RTE Online Admission Date 2026-27: आरटीई प्रवेश प्रक्रिया ‘या’ तारखेपासून सुरु होणार

RTE Online Admission Date 2026-27: महाराष्ट्र राज्यात अखेर आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला गती आली आहे. अनेक दिवसापासून प्रतीक्षा करणाऱ्या पालकांना आता दिलासा मिळालाआहे. कारण 12 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाकडून RTE Online Admission 2026 राबविण्यासाठी शासन निर्णय काढून हिरवा कंदील दाखवला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTE Online Admission Date 2026-27

शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी राज्यामध्ये RTE Admission Process दिनांक 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. शासनाने प्राथमिक शिक्षण संचालकांना गुरुवारी शासन निर्णयाद्वारे प्रवेश प्रक्रियेसाठी मान्यता दिली असली तरी त्यात तारखेचा उल्लेख मात्र केलेला नाही.

  • शासनाच्या आदेशानुसार यंदा प्रती विद्यार्थी 17 हजार 670 रुपये शुल्क शाळांना देण्यात येणार आहे.

RTE ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी  इथे क्लिक करा 

RTE Online Admission 2026 मध्ये नवा बदल

  • आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. पालकांना अर्ज करताना एक किलोमीटरच्या पलीकडील शाळा निवडता येणार नाही, अशी तरतूद प्रणालीमध्ये केली आहे.
  • अर्ज भरताना विद्यार्थ्याच्या घरापासून एक किमी अंतराच्या मर्यादेतच ‘गुगल लँडमार्क’वर दर्शवल्यानुसार अर्ज भरता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

यंदा आरटीई प्रवेश प्रक्रिया दोन महिने उशीर

  • यंदाच्या प्रवेश प्रक्रियेला दोन महिने विलंब झाला आहे. या संदर्भात सामाजिक संघटना आणि पालकांनी विचारणा केली होती. ‘अनेक वर्तमान पत्रातून या संदर्भात वारंवार बातम्या प्रसिद्ध केले होते.

RTE Online Admission Date 2026

  • अखेर गुरुवारी शासनाने प्राथमिक शिक्षण संचलनालयाला शासकीय आदेशाद्वारे प्रवेश प्रक्रिया राबवण्यास मंजुरी दिली आहे. शासन निर्णय GR पहा 

राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक म्हणतात की, शासनाकडे RTE Admission प्रक्रियेसाठी विनंती प्रस्ताव पाठवला होता. शासनाने त्याला मंजुरी दिली आहे. 17 फेब्रुवारीपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकते.

RTE बाबत खालील अनियमितता आढळून आली तर शाळांना दंड

  • विनाकारण प्रवेश नाकारल्यास दांडात्मक कारवाई होईल.
  • शाळा प्रवेश नाकारतात ही पालकांची तक्रार योग्य असल्यास शाळांना दंड लावला जाईल
  • प्रवेश प्रक्रियेत शाळा दोषी आढळल्यास शाळांना दंड आकारला जाईल.

Leave a Comment

error: कॉपी करताय???