RTE Maharashtra 2024-25: आरटीई लॉटरी निघाली; आता या दिवशी पालकाना येणार मॅसेज

RTE Maharashtra 2024-25: उशिराने सुरू झालेल्या RTE Admission प्रक्रिया आता अंतिम टप्यात आहे. RTE 2009 च्या कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना सेल्फ फायनान्स आणि खाजगी व इतर विनाअनुदानित शाळेमध्ये प्रवेशासाठी 25% जागांवर मोफत प्रवेश दिल जातो. या मोफत प्रवेश प्रक्रियासाठी दिनांक 07 जून रोजी आरटीई लॉटरी काढण्यात आली. परंतु प्रत्यक्ष पालकांना प्रवेशसाठीचे मॅसेज आले नाहीत. RTE Maharashtra 2024-25 Admission चे मॅसेज कधी येणार याविषयी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTE Maharashtra 2024-25: आरटीई लॉटरी निघाली; आता या दिवशी पालकाना येणार मॅसेज

शासनाच्या वतीने बदल करण्यात आलेल्या प्रक्रियेला कोर्टाने स्थगिती दिली आणि पूर्वीप्रमाणे RTE Admission Process सुरू झाली. यंदा RTE Maharashtra 2024-25 साठी राज्यभरातील 9 हजार 212 शाळेमधून 1 लाख 05 हजार 399 विद्यार्थ्याना मोफत प्रवेश दिल जाणार आहे. त्यासाठी 2 लाख 42 हजार 792 अर्ज आले आहेत.  राज्यामध्ये पोदार इंग्लिश स्कूल पुणे येथे राज्यामध्ये  सर्वाधिक अर्ज आले आहेत.

RTE Maharashtra 2024-25
RTE Maharashtra 2024-25

 

RTE Maharashtra 2024-25

शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रथम दिनांक 17 मे ते 31 मे 2024 दरम्यान पालकांसाठी ऑनलाईन नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर 04 जून 2024 पर्यन्त मुदतवाढ देण्यात आली आणि दिनांक 07 जून रोजी शासनस्तरावरून लॉटरी काढण्यात आली.

यावेळी शिक्षण संचालकानी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण आरटीई प्रवेश प्रक्रिया ही संगणकीकृत असल्यामुळे पारदर्शक असते. यामध्ये कुणीही हस्तक्षेप किंवा फेरफार करू शकत नाही. पालकांनी कोणत्याही अफवाना बळी पडू नये. यावर्षी 50% पेक्षा जास्त विद्यार्थ्याना प्रवेश मिळेल. शरद गोसावी,शिक्षण संचालक (प्राथ)

RTE Maharashtra 2024-25 Lottery

आरटीई लॉटरी निघाली परंतु पालकांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे कारण काही शाळा त्यांच्या अडचणीमुळे  आणि काही मागण्यामुळे न्यायालयात गेली आहे त्याची सुनावणी 12 जून रोजी आहे. ती सुनावणी झाली की त्याच दिवसापासून पालकाना येणार मॅसेज येणार आहेत. ही प्रक्रिया कोर्टाने दिलेल्या सूचनेनुसार चालू आहे त्यामुळे यात अडथळा येणार नाही.  आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2023-24 या वर्षाकरिता लॉटरी द्वारा निवड झालेल्या आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची यादी बुधवार दिनांक 12 जून  2023 रोजी दुपारी 03:00 नंतर आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल.

आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया

  • निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील.
  • पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी.

यावेळी राज्याचे शिक्षण आयुक्त म्हणाले,” RTE हा शिक्षण व्यवस्थेला दिशा दाखवणारा कायदा आहे. न्यायालयाने ठरवून दिलेल्या पद्धतीने ही प्रक्रिया होत असून यास यंदा पालकांचा प्रतिसाद उत्तम मिळाला आहे. पालकांनी कोणत्याही भूल थापाना बळी पडू नये. ही प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक आहे. यामुळे राज्यातील दुर्बल व वंचित घटकतील मुलाना उत्तम शिक्षणाची दार खुले होणार आहे. यंदा केवळ लॉटरी काढून प्रक्रिया थांबणार नाही तर यांचा फालोअप सुद्धा घेतला जाईल.

2 thoughts on “RTE Maharashtra 2024-25: आरटीई लॉटरी निघाली; आता या दिवशी पालकाना येणार मॅसेज”

Leave a Comment

error: कॉपी करताय???