Hind Di Chadar Certificate 2026: असे मिळवा “हिंद दि चादर 2026” कार्यकर्माचे सहभागी प्रशस्तीपत्र

Hind Di Chadar Certificate 2026: शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांनी आपल्या आयुष्यात अन्याय, धार्मिक असहिष्णूता आणि आत्याचारविरोधात लढा दिला. म्हणूनच त्यांना “हिंद-दी-चादर” (Hind Di Chadar) या नावाने गौरविले जाते. या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गुरु तेग बहादूर यांच्या विषयी अधिक माहिती इथे पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hind Di Chadar Certificate 2026

Hind Di Chadar 2026

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे सन 2025-26 हे 350 वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने त्यांचा गौरवशाली इतिहास, त्यांनी दिलेले बलिदान आणि समाजातील त्यांचे कार्य सर्वांना माहित व्हावे, या उद्देशाने व्यापक प्रचार आणि प्रसिद्धीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

MAHA-TET २०२५ निकाल इथे पहा 

Hind Di Chadar Certificate 2026 सहभागी होण्यासाठी लिंक

सदर उपक्रम राज्यभरातील शासकीय कार्यालय विविध विभाग तसेच सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा महाविद्यालयात राबविले जात आहे. Hind Di Chadar 2026 सहभाग नोंदणी व प्रमाणपत्र मिळविणे.

१1. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धे मध्ये सहभाग नोंदविल्यामुळे प्रशस्तीपत्र मिळणार असून https://gurutegbahadurshahidi.com/student-competition या लिंकचा वापर करावा,

2. शाळेमध्ये घेतल्या गेलेल्या प्रभातफेरी / निबंध / चित्रकला / गायन स्पर्धा / वक्तृत्व स्पर्धा / डॉक्युमेंटरी आणि इतर activities च्या जास्तीत जास्त नोंदी कराव्यात. यासाठी पुढील लिंक वापरावी.

https://gurutegbahadurshahidi.com/event-activity-registration

3. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेवकांनी पुढील लिंकचा वापर करावा

https://gurutegbahadurshahidi.com/voluntary/register

सर्टिफिकेट असे करा डाउनलोड

  • वरील लिंकवर क्लिक कराआणि खालील माहिती भरा
  • स्पर्धा प्रकार
  • कार्यक्रमाचे नाव
  • विषय
  • विद्यार्थ्यांचे नाव
  • शाळेचे नाव
  • जिल्हा, तालुका
  • पत्ता
  • कार्यक्रमाचा फोटो उपलोड करा
  • व्हिडीओ उपलोड करा आणि सबमिट करा

Hind Di Chadar 2026 कार्यक्रमात सहभागी शाळा

सदर कार्यक्रमाचे प्रसार व प्रचार करण्याकरिता राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळा, आश्रमशाळा आणि महाविद्यालयांमध्ये (अनुदानित, विनाअनुदानित व अल्पसंख्याक दर्जा प्राप्त) शाळा सहभागी असणार आहेत. सर्व शाळामध्ये सदर कार्यक्रमाचे गाणे सकाळी प्राथमिकच्या वेळी किंवा इतर सुयोग्य वेळी वाजवून कार्यक्रमाची प्रसिध्दी करण्यात येणार आहे.

Hind Di Chadar 2026 प्रभातफेरी

“हिंद-दी-चादर” या कार्यक्रमाच्या प्रसारासाठी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात यावे. प्रभातफेरीतील घोषवाक्य पुढीलप्रमाणे :

  • हिंद दी चादर, श्री गुरु तेग बहाद्दर
  • मानवता की सच्ची मिसाल, भाई सती दास, भाई मतदार और भाई दयाल
  • शहादत की सच्ची मिसाल भाई सती दास भाई मती दास और भाई दयाल.
  • शिश कटे पर पीछे ना हटे, धर्म के खातीर मर मिटे.
  • शीश कटे पर पीछे ना हटे, मानवता के खातीर मर मिटे…
  • गुरु की शहादत याद करो, मानवता की राह धरो.

