Louis Braille Information in Marathi 2025 | महान शास्त्रज्ञ लुईस ब्रेल संपूर्ण माहिती

Louis Braille Information in Marathi 2025: जग पाहण्यापूर्वीच दृष्टी गेल्यामुळे अंधार पसरला परंतु संकटे आणि आव्हानेच नसतील तर ते जीवन कसले? गरज निर्माणच नाही झाली तर शोध लागतील तर कसे? एवढे होऊनही जे आपल्या वाटेला आले ते आभाळा एवढे संकट पृथ्वीतलावरील कोणत्याही बालकांवर किंवा व्यक्तीवर येऊ नये. कोणत्याही बालकाचे बालपण दृष्टी अभावी हिरावले जाऊ नये. मानवी जीवन मिळालेल्या  जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बालक आणि व्यक्ती ज्ञानापासून वंचित राहू नये यासाठी तिमिरापालिकडे जाऊन झगडणारा शिक्षक, एक महान संशोधक म्हणजे लुई ब्रेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Louis-Braille-Information-In-Marathi 2025Louis Braille Information in Marathi 2025 | महान शास्त्रज्ञ लुईस ब्रेल संपूर्ण माहिती

जीवन परिचय 

फ्रान्समधल्या कुप्रे या लहानश्या खेडेगावात मोनेक बॅरेन आणि  सायमन ब्रेल या दाम्पत्याच्या पोटी 4 जानेवारी 1809 साली एक असामान्य बाळाचा जन्म झाला ते म्हणजे लुई (Louis Braille). सर्वकाही अगदी सर्वसामान्य बालकप्रमाणे. गरीब आणि कष्टकरी ब्रेल परिवारात लहानश्या पाहुण्याच्या येण्याने आनंद पसरला.

Louis Braille Information in Marathi 2025

Louis Braille यांचे  वडील सायमन ब्रेल हे एक जिनगर होते. ते घोड्याचे खोगीरासारखे आणि इतर कातडी माल तयार करणारे उत्तम कारागीर म्हणून ओळखले जात होते.  आई मोनिक बॅरेन एका कष्टकरी शेतकऱ्याची मुलगी. लुई (Louis Braille) हे ब्रेल दाम्पत्याचे चौथे अपत्य. दोन बहिणी आणि एका भावाच्या पाठीवर लुईचा जन्म झालेला आणि परिवारात लहान असल्यामुळे तो सगळ्यांचा आवडता होता. ‘महान शास्त्रज्ञ लुईस ब्रेल संपूर्ण माहिती | Louis Braille Information in Marathi’

Louis Braille Information in Marathi 

वडील सायमन ब्रेल यांची स्वतःच्या व्यवसायाची एक कार्यशाळा होती. लहानगा लुई (Louis Braille) अगदी चालायला लागल्यापासून हट्ट करून आपल्या वडिलांसोबत कार्यशाळेत जाऊ लागला. प्रत्येक लहान बालक हा अ

नुकरणप्रिय असतो तसच लुई (Louis Braille) ही निरीक्षण आणी अनुकरण शक्तीने भरलेला होता. या बालवयात लुई वडिलांचे कामाचे अनुकरण करत असे. सायमनचे काम धारदार आणि टोकदार साहित्यासोबतचे असल्याने लहानग्या लुई (Louis Braille)कडे त्यांचे सतत लक्ष असे. कार्यशाळेतल्या लहानमोठ्या धारदार आणि टोकदार वस्तूपासून सायमन लुईला परावृत्त करत असे.

महान शास्त्रज्ञ लुईस ब्रेल संपूर्ण माहिती 

लुई जेमतेम तीनेक वर्षाचा असताना एक दिवस कार्यशाळेत वडील कोणाशीतरी बोलत बोलत कार्यशाळेच्या बाहेर गेले. तेवढ्यात लुई (Louis Braille)ने वडीलांचे अनुकरण करण्याच्या नादात एक टोकदार आरी उचलली आणि अनावधानाने ती आरी त्याच्या डोळ्यात घुसली. लुईला क्षणासाठी काहीही समजले नाही. लुई जागेवरच बेशुद्ध होऊन पडला.

वडिलांना हे कळल्यानंतर स्थानिक अनेक उपचार केले परंतु त्याने काही फरक पडेना. म्हणून वडिलांनी जवळच्या खेड्यातील नेत्रतज्ञाकडे लुईच्या डोळ्याचे उपचार केले. त्याने काहीसा फरक पडला. लुईला आराम वाटू लागले परंतु त्याच्या डोळ्याला संसर्ग झाले. पुढे हा संसर्ग वाढत दुसऱ्या डोळ्यापर्यंत वाढला आणी लुईला काहीही दिसेनासे झाले. जन्माने सामान्य जन्मलेल्या लुईला जग पाहण्या आधीच डोळ्यासमोर कायमचा अंधार पसरला. महान शास्त्रज्ञ लुईस ब्रेल संपूर्ण माहिती | Louis Braille Information in Marathi

इथे पहा जागतिक दिव्यांग अपंग दिन निमित घोषवाक्य 

कष्टकरी ब्रेल दाम्पत्यासमोर लुईची दृष्टी बाधित झाल्यामुळे त्याच्या भविष्याविषयीच्या चिंतेचे ढग जमा झाले. परंतु या अपघाती आलेल्या संकटाला न जुमानता सायमन आणि मोनिक बॅरन यांनी लुईला सतत प्रोत्साहित केले. आई वडिलांचे प्रोत्साहन आणि स्वतःच्या अलौकिक बुद्धिमतेमुळे लुई जगातील प्रत्येक संकटाशी सामना करण्याचा आत्मविश्वास बाळगत असे.

