Helen keller information 2025: सुप्रसिद्ध लेखिका, एक सुधारक, समाजवादी आणि विलक्षण असे व्यक्तिमत्व म्हणून डॉ. हेलेन केलर (Helen Keller) यांची प्रचीती होती. जागतिक पातळीवर प्रथम मूकबधिर पदवीधारक व्यक्ती (First Deaf Graduate Person in worldwide) म्हणून डॉ. हेलन केलर यांच्याकडे पाहिले जाते. दिव्यांगासाठीच्या यादीतील मानबिंदू आणि महिलांच्या हितचिंतक म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. पाहूया Great Personality Helen Keller यांच्या विषयी सविस्तर माहिती
Helen Keller information 2025 | प्रेरणासंपन्न हेलेन केलर यांचा जीवन परिचय

हेलेन केलर जीवन परिचय | Helen Keller information 2025
हेलेन केलर (Helen Keller) यांचा जन्म 27 जून 1880 रोजी टस्कम्बिया,अलाबामा, संयुक्त राज्य अमेरिका येथे झाला. जन्मानंतर अवघ्या 19 महिन्याचे वय असताना मेंदूवर झालेल्या आघातामुळे मूकबधिरत्व व अंधत्व असे एकत्रित अपंगत्व आले. (मूलतः हेलन ह्या जन्म त्या मूकबधिर नव्हत्या. एका दुर्धर मेंदूच्या आजारामुळे अंध व बधिरत्व आले होते.)

दिसायला सुंदर आणि आकर्षक असलेली हेलन अगदी वयाच्या सहाव्या महिन्यापासून बोलायला आणि वयाची बारा महिने पूर्ण होईपर्यंत चालायला शिकली होती. वयाच्या दीड वर्षापर्यंत हेलेन इतर मुलासारखे पाहू आणि ऐकू शकत होती.
Helen Keller and Teacher Anne Sullivan
Helen keller information 2025 सुरुवातीच्या काळामध्ये आलेल्या या दोन्ही अपंगत्वामुळे लहानग्या हेलनचा स्वभाव चिडचिडा झाला. असे असले तरी स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी 60 संदेश स्वतःच विकसित केले. यावरून हेलनच्या प्रतिभा शक्तीचा अंदाज बांधता येतो. आपल्या अतुल्य आणि विलक्षण प्रतिभेमुळे हेलेन केलर (Helen Keller) मूकबधिरत्व व अंधत्वाला समोरे जाऊन स्पर्शालाच वाचणे आणि समजण्याचे साधन म्हणून वापर करू लागल्या.

पुढे ऍनी सुलीव्हान नावाच्या शिक्षिकेने हेलनच्या जीवनात अमुलाग्र बदल घडून आणला. ऍनी सुलीव्हान या शिक्षकेच्या माध्यमातून इतरांशी संभाषण साधण्याचा कौशल्य डॉ हेलन केलर (Helen Keller) शिकल्या. हळूहळू अनुभवातून ही प्रतिभावंत हेलन शिक्षणाच्या प्रवाहात आली.
हेलेन केलर यांची कौटुंबिक माहिती Helen Keller Family Background
हेलन केलर यांचे वडील आर्थर एच. केलर आणि आई कैथरीन एडम्स केलर यांच्या दोन्ही मुलीमध्ये हेलन ही मोठी मुलगी होती. हेलनला दोन सावत्र भाऊ ही होते. हेलन चे वडील सैन्यामध्ये अधिकारी होते. केलर कुटुंबाची आर्थिक स्थिती जेमतेम सामान्य होती. कुटुंबासाठी शेती हेच उत्पनाचे साधन होते. पुढच्या काळात आर्थर हे ‘नॉर्थ अलबामियन’ या वृत्तपत्राचे संपादक म्हणूनही काम पाहिले.
हेलेन केलर यांची शैक्षणिक माहिती Helen Keller Education
ऍनी सुलीव्हान यांच्याकडून संभाषणाचे धडे घेतल्यानंतर वयाच्या आठव्या वर्षी 1888 साली अंधांसाठी असणाऱ्या पार्किंझ संस्थेत प्रवेश मिळवला. सन 1894 साली ग्रहम बेल यांच्या आशीर्वाद आणि कष्टामुळे न्यूयॉर्कला शिकण्यासाठी आली. सन 1900 मध्ये रेडक्लिप कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.या पदवीमुळे जगभरामध्ये पदवी मिळवणारी प्रथम मूकबधिर व्यक्ती म्हणून डॉ. हेलन केलर यांना ओळखले जाऊ लागले.

ग्रंथ संपदा Helen Keller information 2025
डॉ हेलन केलर यांनी त्यांच्या एका प्रोफेसरच्या प्रोत्साहनामुळे लिहण्यास प्रारंभ केला आणि पदवीपर्यंतच्या काळातच त्यांनी खालील विविध पुस्तकाचे लेखन केले
- गुडनेस ऑफ लाईफ
- ऑप्टिमिजम
- द स्टोरी ऑफ माय लाईफ
- द वर्ल्ड आऊट ऑफ डार्क
- द फ्रॉस्ट किंग आणि यासारखी 14 पुस्तके आणि 100 पेक्षाही जास्त लेख प्रकाशित झाले आहेत.
यातील ‘द फ्रॉस्ट किंग’ हे पुस्तक वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी लिहले होते. तर द स्टोरी ऑफ माय लाईफ या पुस्तकास अमाप प्रतिसाद मिळाला. काव्यात्मक स्वरूपाच्या या पुस्तकास त्यावेळी अद्भुत रचना म्हणून प्रसिद्ध मिळाली. ‘The Story of My Life’ हे त्यांचे आत्मचरित्र स्वरुपात लिहलेले लेखन आहे. यात बालपणापासून वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंतचे लेखन केले आहे.
हेलेन केलर यांचे सामाजिक जीवन Social Life of Helen Keller
कर्णबधिर व अंध असलेल्या हेलन केलरचे केवळ निबंध कविता आणि पुस्तके लिहिणे एवढेच कार्य नव्हते तर आपल्यासारख्या असणाऱ्या विकलांग बांधवा विषयी निस्सीम प्रेम व आदर होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ हेलन केलर पूर्णवेळ समाजसेवेमध्ये कार्यरत होत्या या काळात त्या ठीक ठिकाणी जाऊन व्याख्याने देणे, लेखन करणे, जनजागृती करणे यासारखी कामे करू लागल्या.

