HSC Geography Paper: याठिकाणी इयत्ता 12वी बोर्डाची प्रश्नपत्रिका कशी सोडवावी उत्तर कसे लिहावे आणि प्रश्नाची निवड कशी करावी याविषयी माहिती देण्यात आली आहे त्याच बरोबर HSC Geography Paper वस्तुनिष्ठ प्रश्नाचे ११ चाचणी याठिकाणी दिली आहे. आपण त्या सोडवल्या नंतर लगेच आपल्याला गुण कळणार आहेत. त्यामुळे खाली दिलेल्या लिंकवरून सर्व प्रश्न सोडवावेत.
HSC Geography Paper असा सोडवा बारावी भूगोल विषयाचा बोर्डाचा पेपर; वस्तुनिष्ठ प्रश्नाचे ११ चाचणी
12वी भूगोल वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या ११ चाचणी
चाचणी सोडविण्यासाठी देण्यात आलेल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांचा सराव व्हावा. चाचणी सोडविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. सबमिट केल्यानंतर लगेच आपल्याला गुण व अचूक उत्तरे कळतील
- भूगोल वस्तुनिष्ठ प्रश्न चाचणी 1
https://forms.gle/PjMziePPG3WHKD2k6 - भूगोल वस्तुनिष्ठ प्रश्न चाचणी 2
https://forms.gle/q4PeGyzUG9rQkCKq9 - भूगोल वस्तुनिष्ठ प्रश्न चाचणी 3
https://forms.gle/jFeY2CT4UHuo8SAH6 - भूगोल वस्तुनिष्ठ प्रश्न चाचणी 4
https://forms.gle/WhALHGS1Qa4BjVcB6 - भूगोल वस्तुनिष्ठ प्रश्न चाचणी 5
https://forms.gle/mPPsjWnsp6xUvaRG9 - भूगोल वस्तुनिष्ठ प्रश्न चाचणी 6
https://forms.gle/PsbitRmJHHUEDWsj8 - भूगोल वस्तुनिष्ठ प्रश्न चाचणी 7
https://forms.gle/yS3CD5nd2g7ne3oS8 - भूगोल वस्तुनिष्ठ प्रश्न चाचणी 8
https://forms.gle/RNqf82g3f9r6s1Ux5 - भूगोल वस्तुनिष्ठ प्रश्न चाचणी 9
https://forms.gle/PaVJwsYmfGptUvL68 - भूगोल वस्तुनिष्ठ प्रश्न चाचणी 10
https://forms.gle/m4tqufJBPYb6heir9 - भूगोल वस्तुनिष्ठ प्रश्न चाचणी 11
https://forms.gle/TUc2BKJppXXyUvLF6
HSC Geography Paper
प्रश्न 1ला अ: ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ स्तंभांतील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा : गुण 5
- हा प्रश्नप्रकार ‘जोड्या जुळवा’ या प्रश्नप्रकारासारखा आहे. यात दोन स्तंभांऐवजी 3 स्तंभ दिले जातील.
- या प्रश्नाचे उत्तर लिहिताना सर्वप्रथम ‘अ’ व ‘ब’ स्तंभांतील घटकांच्या जोड्या जुळवून घ्या.
- त्यानंतर या जुळवलेल्या प्रत्येक जोडीसमोर ‘क’ स्तंभातील तिसरा घटक शोधून साखळी पूर्ण करायची आहे.
- उत्तरपत्रिकेत रफ पानावर या साखळ्या जुळवून घ्या.
- खात्री पटल्यावर मगच तुमचे अंतिम उत्तर म्हणून हा प्रश्न सोडवा, म्हणजे उत्तरात खाडाखोड दिसणार नाही.
प्रश्न 1 ब : दिलेल्या विधानांमधील A : विधान आणि R : कारण यांचा अचूक सहसंबंध ओळखा गुण 05
- हा प्रश्न सोडवताना तुम्हांला A-विधान आणि R-कारण यांमधील योग्य सहसंबंध ओळखावा लागतो.
- यासाठी तुम्हांला4 पर्याय दिले जातात.
- अ. केवळ A बरोबर आहे.
- ब. केवळ R बरोबर आहे.
- क. A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
- ड. A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत; परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
3. दोन्ही विधानांचा कारणसहसंबंध समजून घेतल्यानंतर वरीलपैकी कोणता पर्याय संबंधित आहे याचा विचार करा.
4. उत्तराची खात्री पटल्यावर मगच तुमचे अंतिम उत्तर लिहावे.
प्रश्न 1 क : चुकीचा घटक ओळखा व लिहा : गुण 05
- हा प्रश्नप्रकार सोडवताना दिलेल्या पर्यायांपैकी चुकीचा घटक कोणता असेल याचा विचार करावा.
- उत्तराची खात्री पटल्यावर मगच तुमचे अंतिम उत्तर लिहावे.
प्रश्न 1 ड: पुढील विधाने ‘बरोबर’ की ‘चूक’ ते लिहा . गुण 05
- हा प्रश्न सोडवताना दिलेले विधान कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे याचा विचार करावा.