Louis Braille Information in Marathi 2025

शिकण्याची तीव्र इच्छा असली की प्रत्येक बालक शिकत असतो अगदी 3-4 वर्षाचा लुई  श्रवण, स्पर्श आणि वास संवेदनेच्या साहाय्याने घरातील तसेच  परिसरातील अनेक वस्तू सहज ओळखत असे. एवढेच नव्हे तर लहानगा लुई स्वतःची कमी सुद्धा स्वतः करत असे. दृष्टी गेल्यानंतरही एवढी चुणूक चाणाक्ष बुद्धिमत्ता पाहून एबे जॉक पॅलुय या पादरी मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाने लुईच्या शिक्षणाची दारे उघडली गेली. घरच्या घरी एबे जॉक पॅलुय यांनी वस्तू परिचय संगीत आणि बायबल यांचे शिक्षण सुरू केले. वर्षभराच्या काळानंतर लुईला गावातीलच सामान्य मुलांबरोबर सामान्य शाळेत पाठविण्यात आले. या काळात लुईला अनेक विषयाची आवड निर्माण झाली.

केवळ श्रवण, स्पर्श आणि वासाच्या संवेदनेच्या आधारावर त्याने केलेली प्रगत पाहून पादरी गुरू पॅलुय खूप प्रभावित झाले आणि वयाच्या दहाव्या वर्षी सन 1819 साली रॉयल इन्स्टिट्यूट फॉर ब्लाइंड या अंधांच्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. आणि खऱ्या अर्थाने लुईच्या दुसऱ्या अध्यायाचे पाने उघडली गेली. या शाळेत बैलेन्टाईन हाऊवे या प्रसिद्ध गुरुची भेट झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली लुई शिक्षणाचे धडे घेऊ लागला. “तीमिरापलीकडील दृष्टी – लुईस ब्रेल”

अंध मुलांच्या शाळेत प्रवेश घेणारा लुई हा सर्वात कमी वयाचा विध्यार्थी होता. लहानपणापासूनच लहानगा लुई विलक्षण प्रतिभेने भरलेला होता. या प्रतिभेतूनच इतिहास, भूगोल, गणित, फ्रेंच, ग्रीक या विषयाबरोबर संगीतकलेतही प्राविण्य मिळवले. जसजशी वर्षे लोटू लागली तस तसे लुई ला कळायला लागले आणि त्याची बुद्धी आणखी तल्लख होऊ लागले.

➤ हे माहित आहे का? स्टीफन हॉकिंग कोण होते?

लुईचे विषयज्ञान आणि कार्यकुशलतेच्या जोरावर काही वर्षानंतर त्यांना त्याच शाळेत शिक्षक या पदावर नियुक्त केले गेले. लुई शिक्षक असताना अंधांसाठी वापरल्या जाणाऱ्या भाषा व लिपिवर तेवढे संतुष्ट नव्हते. शिक्षणासाठी वापरली जाणारी भाषा व लिपी ही मर्यादित होती त्यात अनेक अडचणी येत होत्या.

Louis Braille Information in Marathi 2025

दृष्टीबाधित लोकांना जगाचे ज्ञान घेण्यासाठी लिपीशिवाय दुसरे मार्ग तोकडे पडत होते. ही बाब शिक्षक लुई यांना सारखी सतावत होती. याच काळात फ्रान्सचे सेवानिवृत्त सेनाअधिकारी चार्ल्स बार्बीयर यांनी सैनिकाच्या समस्या सोडविणे व संदेश वहनाकरिता  14 टिंबांची सांकेतिक लिपी तयार केली होती.  या लिपीने प्रभावित होऊन गुरु बैलेन्टाईन हाऊवेकडे सेवानिवृत्त सेनाधिकारी याना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार झालेल्या भेटीत चार्ल्स बार्बीयर याना त्यांच्या संकेत लिपीतील अनेक अडचणी निदर्शनास आणून दिले. ही उत्कटता आणि परखडपणा पाहून चार्ल्स बार्बीयर यांनी प्रोत्साहन दिले.

