RTE Admission 2026-27 Maharashtra: ‘आरटीई’ प्रवेशासाठी यंदा १ लाख ११ हजार पेक्षा जास्त जागा; पहा आपल्या जिल्ह्यात किती जागा

RTE Admission 2026-27 Maharashtra: दरवर्षी RTE Act 2009 अंतर्गत वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी स्वयं अर्थ सहाय्यित, विनाअनुदानित शाळेमध्ये 25% Online Admission पद्धतीने राबविण्यात येते. यामध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्गामध्ये मोफत प्रवेश दिला जातो. RTE Admission 2026-27 Maharashtra विषयी जिल्हानिहाय माहिती व ऑनलाईन फॉर्म भरावयाची लिंक विषयी माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTE Admission 2026-27 Maharashtra

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रिये (RTE Admission Process) मध्ये पहिल्या टप्यात शाळा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार दिनांक 09 जानेवारी ते 30 जानेवारीदरम्यान शाळा नोंदणी (RTE School Registration) तसेच व्हेरिफिकेशनची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 8 हजार 490 शाळांची नोंदणी झाली असून प्रवेशासाठी यंदा 1 लाख 11 हजार 410 जागा उपलब्ध झाल्या आहेत.

RTE Admission 2026-27 Maharashtra Document 

आता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रवेशासाठीची विद्यार्थी नोंदणी (RTE Student Registration) सुरू करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार पालकांनी RTE Registration साठी लागणारी कागदपत्रे पत्रे तयार ठेवावीत.

RTE Admission 2026-27 जिल्हानिहाय जागा

जिल्हा  शाळा  RTE जागा 
अहिल्यानगर 348 3765
अकोला 183 1977
अमरावती 227 2545
भंडारा 87 925
बीड 212 2366
बुलडाणा 226 2933
चंद्रपूर 184 1651
छ. संभाजीनगर 542 4781
धाराशिव 111 1274
धुळे 99 1307
गडचिरोली 63 540
गोंदिया 123 1050
हिंगोली 76 867
जळगाव 253 3394
जालना 285 2602
कोल्हापूर 313 3327
लातूर 206 2251
मुंबई 253 4555
मुंबई 72 1398
नागपूर 634 6800
नांदेड 231 2803
नंदुरबार 42 358
नाशिक 391 5662
पालघर 268 5685
परभणी 181 1554
पुणे 907 17890
रायगड 268 4763
रत्नागिरी 92 804
सांगली 208 2080
सातारा 108 1030
सिंधुदुर्ग 46 271
सोलापूर 285 2944
ठाणे 556 10589
यवतमाळ 113 1376
वाशीम 95 1007
यवतमाळ 202 2286
एकूण  8490 111410

 

आपल्या जवळच्या शाळेत किती जागा आहेत कसे पाहावे 

  • प्रथम खालील RTE च्या वेबसाईट https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new  वर क्लिक करावे
  • त्यानंतर आपल्यासमोर RTE बाबत काही सूचना येतील. त्याखालील List of School (Along with Approve fee) यावर क्लिक करावे.
  • राज्य जिल्हा आणि By name वर क्लिक केल्यानंतर School Name लिहून सर्च करावे.
  • त्यानंतर उजव्या बाजूस आपल्यालाशालेची संपूर्ण माहिती मिळेल.
  • RTE मोफत प्रवेशासाठी किमान आठवी पर्यंत असणारी शाळा निवडावी जेणेकरून आठवीपर्यंत आपल्याला लाभ मिळेल.

RTE Admission 2026-27 Age Limit 

शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दि. १८-०९-२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानवीन दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे. संदर्भीय शासन निर्णयान्वये पूर्व प्राथमिक व इयत्ता १ली मधील शाळा प्रवेशासाठीचे किमान वय खालीलप्रमाणे निश्चत करण्यात येते.

इयत्ता किमान वय  कमाल वय
पहिली 5 वर्ष 11 महिने 15 दिवस 7 वर्ष 11 महिने 15 दिवस

RTE Admission 2026-27

  • RTE Admission 2026-27  बाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा प्रवेशावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांची कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये भाडेकरारनामा आणि आयकर उत्पन्न प्रमाणपत्र तसेच जातीचे प्रमाणपत्र यांची कसून तपासणी केली जाणार आहे.

RTE Admission 2026-27 Maharashtra

Leave a Comment

error: कॉपी करताय???