Pariksha Pe Charcha Registration 2025: परीक्षा पे चर्चा शेवटच्या तारखेपूर्वी नोंदणी करा

Pariksha Pe Charcha Registration 2025: परीक्षा पे चर्चा 2025 हा कार्यक्रम महणजे देशभरातील विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांची उत्सुकता. PPC 2025 या कार्यक्रमाचे यंदाचे हे आठवे वर्ष आहे. या कार्यक्रमाची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून शेवटचे काही दिवस आहेत. या Pariksha Pe Charcha Registration 2025 च्या नोंदणीची लिंक आणि इतर संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

Pariksha Pe Charcha Registration

Pariksha Pe Charcha Registration 2025: परीक्षा पे चर्चा शेवटच्या तारखेपूर्वी नोंदणी करा

Pariksha Pe Charcha या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थी, पालक & शिक्षकांशी संवाद साधत असतात. मागील सात वर्षांमध्ये परीक्षा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामधून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची परीक्षा विषयीची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

Pariksha Pe Charcha 2025 कार्यक्रम कुठे होणार?

सन 2025 मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन टाउन हॉल भारत मंडपम नवी दिल्ली येथे जानेवारी 2025 मध्ये होणार आहे.

Pariksha pe charcha कार्यक्रमात सहभाग कसा घ्यावा?

या वर्षी होणारा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाची Registration प्रक्रिया सुरु झाली आहे. परीक्षा पे चर्चा नोंदणी लिंक खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

PPC 2025 साठी रजिस्ट्रेशन कसे करावे?

या कार्यक्रमात इयत्ता सहावी ते 12वी चे विद्यार्थी, त्यांना शिकवणारे शिक्षक, आणि विद्यार्थ्यांचे पालक या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात त्यासाठी खाली दिलेली प्रक्रिया करावी.

  • प्रथम वरील दिलेल्या लिंकवर किंवा https://innovateindia1.mygov.in/ वर क्लिक करावे.
  • त्यानंतर ‘Participate Now / सहभागी व्हा’ या बटणावर क्लिक करा.
  • मोबाईल क्रमांक किंवा ईमेल ID लिहावा
  • आलेला OTP लिहून नोंदणी करा
  • विद्यार्थ्याचा तपशील भरा खाली आलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे लिहा
  • पंतप्रधानाना 500 शब्दांचा प्रश्न विचारा
  • यामध्ये स्पर्धा इयत्ता 6 वी ते 12 वीच्या शालेय विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
  • जास्तीत जास्त 500 अक्षरांमध्ये विद्यार्थ्यांनी आपला प्रश्न मा पंतप्रधानांना सादर करावा.
  • पालक आणि शिक्षक देखील सहभागी होऊ शकतात.

PPC 2025 कार्यक्रम नोंदणीची शेवटची तारीख

14 जानेवारी 2024 पर्यन्त परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात नोंदणी करू शकतात.

Pariksha Pe Charcha 2024 मध्ये झालेला कार्यक्रम पहा

विद्यार्थ्यांना परीक्षा काळात तणावमुक्त कसे ठेवावे- Pariksha Pe Charcha

मागील वर्षी झालेल्या Pariksha Pe Charcha 2024 या कार्यक्रमामध्ये आंध्रप्रदेश आणि आसाम मधून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परीक्षा काळात तणावमुक्त कसे ठेवावे याविषयी प्रश्न विचारला.

PM Narendra Modi या कार्यक्रमात म्हणतात संगीतामध्ये मोठे सामर्थ्य आहे. विद्यार्थीच नाही तर जगाच्या पाठीवर प्रत्येक व्यक्तींचा तणाव दूर करण्याची क्षमता संगीतामध्ये आहे परंतु ते संगीताशी समरस झाला पाहिजे.
Pariksha काळातील ताण तणाव दूर ठेवण्यासाठी केवळ परीक्षा काळात मेहनत घेतली पाहिजे असे नाही तर शिक्षकांनी विद्यार्थी जेव्हा आपल्या वर्गामध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवतो तेव्हापासून ते परीक्षा काळापर्यंत त्या विद्यार्थ्यांसोबतच्या नात्यामध्ये दृढता वाढत गेली पाहिजे. शिक्षक विद्यार्थी हे केवळ विषयापुरता नाते नसावे. असे झाले तर विद्यार्थ्यांना ताण येणारच नाही. आणि हे नाते केवळ विषय शिकवण्या पुरते राहिले तर विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि पालकांना ताण येणारच आहे. ते स्वाभाविक आहे.

PM Narendra Modi Advice On Pariksha Pe Charcha

Pariksha Pe Charcha करताना PM Narendra Modi म्हणतात शिक्षकांनी मुलांच्या यशामध्ये पालक आणि परिवारपर्यंत जाऊन सहभागी झाले पाहिजे. ते साजरे केले पाहिजे. यामुळे शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि परिवार यामध्ये स्नेहाचे सहसंबंध वाढतील. यामुळे परीक्षेमध्ये ताण तणाव येणारच नाही. पुढे Modi म्हणतात एखाद्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी पारिवारिक कार्यक्रम जसे लग्न, लग्नाची पत्रिका दिली नाही तर शिक्षकांनी फक्त नोकरी केली त्याशिवाय काहीही साध्य झाले नाही असा अर्थ निघेल. कारण शिक्षकांचे काम हे केवळ शिकवणे नाही तर जीवन सुधारणे आहे.


FAQ – वारंवार विचारली जाणारी प्रश्न

परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम कोण आयोजित करते?

हा कार्यक्रम भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय कडून आयोजित केले जाते.

परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम सुरू होऊन किती वर्ष झाले?

हा कार्यक्रम सुरू होऊन आठ वर्षे झाली असून यंदाचे हे आठवे कार्यक्रम आहे.

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रम मध्ये कोण मार्गदर्शन करते?

या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करतात.

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रम मध्ये कोण सहभाग घेऊ शकतात?

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालक सहभाग घेऊ शकतात.

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रम मध्ये इयत्ता पहिली ते पाचवीचे विद्यार्थी  सहभाग घेऊ शकतात का ?

नाही, या कार्यक्रमामध्ये इयत्ता सहावी ते 12 वी चे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात.

Leave a Comment

error: कॉपी करताय???