14 टिंबांच्या या लिपिवर तब्बल 8 वर्षे संशोधन करून वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी 1832 साली जगातील कोणतीही भाषा लिहू शकता येईल अशी 6 टिंबांच्या उठावदार लिपीचा विकास केला. ज्यामुळे दृष्टिहीन व्यक्तीना ज्ञान मिळविण्यासाठी युगानूयुगे बंद झालेले दार उघडली गेली. लुई ब्रेल यांनी केलेल्या 6 टीबांच्या लिपीच्या आविष्कारामुळे या लिपीस ‘ब्रेल लिपी’ या नावाने प्रसिद्धी मिळाली.

एवढ्यावर न थांबता 1837 साली ‘फ्रान्सचा संक्षिप्त इतिहास’ हे पुस्तक ब्रेल लिपीमध्ये लिहण्याची किमया या आदर्श शिक्षक महान संशोधक लुईस सायमन ब्रेल (Louis Braille) यांनी केली. परंतु सर्व विश्वाची मान्यता मिळवायला भरपूर कालावधी लागला. या सहा टिंबांच्या लिपीमध्ये नावीन्य आणि वैचित्र्य असल्यामुळे स्वतः लुई ब्रेल  यांनी या लिपीचा वापर स्वतःच्या शाळेतील दृष्टिहीन शिक्षकावर केला. त्यांना या लिपीशी परिचित केले. तेव्हा त्यांना जाणवू लागले की ही नवीन उठावदार टिंबांची लिपी वाचायला तर सुलभ आहे तसेच लिहण्यासाठीही सक्षम आहे. तरीही शाळेतील अधिकारी या लिपीस शिक्षणाचे माध्यम म्हणून स्वीकारायला तयार नव्हते..

लुईनी आपल्या जीवन कार्यात दृष्टिहीन व्यक्तींना सर्वोतोपरी सहाय्य केले. अनेक वर्षांच्या संशोधनातून तयार केलेल्या लिपीबाबतचे एक वास्तव सत्य म्हणजे ही लिपी दृष्टीबधितांसाठी उपयुक्त होती परंतु या लिपीच्या स्वीकृती आणि प्रसारासाठी त्यांनी कधी अट्टाहासही धरला नाही. परंतु जगाला उशिरा महत्व पटले आणि मान्यताही मिळाली.

आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य करत असताना त्यांनी अनेक विद्यार्थ्यांबरोबर नाते जोडले. ज्ञानदानाच्या या प्रक्रियेत त्यांनी स्वतः ला इतके वाहून घेतले की, स्वतःच्या प्रकृतीची त्यांना काळजी वाटली नाही परिणामस्वरूप वयाच्या ४३ व्या वर्षी म्हणजेच ६ जानेवारी १८५२ मध्ये क्षय रोगाने निधन झाले. स्थानिक प्रशासन अधिकाऱ्याच्या उपस्थितीत महान शास्त्रज्ञ लुईस ब्रेल यांच्या अस्थीचे अवशेष फ्रान्सच्या राष्ट्रध्वजात गुंडाळण्यात आले आणि दुखमय संगीत आणि राष्ट्रीय गाण यांच्या संगीतमय वाद्यातून मानवंदना देण्यात आली. आजही फ्रांसची राजधानी पॅरिस येथे दोन समाधिस्थळे आहेत.

या आदर्श शिक्षक आणि महान सांशोधकाच्या मृत्यूबद्दल कुणीही दखल घेतली नाही. खरे पाहिले तर ‘मरावे  परी कीर्ती रुपी उरावे’ असे लुई ब्रेल यांचे कार्य आहे. तब्बल १०० वर्षानंतर म्हणजेच २० जून १९५२ रोजी फ्रेंच शासनाच्या वतीने आदर्श शिक्षक, महान  संशोधक लुईस  ब्रेल व ब्रेल लिपीच्या सन्मानाचा दिवस उजाडला.

Louis Braille Information in Marathi 2025

  • संशोधक व शिक्षक यांच्या कार्याप्रती सन्मान म्हणून तसेच अखंड दृष्टीबाधीतांसाठी वरदान ठरलेल्यालिपीच्या सन्मानार्थ  भारत सरकारद्वारा सन २००९ मध्ये त्यांच्या नावे टपाल तिकीट सुरु करण्यात आले.
  • ब्रेल लिपी ही जवळपास १५० पेक्षा जास्त वर्षापासून जगभर वापरली जाते. अलीकडे तंत्रज्ञान विकसित झाले असले तरी ब्रेल लिपीचे महत्व अद्याप कायम टिकून आहे.शालेय वयातील पूर्णतः अंध मुलांना ज्ञान मिळविण्याचा एक सर्वोत्तम मार्ग म्हणून ब्रेलकडे पहिले जाते. स्पर्शाच्या माध्यमातून वाचन करून सहा टिंबांच्या साह्याने विद्यार्थी आपले शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

ज्याने स्वतः अंध असूनही इतरांना तीमिरापलीकडे जाऊनही शिकण्याचा शिकविण्याचा आणि संशोधनाचा एक नवा दृष्टीकोन दिला अशा या निर्मात्याला  शतशः नमन.

Leave a Comment

error: कॉपी करताय???