RTE Admission Online form 2026: अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असणाऱ्या पालकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियम (RTE 2009) नुसार आर्थिक दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये अंतर्गत पालकांना आता ऑनलाईन अर्ज भरण्याकरीताची प्रक्रिया सुरु करणेबाबत शासनाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील अनेक पालकांना दिलासा मिळाला आहे. RTE Admission Online form 2026 लिंक व तारीख खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
RTE Admission Online form 2026: आनंदाची बातमी!! आरटीई ऑनलाईन प्रवेश fफॉर्म सुरु; इथे पहा लिंक आणि संपूर्ण माहिती
RTE Admission Online form 2026
- दरवर्षी प्रमाणे सन 2026-27 या वर्षांची RTE 25% Online Admission प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
RTE Admission Online form 2026 Date
सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया दिनांक 17 फेब्रुवारी 2026 ते 10 मार्च 2026 या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.
RTE Admission Online form 2026 लिंक
पालकानी ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावे
RTE Admission 2024-25 Registration Link क्लिक करा
RTE Admission 2026 -27 Registration Link for Parent Student क्लिक करा
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login
RTE फॉर्म भरण्यासाठी महत्वाच्या सूचना
- एकदा नोंदवलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही .
- एका बालकाचा एका पेक्षा जास्त अर्ज भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द होतील.
- जन्म तारीख अथवा मोबाईल भरताना चुकल्यास तो अर्ज Delete करून पुन्हा नवीन अर्ज भरावा.
- दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना पालकांनी Child Disability – Yes यावर क्लिक करावे
- सर्व कागदपत्रे ही फॉर्म भरण्याच्या तारखे पूर्वीची असावी संपूर्ण माहिती पहा
पालकांकरीता सूचना (2026-27)
- आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2026-27 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.
- पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.
- आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्या वरीलच जन्म दिनांक लिहावा.
- शाळा निवडत असताना कमाल 10 च शाळा निवडाव्यात.
- अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.
- अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.
- एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज आरटीई लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.
- अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.
- अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.
- अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .
- RTE 25% Admission 2026-27 या वर्षाकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 10/03/2024 पर्यंत राहील.
- दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.
- सन 2026-27 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात आले आहे .
- सन 2026-27 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.
- अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google वर पत्ता टाकून ते lattitude, longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.
- image not found बालकाच्या जन्मतारखेबाबत : दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित depmah2@gmail.com वर इमेल पाठवावा.