11th Class online Admission FAQ 2025 : अकरावी ऑनलाइन प्रवेश 2025-26 बाबत विद्यार्थी, पालक शिक्षक, शाळा याबाबत वेगवेगळे प्रश्न वारंवार विचारले जात आहेत. त्या अनुषंगाने 11th Class online Admission FAQ 2025 बाबत संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

11th Class online Admission FAQ 2025 : अकरावी ऑनलाईन प्रवेशाबाबत आपल्या शंकाचे समाधान
शासनाच्या शालेय शिक्षण विभागंतर्गत शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांच्या वतीने इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 बाबत विद्यार्थी पालक यांच्याकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) बाबत मार्गदर्शन केले आहे. नुकतेच 11 वी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
- अधिकृत वेबसाईट: https://mahafyjcadmissions.in
- ईमेल: support@mahafyjcadmissions.in
11th Class online Admission FAQ 2025
प्रश्न: इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (FYJC Online Admission Process) म्हणजे काय?
- उत्तर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये इयत्ता 11 वीच्या प्रवेशासाठी ही केंद्रीकृत ऑनलाईन प्रणाली आहे.
प्रश्न: कोण अर्ज करू शकतो?
- उत्तर: इयत्ता 10 वी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळामधून (MSBSHSE, CBSE, ICSE, IB, IGCSE, NIOS किंवा इतर राज्य मंडळे) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, जे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छितात.
प्रश्न: ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे का?
- उत्तर: होय, ऑफलाईन अर्ज मान्य केले जाणार नाहीत.
प्रश्न : 11वी नोंदणी (FYJC Online Registration) कशी करावी?
- उत्तर : 11वी ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी खालील टप्पे पहा
- https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर भेट द्या
- Student Registration वर क्लिक करा,
- आवश्यक माहिती भरा आणि पासवर्ड तयार करा.
- Login ID तुम्हाला SMS द्वारे मिळेल.
11th Class online Admission FAQ 2025
प्रश्न : नोंदणी नंतर प्रवेश अर्जात सुधारणा करता येते का?
- उत्तर: होय, आपल्या अर्जाच्या पडताळणीपूर्वी Unlock Form पर्याय वापरून किंवा मार्गदर्शन केंद्राशी संपर्क करून आपल्या प्रवेश अर्जात सुधारणा करता येते.
प्रश्न: मी किती उच्च माध्यमिक विद्यालयांची पसंती देऊ शकतो?
- उत्तर: विद्यार्थी किमान 1 व जास्तीत जास्त 10 उच्च माध्यमिक विद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवू शकतो.
प्रश्न : प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- उत्तर:
- इयत्ता १० वीचे गुणपत्रक,
- शाळा सोडल्याचा दाखला
- आवश्यकतेनुसार आरक्षण संदर्भात व विशेष प्रवर्गाची प्रमाणपत्रे (प्रवेश माहितीपुस्तिकेत नमूद केल्यानुसार)
Maha FYJC Admission 2025: अकरावी प्रवेशाचे नवीन वेळापत्रक उद्या जाहीर होणार
प्रश्न : मी इतर मंडळाचा विद्यार्थी आहे, मी काय करू?
- उत्तर : आपल्या श्रेणी गुणांचे रुपांतरण गुणांमध्ये करा आणि ते गुण आपल्या अर्जात भरा, आपले इयत्ता 10वीचे हॉलतिकीट व गुणपत्रिका अपलोड करा आणि मार्गदर्शन केंद्रात जाऊन पडताळणी करा. जवळचे केंद्र शोधण्यासाठी पोर्टलवर माहिती पहा.
प्रश्न: जर मी इयत्ता 10 मध्ये 1-2 विषयांमध्ये नापास झालो आहे तर मी इ. 11वी प्रवेशासाठी अर्ज करू शकतो का?
- उत्तर: होय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी ATKT (Allowed to Keep Terms) अंतर्गत अर्ज करता येतो.
11th Class online Admission FAQ 2025
प्रश्न : कोटा प्रकार कोणते आहेत?
- उत्तर : इन-हाऊस कोटा (10%), व्यवस्थापन कोटा (05%), अल्पसंख्याक कोटा (मायनॉरिटी महाविद्यालयांमध्ये 50% पर्यंत).
प्रश्न: कोटा जागांसाठीही ऑनलाईन अर्ज आवश्यक आहे का?
- उत्तर: होय, सर्वप्रकारच्या कोट्याअंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक आहे.
प्रश्न : प्रवेशासाठी किती फेऱ्या घेतल्या जातात?
- उत्तर: चार नियमित फेऱ्या व त्यानंतर सर्वांसाठी खुली फेरी (Open to All Round).
प्रश्न: जर मी प्रथम पसंतीचे विद्यालय मिळून देखील प्रवेश निश्चित केला नाही तर काय होईल?
- उत्तर : जर विद्यार्थ्यास प्रथम पसंतीचे उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले तरीही प्रवेश घेतला नाही, तर संबंधित विद्यार्थी पुढील फेरीसाठी अपात्र ठरेल. इतर विद्यार्थी पुढील प्रवेश फेरीसाठी पात्र असतील.
