (SeeRule7)) सदर मृत्यू कोव्हीड 19 शी संबधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे शासकीय/पालिका/महानगरपालिका, रुग्णालय अथवा आय.सी.एम.आर. नोंदणीकृत खाजगी रुग्णालय/प्रयोगशाळा यांचा अहवाल.
8010917116
सर पण यावर्षी नर्सरीला ऍडमिशन नाही आहे असं सांगितलं आहे,
माझ्या मुलीचा तीन वर्ष पूर्ण आहे तिचं फॉर्ममध्ये नाही होत आहे
आपण राहता त्या ठिकाणी असलेल्या शाळेत पूर्व प्राथमिक चे वर्ग नसावेत
सर नर्सरी ला जर आर टी इ ने ऍडमिशन घेतले तर पहिली मध्ये परत आरटी चा फॉर्म भरावा लागतो का
ज्या शाळेमध्ये आपण नर्सरीसाठी RTE मधून प्रवेश घेतला आहे तिथे पुढील वर्ग असल्यास पहिली मध्ये परत आरटी चा फॉर्म भरावा लागत नाही.
Maza mulga 6year 9 month cha ahe tari form bharta yet nahi ka be as