MO Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे कारण महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात तब्ब्ल 1440 रिक्त जागेवर भरती प्रक्रिया राबविण्या बाबत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. Arogya Vibhag अंतर्गत निघालेल्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन फॉर्म मागविण्यातले आहेत. MO Recruitment 2026 Notification, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लिंक आणि संपुर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
MO Recruitment 2026: सार्वजनिक आरोग्य विभागात मोठी भरती; तब्बल 1440 जागा
MO Recruitment 2026
महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट- “अ” (एस-20) या संवर्गातील “वैद्यकीय अधिकारी” या पदावरील भरतीकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
- इथे पहा MMRDAमध्ये 235 जागा
MMRDA Recruitment 2026: अर्ज करा; मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमध्ये २३५ जागांवर भरती सुरु
MO Recruitment 2026 Details
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत एम.बी.बी.एस. व पदव्युत्तर पदवी / पदविका ( एकूण-1440 पदे )च्या प्रवर्ग निहाय रिक्त जागेचा तपशील खालीलप्रमाणे
- अ.जा (SC): 71 जागा
- अ.ज (ST): 15 जागा
- विमाप्र (SBC): 54 जागा
- इमाव (OBC): 148 जागा
- एसईबीसी (SEBC): 144 जागा
- आदुघ (EWS): 144 जागा
- खुला (OPEN): जागा 864
- एकूण : 1440 जागा
MO Recruitment 2026 Notification
महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट “अ” या संवर्गातील “वैद्यकीय अधिकारी (एस-20) या पदावर सरळसेवेने पदभरती करण्यासाठी https://www.morecruitment.maha-arogya.com या संकेतस्थळावर संपूर्ण जाहिरात / अर्जाबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

- जाहिरातीत नमूद पदसंख्या व आरक्षण यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तसेच पदभरतीचे अनुषंगाने सर्व अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांनी राखून ठेवले आहेत.
MO Recruitment 2026 online form link
महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ‘अ’ या संवर्गातील “वैद्यकीय अधिकारी (एस-20) या पदावर सरळसेवेने पदभरती करण्यासाठी https://www.morecruitment.maha-arogya.com या संकेतस्थळावर संपूर्ण जाहिरात/अर्जाबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जाहिरात आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लिंक
उमेदवारांनी https://www.morecruitment.maha-arogya.com या संकेतस्थळावर सदर अर्ज पूर्णपणे ONLINE पद्धतीने भरावयाचे आहेत.
MO Recruitment 2026 Date
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज हे दि. 27.02.2026 ते दि. 20.03.2026 पर्यंत सादर करावेत.
- उपरोक्त नमूद पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वेतनश्रेणी, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, सूचना, निवडीचे निकष इत्यादी तपशिलासाठी तसेच सर्व माहितीसाठी सदर संकेतस्थळाला भेट द्यावी.
- वरील नमूद केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज सादर करावेत.
- उमेदवारांनी टपालाने, ई-मेल अथवा अन्य मार्गाने अर्ज करु नयेत, अशा प्रकारचे अर्ज केल्यास त्याची दखल घेतली जाणार नाही.

I am interested in applying for this post. Please guide me.