11th Class online Admission FAQ 2025
प्रश्न : मी एकापेक्षा अधिक फेऱ्यांमध्ये सहभागी होऊ शकतो का?
- उत्तर: होय, पण प्रत्येक फेरीपूर्वी पोर्टलवर Consent (संमती) देणे आवश्यक आहे.
11th Class online Admission FAQ 2025
प्रश्न : नोंदणी फी किती आहे आणि ती कशी भरावी?
- उत्तर : नोंदणी फी 100/- आहे. ती Net Banking, Debit/Credit Card, UPI किंवा डिजिटल वॉलेटद्वारे ऑनलाईन भरावी लागेल.
प्रश्न ऑफलाईन पेमेंट चा पर्याय उपलब्ध आहे का?
- उत्तर : नाही, फक्त ऑनलाईन पेमेंटच स्वीकारले जाते.
11th Class online Admission FAQ 2025
प्रश्न : जर मी Login तपशील विसरलो तर?
- उत्तर : यासाठी Forgot Password पर्याय वापरा किंवा जवळच्या मार्गदर्शन केंद्राशी संपर्क करा.
प्रश्न: विद्यार्थ्याला प्रवेश अर्जासंदर्भात अडचणी संदर्भात कुठे मदत मिळेल?
- उत्तर : शाळा, जवळचे मार्गदर्शन केंद्र, हेल्पलाईन (८५३०९५५५६४) किंवा ईमेल support@mahafyjcadmissions.in यांच्याशी संपर्क करा.
प्रश्न : मी उच्च माध्यमिक विद्यालयांचा प्राधान्यक्रम बदलू शकतो का?
- उत्तर: होय, प्रत्येक फेरीपूर्वी तुम्ही तुमचा Option Form (Part-२) अद्ययावत करू शकता.
प्रश्न: प्रवेश यादीत नाव आल्यावर लगेच प्रवेश निश्चित होतो का?
- उत्तर : नाही, विहित कालावधीत यासाठी Proceed for Admission वर क्लिक करा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात भेट देऊन कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर व संबंधित विद्यालयाने प्रवेश निश्चित केल्यावरच आपला प्रवेश निश्चित होतो.
प्रश्न: प्रवेश प्रक्रियेमधून माघार घेण्यासाठी काय येईल?
- उत्तर: यासाठी पोर्टलवरील Withdrawal पर्याय वापरा यामुळे एक जागा इतर विद्यार्थ्यांसाठी मोकळी होईल.
प्रश्न: मूळ कागदपत्रांची पडताळणी कोण करेल?
- उत्तर: जे उच्च माध्यमिक विद्यालय तुम्हाला प्रवेशासाठी मिळालेआहे, तेच उच्च माध्यमिक विद्यालय आपण अपलोड केलेल्या कागदपत्रांशी तुलना करून, इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत संबधित मंडळाच्या वेबसाईटवरून / डिजी लॉकर वरून आपल्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करेल.
प्रश्न : मी माझ्या प्रवेश अर्जातील शाखेची निवड (Stream) बदलू इच्छितो तर?
- उत्तर : जर तुम्ही प्रवेश घेतलेला नसेल, तर तुम्ही पुढील फेरीपूर्वी तुमच्या अर्जामध्ये शाखेचा पर्याय व उच्च माध्यमिक विद्यालयांचा प्राधान्यक्रम बदलू शकता.
11th Class online Admission FAQ 2025
प्रश्न: जर अर्जातील माहिती व मूळ कागदपत्रांतील माहिती वेगळी आढळली तर काय?
- उत्तर: अशा प्रकरणांमध्ये विद्यार्थी नियमित फेऱ्यांमधून अपात्र ठरेल व त्याला फक्त Open to All फेरीमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात येईल.
प्रश्न: जर विद्यार्थ्याचे इयत्ता 10वीचे गुणपत्रक बनावट/फेरफार केलेले आहे, असे आढळून आल्यास ?
- उत्तर : अशा विद्यार्थ्याला शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेण्यापासून प्रतिबंधित केले जाईल आणि गुणपत्रक बनावट ठरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
प्रश्न : शून्य फेरी म्हणजे काय ?
- उत्तर: शून्य फेरी म्हणजे संस्थांतर्गत कोटा, व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्याक कोटा यामधील प्रवेशाचे कामकाज हे काम नियमित फेरी क्रमांक १ सोबत चालणार आहे.
प्रश्न : सर्वांसाठी खुली फेरी (Open to All Round) म्हणजे काय ?
- उत्तर : नियमित चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर ज्या फेरीमध्ये विद्यार्थ्याच्या फक्त इ.१० च्या गुणांच्या आधारेच गुणवत्ता यादी तयार करून त्यानुसार विद्यार्थ्याना उच्च माध्यमिक विद्यालय वाटप करण्याची फेरी होय.
11th Class online Admission FAQ 2025 च्या अधिक तपशीलवार मार्गदर्शक सूचना व माहितीसाठी https://mahafyjcadmissions.in संकेतस्थळावर भेट द्या किंवा हेल्पलाईनवर संपर्क साधा.
Thanks