Hind Di Chadar 2026 निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धासाठी विषय

  • सहा समाज आणि श्री गुरु तेग बहादूर यांचे नाते.
  • “सिख, सिकलीकर, बंजारा, मोहियाल, सिंधी, लबाना” या समाजाचे श्री गुरुतेग बहादुर यांचे नाते. श्री गुरु तेग बहादूर साहेब यांचे शिकवण,
  • भाई सती दास आणि भाई मती दास यांचे गुरु प्रति समर्पण.
  • श्री गुरु तेग बहादुर यांचा गृहस्थाश्रमातील कालखंड,
  • श्री गुरुतेग बहादुर यांचे बालपण आणि त्यांचा गृहस्थश्रमातील कालखंड.
  • श्री गुरु तेग बहादुर यांचा बाबा बकाला येथील कालखंड.
  • श्री गुरु तेग बहादूर यांना “हिंद दी चादर” असे का संबोधित करतात.
  • तेज बहादुर सन्मानाची कथा.
  • भाई माखन शहा लबाना यांना झालेला दिव्य साक्षात्कार,
  • श्री गुरु तेग बहादूर यांचा बाबा बकाला ते आनंदपुर चा प्रवास.
  • श्री गुरु तेग बहादूर यांचे पटना येथील वास्तव्य,
  • भाई सती दास, भाई मती दास, भाई दयाला आणि भाई दिलीप जी यांची शहादत.
  • श्री गुरुतेग बहादूर यांचा मानवतावादी दृष्टिकोन.

Hind Di Chadar Certificate 2026 फ्लायर्स वरील विषय

  • क्षमा करना सर्वश्रेष्ठ परोपकारीता है, जो दुनिया में इर्षा को मिटा कर प्रेम को जन्म देत आहे. (श्री गुरु तेग बहादूर)
  • तेरा कहा मीठा लगे, हरिनाम पदारथ नानक मागे. (श्री गुरु तेग बहा‌दूर)
  • “इन्सान को वैभव, सुख और स्थायी शांती तब हि प्राप्त होगी, जब कोई व्यक्ती अपने भितर बैठे स्वार्थ को पुरी तरह से समाप्त कर देगा। (श्री गुरु गोबिंद सिंघ साहिब जी)
  • अंध, गुरु बिनु समझ ना आवे गुर बिनु सुरती न सिथी बिनु मुक्ती न पावै ! (श्री गुरु तेग बहादूर साहिबजी)
  • ईश्वर एक है। सदा एक हि ईश्वर कि उपासना करो, ईश्वर सब जगह और प्राणी मात्र में मौजूद है!
  • ईश्वर कि भक्ती करने वालों को किसी का भय नहीं रहता। (श्री गुरु नानक देव जी)

Hind Di Chadar Certificate 2026 डॉक्युमेंटरी –

“हिंद-दी-चादर” या कार्यक्रमांतर्गत गुरु तेग बहादुर साहीबजी यांच्या जीवनावरील आधारित गीत व डॉक्युमेंटरी विद्यार्थ्यांना दाखवून https://gurutegbahadurshahidi.com/event-activity या लिंक वर प्रत्येक विभाग निहाय आपली सक्रियता अपलोड करावी.

प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान
  • जिल्हास्तरावर प्रथम / द्वितीय / तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते दि. 25 जानेवारी 2026 रोजी “हिंद-दी-चादर” या कार्यक्रमाच्या वेळी गौरविण्यात येणार आहे.
  • पथनाट्य : सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने पथनाट्य आयोजित करून त्याच्या व्हिडिओ क्लिपस उपरोक्त लिंक्स मध्ये आपलोड करावेत.
  • भित्तिपत्रके : आपणास देण्यात आलेले साहित्याचा वापर शाळांमध्ये प्रत्यक्ष होत आहे का याची खात्री करून भित्तिपत्रकांचे वाचन घेण्याच्या सूचना द्याव्यात.

 

2 thoughts on “Hind Di Chadar Certificate 2026: असे मिळवा “हिंद दि चादर 2026” कार्यकर्माचे सहभागी प्रशस्तीपत्र”

Leave a Comment

error: कॉपी करताय???