Pavitra Portal Bharti Tappa 2: पवित्र पोर्टल भरतीसाठी स्वप्रमाणपत्र करण्याच्या तारखा जाहीर

Pavitra Portal Bharti Tappa 2:  शासनाच्या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे / पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबतच्या सूचना (दुसरा टप्पा) (TAIT- 2022) बाबत नुकत्याच परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार आता पात्र उमेदवारांना Pavitra Portal Bharti Tappa 2 मध्ये स्वप्रमाणपत्र करण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pavitra Portal Bharti Tappa 2

Pavitra Portal मार्फत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबतच्या पवित्र पोर्टलवर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या दिनांक 01 सप्टेंबर 2023 च्या दोन सूचना तसेच 04 सप्टेंबर 2023, 14 सप्टेंबर 2023, 18 सप्टेंबर 2023, 21 सप्टेंबर 2023, 29 सप्टेंबर 2023, 01 ऑक्टोबर 2023 इत्यादी सूचनांचे अवलोकन करावे. सदर सूचना योग्य त्या फेरफारांसह दुसऱ्या टप्प्यातील (TAIT- 2022) स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे / पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्यासाठी लागू राहतील.

Pavitra Portal Bharti Tappa 2अशी होणार

शिक्षक अभियोग्यता व बु‌द्धिमत्ता चाचणी 2022 मधील प्राप्त गुणांच्या आधारे, शासन निर्णय 07/02/2019, 10/11/2022 व इतर आनुषंगिक शासन निर्णयांतील तरतुदींनुसार, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षण सेवक / शिक्षक या रिक्त पदांवर Pavitra Portal Bharti Tappa 2 अंतर्गत भरती करण्यात येणार आहे.

Pavitra Portal Bharti Tappa 2 काळजीपूर्वक माहिती भरा

शिक्षकांची सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनांमध्ये रिक्त असलेली पदे, इयत्तांचा गट, विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण (समांतर आरक्षणासह), उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार पवित्र प्रणालीमार्फत शिफारस होणार आहे.

Pavitra Portal Bharti Tappa 2

Pavitra Portal Bharti Tappa 2 – Ratio 

  • स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त मुलाखतीशिवाय या पर्यायातील असतील. पदांची भरती ही मुख्यत्वे यासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची (11 या प्रमाणात) नियुक्तीसाठी वरील क्रमांक 3 मध्ये नमूद बाबी विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत त्या त्या व्यवस्थापनाकडे शिफारस होणार आहे.
  • खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन पर्यायातील असतील. यांपैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य खाजगी शैक्षणिक संस्थेस असेल. मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची (1:1 या प्रमाणात) नियुक्तीसाठी पोर्टलमार्फत शिफारस होणार आहे. मुलाखतीसह या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी 10 उमेदवारांची (उमेदवार उपलब्धतेनुसार 1:10 या प्रमाणात) मुलाखतीसाठी पोर्टलमार्फत शिफारस होणार आहे.

Registration – Pavitra Portal Bharti Tappa 2

  • स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास संबंधित उमेदवारांनी स्वतःची नोंदणी (Registration) करणे आवश्यक आहे. ही नोंदणी करण्यासाठी ‘Register Here’ येथे क्लिक करून तेथे आपला टेट 2022 चाचणीचा रोल नंबर व रजिस्ट्रेशन नंबर नोंद करावा. यासाठी टेट 2022 परीक्षा अर्जामध्ये नोंद केलेला मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करावा. उमेदवारांचा टेट 2022 चा रोल नंबर हाच त्यांचा लॉग-इन-आय-डी असेल.

Pavitra Portal Website 

https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx

सूचना पीडीएफ पहा 

  • पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लॉग-इन करिता यापूर्वी तयार केलेला पासवर्ड वापरावा. पासवर्ड विसरला असल्यास ‘Forgot Password’ या सुविधेचा वापर करून Password तयार करावा.
  • ज्या उमेदवारांना त्यांच्या मोबाईल क्रमांकामध्ये काही कारणांस्तव बदल करावयाचा असल्यास, नजीकच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन,वैध ओळखपत्राच्या आधारे स्वतःची ओळख पटवून, मोबाईल क्रमांकामध्ये बदल करता येईल.
  • पवित्र पोर्टलवरील नोंदणी (रजिस्ट्रेशन) व स्वप्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतः करणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरतीशी निगडित असलेल्या विविध शासन निर्णयांचे काळजीपूर्वक वाचन करून, स्वप्रमाणपत्रातील माहिती भरावी.

स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याची तारीख 

  • उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक 11 मार्च 2025 ते दिनांक 20 मार्च 2025 पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
  • स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मधील उमेदवाराच्या नावामध्ये तफावत येत असल्यास उमेदवारांना त्यांच्या लॉग-इनवर ‘Request for change in data’ या मेन्यूअंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे. या सुविधेचा वापर करून उमेदवारांनी निवड केलेल्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन योग्य तो बदल करून घेता येईल.
  • नमूद केलेल्या मुदतीत जे उमेदवार स्वप्रमाणपत्र प्रमाणित करणार नाहीत, ते उमेदवार या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या शिक्षण सेवक / शिक्षक पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत.