1906 मध्ये निर्माण झालेल्या मेसाचूएट्स कमिशनमध्ये सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. हे कमिशन नेत्रहीनसाठी नेमलेले कमिशन होय. याद्वारे त्यांनी अंधत्वाची कारणे उपचार प्रतिबंधात्मक उपायावर भर देणारी भरीव कामगिरी केली.
1915 मध्ये त्यांनी सुप्रसिद्ध शहर रचनाकार जॉर्ज केसलर सोबत राहून अंधत्व आणि कुपोषणाच्या दुष्परिणाम प्रतिबंधासाठी एक समर्पित संस्था हेलन केलर इंटरनेशनल ची स्थापना केल्या.
1920 मध्ये त्यांच्या मदतीने अमेरिकन सिविल लिबर्टी यूनियनची स्थापना केली. हेलन केलर ह्या समाजवादी पार्टी सहभागी होऊन समाजवादाविषयी अनेक लेख लिहले. समाजवादी चिंतनात्मक निबंधाचा एक संग्रह त्यांनी आऊट ऑफ द डार्क या पुस्तकाद्वारे प्रकाशित केला.
हेलेन केलर (Helen Keller) यांचा देश विदेशातील प्रवास
आपल्या लेखणीतून अनेक देशांमध्ये जाऊन त्यांनी बालमजुरी, मृत्युदंड, जनसंख्या नियंत्रण यासारख्या विषयावर देश विदेशात आपली लेखणी बुलंद केली. अमेरिकन फाउंडेशन ऑफ द ब्लाईंडद्वारा त्यांनी अंधाच्या ज्वलंत समस्यावर अनेकदा बुलंद आवाजात (लेखणीतून) सूचना केल्या. त्यांचेच फलित मधून 1935 मध्ये तेथील सामाजिक विकास न्याय मंत्रालयाच्या दहाव्या अध्यायात अनुदान साठी आर्थिक मदतीचे कायदे केले गेले.
अमेरिकेकडून त्यांनी लिहिलेल्या शोधनिबंधासाठी मिळालेल्या 8000 डॉलर पुरस्कारामधून त्यांनी अंधांसाठी मदत म्हणून कोषागार स्थापन केले. त्यांच्या या अथक प्रयत्नाद्वारे उद्बोधन झालेल्या असंख्य देशात दिव्यांगांसाठी स्वतंत्रपणे विचार केला जाऊ लागला.
सन 1946 ते 1957 या काळात Helen Keller यांनी पाच खंडातील 35 पेक्षा जास्त देशांचा प्रवास केला. वयाच्या 75 व्या वर्षी आपल्या जीवनातील सर्वात दूरचा आणि कठीण प्रवास सुरु केला. यात आशियामधील 40 हजार मैलाचा प्रवास केवळ पाच महिन्यात पूर्ण केला. या काळातही आपल्या संभाषण व भेटीतून त्यांनी या खंडातील लोकांना प्रेरणा दिली. “हेलेन केलर जीवन परिचय | Helen Keller information 2025”
हेलेन केलर (Helen Keller) यांन मिळालेले पुरस्कार व सन्मान
पुरस्कार व सन्मानापलीकडे कार्य असणाऱ्या हेलन केलर यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यातील्काही निवडक पुरस्कारांचा उल्लेख या ठिकाणी केला आहे.
- सन 1936 मध्ये थियोडोर रूजवेल्ट विशेष सेवा पुरस्कार.
- महान कार्याबद्दल सन 1964 मध्ये अमेरिकेचा सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्कार त्यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
- सन 1965 मध्ये नॅशनल वुमन हॉल ऑफ फेम मध्ये त्यांची निवड झाली.
- स्कॉटलैंडच्या ग्लासगो यूनिवर्सिटी, जर्मनीच्या बर्लिन यूनिवर्सिटी आणि भारताच्या दिल्ली विद्यापीठच्यावतीने मानद डॉक्टरेट ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले
हेलेन केलर (Helen Keller) यांचे निधन | (Helen Keller’s death)
सन 1961 मध्ये हेलन केलर यांना एका नंतर एक असे कितीतरी स्ट्रोक आले आणि त्यांतर आपले उर्वरित जीवन त्यांनी आपल्या घरीच राहून व्यतीत केले.
हेलन केलर यांच्या 88व्या जन्मदिवसाच्या काही आठवडे अगोदर म्हणजे 1 जून, 1968 रोजी अनंतात विलीन झाल्या. हेलन केलर यांनी त्यांच्या इच्छाशक्ती, कठीण परिश्रम आणि आपल्या कल्पनाशक्ती च्या जोरावर आपल्या जीवनातील दिव्यांगत्वाला आपली शक्ती स्थान बनवून जगासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला.
भारतात अलीकडेच प्रदर्शित झालेला आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेला ब्लॅक चित्रपट त्यांच्या आठवणी पुन्हा पुन्हा ताज्या केल्यावाचून राहत नाही.