Kendrapramukh Bharti 2025: केंद्रप्रमुख भरतीची अधिसूचना जाहीर; 2410 पदे भरली जाणार

Kendrapramukh Bharti 2025 : समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख भरती ) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील कार्यरत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) व प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) यांची समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) पदावर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे डिसेंबर 2025 मध्ये समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2025 चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजन करण्यात येत आहे.

Kendrapramukh Bharti 2025

प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा व इतर तपशील खालील प्रमाणे आहे.

  • पदनाम: समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख)
  • वेतन श्रेणी :- S15- 41800-132300
  • पदसंख्या :- 2410
  • केंद्रप्रमुख ऑनलाइन फॉर्म लिंक https://www.mscepune.in/
  • मुंबई जे जे हॉस्पिटल भरती : https://shaleyshikshan.com/ggmcjj-bharti-2025/

Kendrapramukh Bharti 2025 जिल्हा निहाय जागा 

  • अहिल्यानगर : 123 जागा
  • अकोला : 42 जागा
  • अमरावती:  69 जागा
  • छ संभाजीनगर:  64 जागा
  • बीड : 78 जागा
  • भंडारा: 30 जागा
  • बुलढाणा : 65 जागा
  • चंद्रपूर : 66 जागा
  • धुळे: 41 जागा
  • गडचिरोली: 50 जागा
  • गोंदिया: 42 जागा
  • हिंगोली: 34 जागा
  • जळगाव: 80 जागा
  • जालना: 53 जागा
  • कोल्हापूर: 85 जागा
  • लातूर: 50 जागा
  • नागपूर: 68 जागा
  • नांदेड: 87 जागा
  • नंदुरबार: 45 जागा
  • नाशिक: 122 जागा
  • धाराशिव: 40 जागा
  • पालघर: 75 जागा
  • परभणी: 43 जागा
  • पुणे: 151 जागा
  • रायगड: 114 जागा
  • रत्नागिरी: 125 जागा
  • सांगली:  68 जागा
  • सातारा: 111 जागा
  • सिंधुदुर्ग: 72 जागा
  • सोलापूर: 99 जागा
  • ठाणे: 51 जागा
  • वर्धा: 43 जागा
  • वाशिम: 35 जागा
  • यवतमाळ: 89 जागा

उपरोक्त नमुद पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

शासन निर्णय दि. 01 डिसेंबर 2022 नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे त्यांच्या जिल्हयातील उर्दू माध्यमांच्या शाळांची संख्या विचारात घेवून उर्दु माध्यमासाठी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) ची पदे निश्चित करतांना अंशतः बदल करू शकतात.

Kendrapramukh Bharti 2025 शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताः

  • शासन अधिसूचना दि. 18 जुलै 2025 मध्ये नमुद केल्याप्रमाणे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी निश्चित केलेली अर्हता अनिवार्य असेल.
  • फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
  • जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए. / बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल.
  • दि.01 जानेवारी 2025 रोजी अखंड नियमीत सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल.
  • मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी निवडीस पात्र राहील.
  • वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय व मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो. तसेच मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार, वेळोवेळी शासन धोरण व निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पात्र होणे अनिवार्य आहे.

Kendrapramukh Bharti 2025 परीक्षेचे शुल्क

  • सर्व संवर्गातील उमेदवारः 950/-
  • दिव्यांग उमेदवारः 850/-
  • परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.
  • उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
  • विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही.

जिल्हा / परीक्षा केंद्र निवडः जिल्हा / परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परीस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. एखादे जिल्हा / परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा / परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हा/ परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्हा / परीक्षा केंद्रावर करण्यात येईल.

Kendrapramukh Bharti 2025 Time table 

kendrapramukh  Bharti  2025

Kendrapramukh Bharti 2025 अभ्यासक्रम 


अनुक्रमांक 2 मधील उपघटकांचे स्वरुपः-
उपघटक 1
: भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदी, बालकांशी संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय-
अ) भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदींची (कलमांची) माहिती (अद्ययावत दुरुस्त्यांसह)
ब) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 व सदर अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली, 2011 (अद्ययावत दुरस्त्यांसह) विश्लेषण, बलस्थाने व अडचणी.
ड) विद्यार्थी लाभाच्या विविध योजना (केंद्र व राज्य शासन) व शिष्यवृत्ती.
क) बाल हक्क संरक्षण कायदा, 2005 बाल संरक्षण आणि सुरक्षा, भय आणि चिंता.
इ) विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना.
उपघटक 2 : शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था/संघटन व त्यांचे कार्य
UNICEF, NCERT, NUEPA, NCTE, CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha Center of Science Education, RTE, EFLU, MPSP, SCERT, MIEPA, SISI, DIET, राज्य आंग्लभाषा इ.
उपघटक 3 : माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक)
अ) इंटरनेटचा प्रभावी वापर
ब) शाळास्तरावर विविध माहिती भरणे
क) शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान (SARAL, U-DISE +)
ड) संगणक वापराविषयीचे ज्ञान
इ) माहितीचे विश्लेषन
फ) शाळास्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब
उपघटक 4 : अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन पध्दती
अ) पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम
ब) अध्ययन निष्पत्तीतील उणीवा
क) सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन
ड) प्रश्न निर्मिती (स्वाध्याय) कौशल्य : ASER, NAS, PISA
इ) प्रगत अध्ययन-अध्यापन शास्त्र
फ) निकालासंबंधीची कामे

Leave a Comment

error: कॉपी करताय???