RTE Online Form Date 2025: आरटीईचे आठवडाभरात सव्वा लाखाच्यावर पालकांनी भरले फार्म; मुदत अंतिम टप्यात

RTE Online Form Date 2025: आरटीई प्रवेश प्रक्रिया 2025-26 या वर्षासाठी पालकांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आठवडा भराच्या काळात राज्यभरातून यावर्षी 1 लाख, 32 हजार पेक्षा जास्त फॉर्म आले आहेत. आता RTE Online Form Date 2025 साठी मुदत अंतिम टप्यात आली आहे. RTE 25% अंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक आणि जिल्हा निहाय आकडेवारी खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTE Online Form 2025-26: आरटीईचे आठवडाभरात सव्वा लाखाच्यावर पालकांनी भरले फार्म; मुदत अंतिम टप्यात

दरवर्षी RTE कायदा 2009 नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना सर्व माध्यमाच्या स्वयं अर्थ सहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा, महानगरपालिकेच्या सेल्फ फायनान्सच्या शाळा या शाळेमध्ये Free Admission दिले जाते.
यासाठी पालकांना RTE Portal Link: https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new वर ऑनलाईन फॉर्म भरावे लागते. त्यानंतर राज्य स्तरावरून लॉटरी पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असते.

RTE साठी कोणते बालक पात्र असतात?

RTE Online Form भरण्यासाठी खालील विद्यार्थी पात्र असतात, ज्यामध्ये

  • अनुसूचित जाती (SC)
  • इतर मागासवर्ग (ओ.बी.सी.)
  • अनुसूचित जमाती (ST)
  • विमुक्त जाती (अ)
  • भटक्या जमाती (ब)
  • भटक्या जमाती (क)
  • भटक्या जमाती (ड)
  • विशेष मागासवर्ग (एस.बी.सी.)
  • आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक
  • एच.आय.व्ही. बाधित किंवा एच. आय. व्ही. प्रभावित बालके
  • अनाथ बालके
  • दिव्यांग बालके (CWSN)
  • आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो.

RTE Online Form Date 2025

RTE Online Form 2025-26 District Wise Application

22 जानेवारी पर्यन्त राज्यामध्ये  01 लाख 32 हजार 443 पालकानी ऑनलाइन अर्ज भरला आहे. त्यामध्ये जिल्हयानुसार फॉर्म भरलेली संख्या खालीलप्रमाणे आहे.

  • अहिल्या नगर – 3522
  • अकोला – 2356
  • अमरावती – 3238
  • भंडारा – 1104
  • बीड – 1781
  • बुलढाणा – 2571
  • चंद्रपूर – 1752
  • छ संभाजीनगर – 6297
  • धाराशिव – 789
  • धुळे – 1387
  • गडचिरोली – 293
  • गोंदिया – 1250
  • हिंगोली – 779
  • जळगाव – 4098
  • जालना – 1754
  • कोल्हापूर – 1677
  • लातूर – 1974
  • मुंबई – 6637
  • मुंबई – 6637
  • नागपूर – 15117
  • नांदेड – 3544
  • नंदुरबार – 355
  • नाशिक – 7799
  • पालघर – 2813
  • परभणी – 1201
  • पुणे – 28939
  • रायगड – 4950
  • रत्नागिरी – 408
  • सांगली – 1265
  • सातारा – 1939
  • सिंधुदुर्ग – 36
  • सोलापूर – 2186
  • ठाणे – 12559
  • वर्धा – 2443
  • वाशीम – 968
  • यवतमाळ – 2708
    एकूण – 132459

RTE Online Form Date 2025

आरटीई मोफत प्रवेशासाठी फॉर्म भरू इच्छिणाऱ्या पालकांना दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी पर्यन्त खालील लिंक वरून ऑनलाइन फॉर्म भरता येणार आहे.

RTE Online Form Link 2025

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login

RTE Online Form वय मर्यादा

आरटीई मोफत प्रवेशासाठी फॉर्म भरू इच्छिणाऱ्या पालकांना आपल्या बालकाचे वय किती असावे यासाठी सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे.

RTE Online Form FAQ वारंवार विचारली जाणारी प्रश्न

  • आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2025-2026 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.
  • पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.
  • आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही !
  • एक किलोमीटर , १ ते ३ किलोमीटर अंतरावर शाळा निवडत असताना जास्तीत जास्त दहाच शाळा निवडाव्यात.
  • अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.
  • अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.
  • एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.
  • अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.
  • अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.
  • अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .
  • RTE 25% Admission  2025-2026 या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 27/01/2025 पर्यंत राहील.
  • दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.
  • सन 2025-2026 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .
  • सन 2025-2026 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.
  • अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google map वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.

Leave a Comment

error: कॉपी करताय???