Latur DCC Bank Bharti 2026 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी चालून आहे आहे कारण लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये वेगवेगळ्या पदांच्या तब्बल 375 जागांवर भरती प्रक्रिया सुरु झाली असून आता या Latur DCC Bank Bharti 2026 चे ऑनलाईन फॉर्म भरण्याचे शेवटचे काही दिवस उरले आहेत. तेव्हा खालील संपूर्ण माहिती वाचा आणि दिलेल्या लिंकवरून Latur DCC bank भरती चा फॉर्म भरा.
Latur DCC Bank Bharti 2026: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठी भरती; लगेच अर्ज करा

Latur DCC Bank Bharti 2026
दै लोकमत, एकमत आणि पुण्यनगरी या प्रसिद्ध वर्तमान पत्रामधून देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये लिपिक, शिपाई आणि वाहचालक या पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
Latur DCC Bank Bharti 2026 Vacancies
लातूर डी सी सी बँकेमध्ये जाहिरातीनुसार खालील पदसंख्येनुसार भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
- लिपिक (लेखनिक) : 250 जागा
- शिपाई : 115 जागा
- वाहचालक : 10 जागा
सर्व पदांसाठी कोणत्याही प्रकारचे सामाजिक आरक्षण व समानंतर आरक्षण लागून नाही. भरती करावयाच्या पदाच्या संखेमध्ये बदल करण्याचा अधिकार बँकेस राहणार आहे.
Latur DCC Bank Bharti 2026 online form date
पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरता येईल.
ऑनलाईन परीक्षेची तारीख, ऍडमिट कार्ड आणि कागदपत्रे तपासणी विषयीची कार्यवाही Latur DCC bank Website: https://laturdccb.com/ वर वेळोवेळी जाहीर करण्यात येईल. उमेदवारांनी Latur DCC bank वेबसाईट पाहणे आवश्यक आहे.
Latur DCC Bank Bharti 2026 Important Links
सदर भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा होणार असून खालील वेबसाईट वरून फॉर्म भरता येईल.
- लातूर डीसीसी बँक संकेतस्थळ : https://laturdccb.com/
- ऑनलाईन फॉर्म वेबसाईट
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33109/96994/Index.html
Latur DCC Bank Bharti 2026 Education Qualification
लिपिक पदासाठी शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार दिनांक 30.11.2025 रोजी किमान 21 वर्ष पूर्ण केलेला असावा किंवा 30 वर्षापेक्षा जास्त नसावा.
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट असावा व पदवी कालावधीतील सरासरी किमान 60% गुण मिळवुन उत्तीर्ण असावा.
- उमेदवार महाराष्ट्र राज्य, उच्च व तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसांचे तत्सम शासकीय संगणक प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. (मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक पदवी / पदवीका असल्यास अट शिथील राहील.)
शिपाई पदासाठी पात्रता :
- उमेदवार दिनांक 30.11.2025 रोजी किमान 19 वर्ष पूर्ण केलेला असावा किंवा 28 वर्षापेक्षा जास्त नसावा.
- उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण किमान गुण 60% अनिवार्य.
वाहचालक पदासाठी पात्रता
- उमेदवार दिनांक 30.11.2025 रोजी किमान 19 वर्ष पूर्ण केलेला असावा किंवा 28 वर्षापेक्षा जास्त नसावा.
- उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण किमान गुण 60% अनिवार्य.
- मोटार वाहन अधिनियम 1988 (क्र.59/1988) प्रमाणे वैध व कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन (एल.एम.व्ही.) चालविणेचा परवाना (ड्रायव्हिंग लायसेंस) असावे. हालके / जड वाहन चालविणेचा पुर्ण कार्यकाळ (पोस्ट रेकॉर्ड) स्वच्छ असावे, उमेदवार शारीरीक दृष्ट्या सदृढ व निर्व्यसनी असावा. मराठी / इंग्रजी भाषा लिहीता, वाचता व बोलता येणे आवश्यक. कॅरेक्टर सर्टीफिकेट सादर करणे आवश्यक.
Latur DCC Bank Bharti 2026 Application Fees
- लिपिक 900/-
- शिपाई 900/-
- वाहचालक 900/-
- शुल्क ना परतावा असेल.
Latur DCC Bank Bharti 2026 Selection Process
- सदर परीक्षा ऑनलाईन संगणकाधारित 90 गुणांची (90प्रश्न ) होईल.
- 10 गुणांची मुलाखत घेण्यात येईल.
- गुणांनुक्रमे निवड होईल.
Latur DCC Bank Bharti 2026 Details
उपरोक्त माहिती शिवाय नियम अटी आणि वेतन भत्ते सह इतर माहितीसाठी खालील दिलेल्या संकेतस्थळवरील जाहिरात पाहावी.
- लातूर डीसीसी बँक संकेतस्थळ : https://laturdccb.com/
- ऑनलाईन फॉर्म वेबसाईट
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33109/96994/Index.html