शासन निर्णय दिनांक 27 फेब्रुवारी 2024 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशांच्या अनुषंगाने अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) यांतून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील (SEBC) आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याबाबतचा योग्य तो बदल करणे आवश्यक राहील.

  • काही उमेदवारांना त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागासवर्गाचे जातप्रमाणपत्र मिळाले आहे, त्यास अनुसरून सामान्य प्रशासन विभागाचे पत्र दिनांक 28 मे 2024 अन्वये अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) यांतून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना इतर मागास वर्ग (OBC) या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभघ्यावयाचा असल्यास त्याबाबतचा योग्य तो बदल करणे आवश्यक राहील.
  • सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गाचा लाभ यापूढे अनुज्ञेय नाही. सबब आरक्षण धोरणातील बदलांमुळे यापुढील नवीन जाहिरातींच्या वेळी उपरोक्त नमूद उमेदवारांना त्यांचा योग्य तो प्रवर्ग निवडण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे वर नमूद अ.क्र. 14, 15 प्रमाणे योग्य तो बदल करावा, अन्यथा त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील.

Pavitra Portal Bharti Tappa 2 सूचना 

  • स्वप्रमाणपत्रामधील माहिती नव्याने भरणे किंवा यापूर्वी भरलेली माहिती दुरुस्त करणे म्हणजे उमेदवारांना नियुक्तीच्या शिफारशीबाबतचा पूर्वलक्षी प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये यापूर्वी नोंदविलेल्या समांतर आरक्षणाच्या नोंदीमध्ये आता उमेदवारांना कोणताही बदल करता येणार नाही. कारण पहिल्या टप्प्यातील कट ऑफ गुण प्रसिद्ध झाले आहेत.
  • उमेदवाराची यापूर्वी कोणत्याही आस्थापनेवर समांतर आरक्षणातील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांमधून निवड झाली असल्यास, अशा उमेदवारांना पुनश्च या समांतर आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय असणार नाही. त्यामुळे लाभ घेतलेल्या उमेदवारांनी संबंधित समांतर आरक्षणाच्या पर्यायासमोर ‘NO’ अशी नोंद करणे आवश्यक आहे. जेणेकरून संबंधितउमेदवाराचा त्याच्या स्वतःच्या सामाजिक प्रवर्गातून किंवा खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार शिफारशीबाबत विचार होईल.
  • अर्जात म्हणजेच स्वप्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले अथवा बनावट दाखले सादर करणे किंवा विहित केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणे किंवा विहित केलेल्या अर्हतेच्या अटी विहित कालावधीमध्ये पूर्ण न करणे किंवा विहित मुदतील अर्हता धारण करीत नसतानाही उत्तीर्णतेची चुकीची तारीख नमूद करणे अथवा गैरवर्तणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल आणि किंवा फौजदारी कारवाईसह इतर योग्य त्या शिक्षेस पात्र ठरेल.
  • नव्याने स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती भरणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की, कोणत्याही कागदपत्रे / प्रमाणपत्र (वर सूचना क्रमांक 14 व 15 मध्ये नमूद प्रवर्ग वगळून) दिनांक 30/ 09/2023 पूर्वीचे असणे आवश्यक आहे.

Pavitra Portal Bharti Tappa 2 Eligibility 

  • उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे टेट 2022 साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजेच दिनांक 12/02/2023 पूर्वीची असणे आवश्यक आहे.
  • अध्यापक विद्यालयातील शिक्षक पदांकरिता व्यावसायिक अर्हतेमधील पदव्युत्तरपदवी परीक्षा (M.Ed.) उत्तीर्णतेची नोंद करण्याची सुविधा देण्यात येत आहे. सदरची व्यावसायिक अर्हता टेट 2022 साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजेच दिनांक 12/02/2023 पूर्वीची असणे आवश्यक आहे.
  • टीईटी सीटीईटी या शिक्षक पात्रता परीक्षेतील (इयत्ता 1 ली ते 8 वी करिता) कमाल प्राप्त गुणांची नोंद उमेदवारांनी यापूर्वी स्वप्रमाणत्रात केली नसल्यास अशा उमेदवारांना कमाल गुणांची नोंद स्वप्रमाणपत्रात करता येईल.
  • पूर्वी स्वप्रमाणपत्र नोंद केलेल्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी अप्रमाणित (Uncertify) केले असल्यास, स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र प्रमाणित (Self-certify) करणे अनिवार्य आहे, अन्यथा स्वप्रमाणपत्र प्रमाणित (Self-certify) न करणारे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाहीत, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

Leave a Comment

error: कॉपी करताय???