KP Exam Result 2026: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या समूह साधन केंद्र समन्वयक अर्थात केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2025 च्या निकालाबाबत नुकतेच परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आज दिनांक 13 मार्च 2026 रोजी KP Exam Result 2026 जाहीर करण्यात आला आहे.
KP Exam Result 2026: समूह साधन केंद्र समन्वयक अर्थात केंद्रप्रमुख परीक्षेचा निकाल जाहीर
KP Exam Result 2026
- इथे पहा RTE 25% मोफत प्रवेश फॉर्म सुरु

- पूर्ण राज्याची एकच यादी आल्यामुळे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये लागतो की नाही याबाबत सर्वांना संभ्रम निर्माण झाला आहे.
- यापुढे TET / CTET पास असेल तर नव्याने लिंक भरावी लागणार आहे.
- त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याची नव्याने सिलेक्शन लिस्ट लागेल.
- त्यामुळे कट ऑफ घसरू शकतो.
- आत्ताचा कट ऑफ अंतिम नाही, तो TET/CTET ची माहिती भरल्यानंतर फायनल होईल.
—–
- महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2025” या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. 03 व 04 फेब्रुवारी 2026 या कालावधीत तीन सत्रामध्ये आयोजन करण्यात आले होते.
- सदर परीक्षा ह्या IBPS मार्फत online घेण्यात आल्या होत्या.
- सदर परीक्षेस एकूण 46, 068 परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते. त्यापैकी परीक्षेस एकूण 38, 558 परीक्षार्थी उपस्थित होते.
KP Exam Result Date
सदर समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2025 परीक्षेचा निकाल आज दि. 13 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येत असून सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या परीक्षार्थी/उमेदवारांची गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वरील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
महत्वाच्या सूचना
- TET/CTET या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झालेल्याची माहिती भरण्याची लिंक यथावकाश www.mscepune.in या संकेतस्थळावर देण्यात येईल.
- सदर परीक्षेची माहिती भरताना जो प्रवर्ग, दिव्यांगत्व इत्यादी नमूद केले असेल तेच नमूद करावे.
- संबंधित परीक्षार्थी उमेदवारांनी www.mscepune.in या संकेतस्थळास भेट द्यावी.