Beed Police Patil Bharti 2026: पोलीस पाटील मेगा भरती ”या जिल्ह्यात’ ११७६ जागांसाठी भरती जाहीर; दहावी पासवर नोकरीची संधी

Beed Police Patil Bharti 2026:किमान दहावी पास असणाऱ्या उमेदवाराचे आता नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार आहेत जिल्हाधिकारी कार्यालय बीडच्या वतीने Beed Police Patil Bharti 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून Beed Police Patil Bharti करिता ऑनलाइन फॉर्म मागविण्यात आले आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे पहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Beed Police Patil Bharti 2026

Beed Police Patil Bharti 2026 महत्त्वाच्या तारखा

पोलीस पाटील पदासाठी किमान आवश्यक पात्रता-

  1. अर्जदार हा दहावी (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावा.
  2. (अ) वयोमर्यादे करीता अर्जदारचे दिनांक 30 जानेवारी, 2026 रोजीचे वय विचारात घेतले जाईल. (ब) अर्जदाराचे वय दिनांक 30 जानेवारी, 2026 रोजी 25 पेक्षा कमी नसावे व 45 पेक्षा जास्त नसावे. (क) पोलीस पाटील पदाकरीता वयोमर्यादा शिथीलक्षम नाही.
  3. अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवासी असावा.
  4. अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा ई-मेल व मोबाईल क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे.
  5. अर्जदार शाररिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे.
  6. महाराष्ट्र राज्य सेवा नियम 2005 मधील लहान कुटूंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.) या बाबत शपथ पत्र दाखल करणे बंधनकारक राहील.
  7. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारस इतर आवश्यक कागदपत्रे जोडावे लागतील.

Beed Police Patil Bharti 2026 fees

  • पोलीस पाटील भरतीसाठी परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे ऑनलाईन भरावे लागेल
  • खुला प्रवर्ग 1000/-
  • राखीव प्रवर्ग 800/-

Beed Police Patil Bharti 2026 registration Process

  • पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाईन फॉर्म भरताना खालील प्रक्रिया पूर्ण करावी
  • अर्जदाराचे नाव आधार कार्ड/ दहावी प्रमाणपत्रानुसार असले पाहिजे.
  • विवाहित महिलांच्या अर्जावरील नाव वेगळे असू शकते. परीक्षेच्या वेळी परिशिष्ट -एफ सादर करा.
  • कृपया रेकॉर्डनुसार नाव मराठीत तपासा.
  • अर्जदाराचे वय २५ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असावे (दिनांक 26/01/2016 रोजी).
  • कृपया वैवाहिक स्थितीची योग्य खात्री करा.
  • अंतिम निकालानुसार (एसएससी प्रमाणपत्र) एसएससी तपशील बरोबर असणे आवश्यक आहे.
  • पत्ता आणि संपर्क तपशील काळजीपूर्वक प्रविष्ट करा.
  • जाहिरातीनुसार सर्व निकषांची पूर्तता करून रिक्त पदांची माहिती काळजीपूर्वक निवडा.
  • अर्जदाराने दिलेल्या पेमेंट पद्धतीने योग्य रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी.
  • अर्ज, फोटो, स्वाक्षरी, कागदपत्रे आणि अर्ज शुल्क भरणे पूर्ण केले असेल आणि अधिकाऱ्यांनी पडताळले असेल तरच अर्ज स्वीकारला जाईल.
  • अपडेट्स आणि सूचनांसाठी अर्जदाराला वेळोवेळी वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • Police Patil Bharti 2026 प्रक्रिया, तारखा आणि क्रियाकलापांमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार सक्षम प्राधिकारी कडे राखीव आहेत.

Beed Police Patil Bharti 2026 परीक्षा स्वरूप

  • पात्र ठरलेल्या उमेदवाराची जिल्हा स्तरावर परीक्षा घेण्यात येईल.
  • या परीक्षेमध्ये 80 मार्कांची लेखी परीक्षा आणि 20 मार्कांची तोंडी परीक्षा होईल.
  • 80 मार्कच्या लेखी परीक्षेमध्ये वास्तुनिष्ठ बहुपर्यायी 80 प्रश्न असती.
  • लेखी परीक्षा खालील विषयावर आधारित असेल
  • सामान्य ज्ञान
  • चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ताचाचणी
  • पोलीस पाटील यांचे अधिकार व कर्तव्य
  • स्थानिक परिसराची माहिती

Beed Police Patil Bharti 2026 महत्वाची सूचना

पोलीस पाटील भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर जाहिरात संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी संपुर्ण माहिती काळजीपुर्वक वाचुनच ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत.

प्रस्तुत पदाकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून विहित ऑनलाईन पध्दतीनेच भरलेले अर्ज व विहित पध्दतीने भरलेल्या परीक्षा शुल्कासह ग्राहय धरण्यात येतील इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.

सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देवून भरती प्रक्रियेची माहिती बाबत अदयावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहिल.

भरती प्रक्रिया / परिक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अंशता बदल करणे, पदाच्या एकुण गावनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट तसेच आरक्षणात बदल करण्याचे अधिकार तसेच प्रक्रिये संदर्भात प्राप्त तक्रारीबाबत निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार संबंधीत उपविभागीय दंडाधिकारी तथा अध्यक्ष, पोलीस पाटील निवड समिती यांना राहील.

Leave a Comment

error: कॉपी करताय???