Slogan For World Disability Day 2025: जगभरात 3 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. या 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन (World Disability Day) निमित्त शाळेसाठी, दिव्यांगाच्या विशेष शाळेसाठी, प्रभात फेरीसाठी, रॅलीसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी काही उपयुक्त घोषवाक्य (Slogan for World Disability Day 2025) या ठिकाणी देत आहोत नक्कीच आपल्याला त्याचा उपयोग होईल यात शंका नाही.
Slogan For World Disability Day 2025 | जागतिक दिव्यांग दिन घोषवाक्य

Slogan For World Disability Day 2025 ‘जागतिक दिव्यांग दिन घोषवाक्य
संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक दिव्यांग दिन 2025 या वर्षीची थीम The theme for the IDPD in 2025 is “Fostering disability-inclusive societies for advancing social progress” अशी ठेवली आहे. याचा अर्थ “सामाजिक प्रगतीसाठी अपंगत्व-समावेशक समाजांना चालना देणे” आहे.
Slogan For World Disability Day 2025 ‘जागतिक दिव्यांग दिन घोषवाक्य

Slogan For World Disability Day 2025

Slogan For World Disability Day 2025

जागतिक दिव्यांग दिन घोषवाक्य
दाखवून देऊ आम्ही पात्र
समावेशित शिक्षणात घराजवळ मिळते शिक्षण
सामान्यांबरोबर दिव्यांग बालक होते सक्षम
हक्क देऊ, संधी देऊ,
दिव्यांगाना प्रोत्साहन देऊ.
दिव्यांगाना देऊ संधी,
वाहील विकासाची नांदी.
सर्वांचा निर्धार,
दिव्यांगाचा स्विकार.
मिळून सारे ग्वाही देऊ,
दिव्यांगाना सक्षम बनवू.
दिव्यांगाचा सन्मान,
हाच आमचा अभिमान.
तुमचा आमचा एकच नारा,
दिव्यांगाना देऊ सहारा.
ऊठ दिव्यांग जागा हो,
समाजाचा धागा हो.
समाजाला जागवू या,
दिव्यांगाना सक्षम बनवूया.
एकासारखं दुसर नसतं सर्वांना बरोबर घ्यायचं असतं !
दिव्यांग असो, वा अपंग सगळ्यांनाच पुढे न्यायचं असतं..!
नको बोल सहानुभूतीचे,
शिक्षण द्या दिव्यांगाना हक्काचे..!
दिव्यांगाना समान संधी,
हिच प्रगतीची नांदी…!
सामावेशित शिक्षण आले दारी,
विशेष मुलांची प्रगती भारी.
समग्र शिक्षा अभियानाची निर्मिती,
सामान्य विद्यार्थ्यांसोबत दिव्यांगांची उन्नती !
हातात हात द्या,
विशेष मुलांना साथ द्या.
समाजाला जागवू या,
दिव्यांगांना सक्षम बनवूया.
दया नको संधी द्या !
विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांना सामावून घ्या.
डरने की क्या बात है।
हम दिव्यांग के साथ है !
दिव्यांगाचे शिक्षण,
प्रगतीचे लक्षण.
समावेशित शिक्षण,
दिव्यांगाच्या हक्काचे रक्षण.
दिव्यांगाना शिकवू,
समाजात त्यांना टिकवू.
एकमेकांच्या सहकार्यने एकत्र येणार,
दिव्यांगाचे निश्चित कल्याण होणार.
निरक्षरता निर्मूलनाचा एकच उपाय,
सर्वांच्या शिक्षणाशिवाय नाही पर्याय.
दिव्यांगाना साथ दया,
मदतीचा हात द्या.
लगंडा पांगळा म्हणु नका.
दिव्यांगाना हिनवू नका.
एक-दोन-तीन-चार, दिव्यांग म्हणजे नाही भार,
पाच-सहा-सात-आठ, अपंगांना दाखवा वाट.
अ-आई, ब-बाबा,
अपंग सुदधा मिळवतात शिक्षणावर ताबा.
शिक्षणाचा कायदा,
दिव्यांगाच्या शिक्षणाचा वायदा.
शिक्षणाचा अधिकार,
दिव्यांगाचा स्वीकार.
आता मनाशी ठरवा पक्कं,
शिक्षण दिव्यांगाचाही हक्क.
दिव्यांगाचे शिक्षण,
प्रगतीचे लक्षण.
सोडून देऊया वाईट अंधश्रद्धा चालीरीती,
दिव्यांगाच्या शिक्षणाला देऊया गती.
दिव्यांगाना देऊ समान वागणूक,
करूया त्यांच्या भावनांची जपणूक.
दिव्यांग मित्रांना सहानुभूती नव्हे,
विश्वास दाखवा.
दिव्यांग बांधवांना सन्मानाचा, समानतेचा हक्क देऊया,
चला, एक समतोल समाज घडवूया..
सहानुभूती नको,
आपुलकी दाखवा.
सहानुभूती नवे विश्वास देऊया,
प्रत्येक दिव्यांगाला आपुलकीची साथ देऊया.
सहानुभूती नको,
सहकार्य आणि आधार द्या.
मदतीसोबत संधीचा हात ठेवूया,
दिव्यांग बांधवांसाठी सन्मानाचे स्थान ठेवूया.
बोलता येत नसलं म्हणून काय झालं,
मला ही ‘वाचा’ आहे नां !
ऐकता येत नसलं म्हणून काय झालं,
मला ही ‘जाणीव’ आहे नां !
दिसत नसलं म्हणून काय झालं,
मला ही ‘स्पर्श’ आहे नां!
बुध्दि नसली म्हणून काय झालं,
मला ही ‘समज’ आहे नां !
चालता येत नसलं म्हणून काय झालं,
माझ्यातही ‘हिम्मत’ आहे नां !
दिव्यांग असलो म्हणून काय झालं,
‘मी’ ही एक ‘माणूसचं’ आहे नां..
देऊनी त्यांना समान वागणूक,
करूया त्यांच्या भावनांची जपणूक.
Please increas board exam time on blind student