MAFSU Recruitment 2026: महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत दहावी, बारावी, ITI, पदवीधर उमेदवारासाठी नवीन सरळसेवा भरती जाहीर करण्यात आली आहे. Online होणाऱ्या MAFSU Recruitment 2026 मध्ये शिक्षकेत्तर गट ‘ब’, ‘क’ व ‘ड’ संवर्गातील विविध पदे भरण्यात येणार आहेत. MAFSU Nagpur येथील भरती आणि फॉर्म भरण्याबाबतची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
MAFSU Recruitment 2026: पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठात सरळसेवा भरती; दहावी, बारावी, ITI, पदवीधरांना संधी
- इथे पहा आरोग्य विभागात १४४० जागा
MAFSU Recruitment 2026
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत विद्यापीठ मुख्यालय, घटक पशुवैद्यकीय, दुग्ध तंत्रज्ञान, मत्स्य विज्ञान महाविद्यालये, पशु पैदास प्रक्षेत्रे आणि इतर संस्था येथील आस्थापनेकरिता गट ‘ब’, ‘क’ व ‘ड’ या शिक्षकेत्तर संवर्गातील एकूण 175 रिक्त पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
MAFSU Recruitment 2026 Dates
ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक :
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरुवात: 28/02/2026 पासून
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक: 20.03.2026 पर्यंत
- आवेदन / परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक: 20.03.2026 रोजी
MAFSU Recruitment 2026 Notification

MAFSU जाहिरात आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लिंक
MAFSU Recruitment 2026 Details
- लेखाधिकारी
- सहाय्यक प्रक्षेत्र व्यवस्थापक (पशुवैद्यकीय)
- अधिष्ठाता यांचे तांत्रिक अधिकारी (पशुवैद्यक शास्त्र)
- रुग्णालय चिकित्सक
- सहाय्यक व्यवस्थापक (गुण नियंत्रण)
- प्लांट ऑपरेटर (दुग्ध प्रक्रिया)
- शस्त्रक्रियागृह तंत्रज्ञ
- वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक
- दुग्धशाळा सहाय्यकक्ष-किरण तंत्रज्ञ
- पशुचिकित्सा प्रयोगशाळा सहाय्यक
- रुग्णालय तंत्रज्ञ
- शस्त्रक्रियागृह
- सहाय्यक
- प्रक्षेत्र सहाय्यक
- वरिष्ठ लिपिक
- वरिष्ठ यांत्रिक
- बॉयलर ऑपरेटर
- प्राणिसंग्रहालय तंत्रज्ञ (क्युरेटर)
- क्युरेटर कम स्पेसिमन टेक्नीशियन
- प्रयोगशाळा सहाय्यक (पशुवैद्यकीय व दुग्ध तंत्रज्ञान)
- प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्य विज्ञान)
- कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक
- औषध भांडारपाल
- वाहन चालक / रुग्णवाहिका चालक
- कनिष्ठ यांत्रिक (यांत्रिकी व शितकरण)
- ग्रंथालय परिचर
- प्रयोगशाळा परिचर
- ट्रॅक्टर ड्रायव्हर / मशीन ऑपरेटर
- व्रणोपचारकलिपिक नि टंकलेखक
- कनिष्ठ भांडारपाल
- विजतंत्री
- विस्तार प्रशिक्षण व प्रदर्शन सहाय्यक
- कनिष्ठ यंत्रज्ञ तथा तारतंत्री
- पशुधन सहाय्यक
पदनिहाय शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशील, सामाजिक व समांतर आरक्षण, आवेदन/परीक्षा शुल्क, परीक्षेचे स्वरूप व पद्धती, स्पर्धा परीक्षेचा पदनिहाय अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी नोंदणी व मार्गदर्शक सूचना इत्यादीबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ https://www.mafsu.ac.in/ वर उपलब्ध आहे.
प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या विविध निकष तसेच अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी वर नमूद कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत.