Kendrapramukh Bharti Exam 2025: प्रतीक्षा संपली ! केंद्रप्रमुख (समूह साधन केंद्र समन्वयक) परीक्षेची तारीख जाहीर

Kendrapramukh Bharti Exam 2025: अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेली केंद्र प्रमुख भरती २०२५ या परीक्षेच्या तारखेबाबत अनेक पात्र शिक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला लागली होती. आता प्रतीक्षा संपली ! केंद्रप्रमुख (समूह साधन केंद्र समन्वयक) परीक्षेची तारीख जाहीर करण्याबाबत राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने Kendrapramukh Bharti Exam 2025 बाबत प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kendrapramukh Bharti Exam 2025

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2025 महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण2022/प्र.क्र. 81/टीएनटी 1, दि. 15/09/2022व शासन निर्णय दि. 29/08/2025 अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2025” या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे.

Kendrapramukh Bharti Exam 2025 Date 

  • राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आलेली परिपत्रकानुसार Kendrapramukh Bharti Exam 2025 दि. 32/02/2026 व 04/02/2026 या कालावधीत प्रत्येकी तीन सत्रामध्ये आयोजन करण्यात येत आहे.

केंद्रप्रमुख भरती 2025 Admit Card

परीक्षेविषयीच्या परीपत्रकानुसार Kendra Pramukh Exam Admit Card ऑनलाईन पद्धतीने परीक्षार्थी/उमेदवारांच्या लॉगिनमध्ये लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. खालील अधिकृत लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल

https://ibpsreg.ibps.in/mscepoct25/

तरी परीक्षार्थी/उमेदवारांनी वेळोवेळी www.mscepune.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

Leave a Comment

error: कॉपी करताय???