- उत्तराची खात्री पटल्यावरच मगच तुमचे अंतिम उत्तर लिहावे.
नोकर भरती बाबत इथे क्लिक करा
HSC Geography Paper Question 2
प्रश्न 2: पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा : (कोणत्याही चार) गुण 12
- ‘भौगोलिक कारणे लिहा’ या प्रश्नप्रकारात अंतर्गत, 6 पैकी 4ची कारणे लिहायची आहेत.
- मात्र शक्य असल्यास एक जास्त प्रश्नही सोडवा.
- भौगोलिक घटकांची योग्य व मुद्देसूद कारणमीमांसा मोजक्या शब्दांत 4-5मुद्द्यांत लिहा.
HSC Geography Paper Question 3
प्रश्न 3 रा पुढील संज्ञांमध्ये फरक स्पष्ट करा : (कोणतेही तीन) गुण: 9
एकाच अभ्यास विषयाशी किंवा भौगोलिक घटकाशी संबंधित मात्र भिन्न वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यास प्रवृत्त करणारा / तुलना करणारा हा प्रश्नप्रकार आहे.
अभ्यास घटकाचे दोन भाग, विविध वैशिष्ट्ये, क्रमवार सहसंबंध, कार्यकारणभाव यांची 4-5 मुद्द्यांत नीट मांडणी करून हा प्रश्न सोडवावा.
या प्रश्नात अंतर्गत विकल्प असून 5 पैकी 3 जोड्यांमधील फरक स्पष्ट करायचाआहे.
HSC Geography Paper Question 4
प्रश्न 4 अ: दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या साहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा : (कोणत्याही सहा) 06 गुण
- ‘नकाशा भरणे’ या प्रश्नप्रकारात 8 पैकी 6 बाबी नकाशावर दाखवायच्या आहेत.
- मात्र, विद्यार्थ्यांनी सर्व आठही बाबी दाखवाव्यात, जेणेकरून एखादी बाब चुकीच्या जागी दाखवल्यास होणारे गुणांचे नुकसान भरून काढता येते.
- सूची अवश्य तयार करा.
- सूची नसल्यास गुण मिळत नाहीत.
प्रश्न 4 ब : दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा: 05 गुण
- ‘आलेख/नकाशा/आकृती वाचन’ हा तुलनेने एक सोपा प्रश्नप्रकार आहे
- कारण जे प्रश्न विचारले जातील त्यांची उत्तरे त्याच आलेख / नकाशात /आकृतीमध्ये असतील.
- त्यामुळे आलेख / नकाशा / आकृतीचे नीट/काळजीपूर्वक निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
HSC Geography Paper Question 5
प्रश्न 5: पुढीलपैकी संक्षिप्त टिपा लिहा : (कोणत्याही तीन) 12 गुण
- ‘टिपा लिहा’ या प्रश्नप्रकारात 5 पैकी 3 टिपा लिहायच्या आहेत.
- टिपा लिहिताना त्या विषयाचा पूर्ण सारांश थोड्या विस्तृतपणे लिहावा.
HSC Geography Paper Question 6
प्रश्न 6 अ: पुढील उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा : गुण 04
- आकृती / नकाशा वाचनावर आधारित प्रश्नाप्रमाणेच हा प्रश्नप्रकार असून भौगोलिक विषयाशी निगडित एका परिच्छेदावर प्रश्न विचारले जातील
- त्या प्रश्नांची उत्तरे त्या परिच्छेदातच किंवा परिच्छेदाशी संबंधित तुमच्या भौगोलिक आकलनावर आधारित असतील.
- भौगोलिक घटकांचे तुमचे आकलन व परिच्छेदातील माहिती यांनुसार प्रश्नांची उत्तरे लिहावीत.
प्रश्न 6 ब : पुढील आकृत्या काढून नावे दया : (कोणत्याही दोन) 04 गुण
- उत्तरपत्रिकेच्या पानाच्या मध्यभागी आकृती काढावी.
- त्यानंतर त्या आकृतीभोवती चौकट आखावी.
- आकृती सुबक, स्पष्ट असावी व त्याला योग्य ती नावे दयावीत.
- आवश्यक असेल तरच विविध रंगांचा वापर करावा.
- शक्य असल्यास प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या तिन्ही आकृत्या काढाव्यात
HSC Geography Paper Question 7
प्रश्न 7: सविस्तर उत्तरे लिहा (कोणताही एक) गुण 8
- हा एक दीर्घोत्तरी प्रश्न असून, दोनपैकी कोणत्याही *एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे.
- ज्या उत्तरात लिहायला खूप वाव आहे व आत्मविश्वासाने तुम्हांला नीट, विस्तृत, परिपूर्ण उत्तर लिहिता येईल अशाच प्रश्नाची निवड करा.
- उत्त्तर विस्ताराने मात्र तरीही मुद्देसूद लिहा.
- उत्तर अनेक परिच्छेदांत विभागा.
- योग्य तेथे आकृत्या, नकाशे काढून उत्तर परिपूर्ण करा.