Mira Bhayandar Mahanagar Palika Bharti 2025: अर्ज करा !! मीरा भाईंदर महानगपालिकेमध्ये विविध पदांची मोठी भरती

Mira Bhayandar Mahanagar Palika Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सुवर्णसंधी चालून आली आहे कारण मीरा भाईंदर महानगपालिका भरती विभागाच्या वतीने गट-क मधील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदे ही प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, लेखापरिक्षण सेवा, अभियांत्रिकी सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, उद्यान सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, निमवैद्यकीय सेवा, इत्यादी सेवेमधील आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mira Bhayandar Mahanagar Palika Bharti 2025

Mira Bhayandar Mahanagar Palika Bharti 2025 प्रक्रियेत तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरातीनुसार गट-क संवर्गामधील एकूण 358 पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 05:00 वाजल्यापासून ते दि.12 सप्टेंबर 2025 या रोजीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.

Mira Bhayandar Mahanagar Palika Website

मीरा भाईंदर महानगरपालिका भरती जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी महानगरपालिकेच्या www.mbmc.gov.in अधिकृत संकेतस्थळावर दि.12 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11:55 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत.

Mira Bhayandar Mahanagar Palika Bharti 2025 Vacancies

विविध संवर्गातील भरावयाच्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

  1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 27 जागा
  2. कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) 02 जागा
  3. कनिष्ठ अभियंता (विद्युत) 01 जागा
  4. लिपिक टंकलेखक 03 जागा
  5. सर्व्हेअर (सर्वेक्षक) 02 जागा
  6. नळ कारागीर (प्लंबर) 02 जागा
  7. फिटर 01 जागा
  8. मिस्त्री 02 जागा
  9. पंप चालक 07 जागा
  10. अनुरेखक 01 जागा
  11. विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) 01 जागा
  12. कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) / संगणक प्रोग्रामर 01 जागा
  13. स्वच्छता निरीक्षक 05 जागा
  14. चालक-यंत्रचालक 14 जागा
  15. सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी 06 जागा
  16. अग्निशामक 241 जागा 
  17. उद्यान अधीक्षक 03 जागा
  18. लेखापाल 05 जागा
  19. डायलिसीस तंत्रज्ञ 05 जागा
  20. बालवाडी शिक्षिका 05 जागा
  21. परिचारिका/अधिपरिचारिका (स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ) (G.N.M) 05 जागा
  22. प्रसविका (ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ) (A.N.M) 12 जागा
  23. औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी 05 जागा
  24. लेखापरीक्षक 01 जागा
  25. सहायक विधी अधिकारी 02 जागा
  26. तारतंत्री (वायरमन) 01 जागा
  27. ग्रंथपाल 01 जागा
  28. एकूण जागा – 358 जागा

Mira Bhayandar Mahanagar Palika Bharti Notification

Mira-Bhayandar-Mahanagar-Palika-Bharti 2025

Mira Bhayandar Mahanagar Palika Bharti Fees Details

  • खुला प्रवर्ग – 1000/-
  • मागास प्रवर्ग – 900/-
  • माजी सैनिक – शुल्क माफ

अर्ज व परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पध्दतीनेच भरणे आवश्यक आहे.

Mira-Bhayandar-Mahanagar-Palika-Bharti-2025-1

MBMC Bharti Important Instruction 

  • उमेदवारास प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करुन त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
  • परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-Refundable) आहे. ऑनलाईन शुल्क भरतांना बँकेचे इतर शुल्क उमेदवाराला स्वतः भरावे लागतील. कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित / रद्द झाल्यास उमेदवारास परीक्षा शुल्क परत करण्यात येणार नाही.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत / तपशील तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्यात यावी. तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वेतनश्रेणी, वयोमर्यादा / वयोमर्यादा शिथिलता, निवड पध्दत, सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशील मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या http://www.mbmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे

Leave a Comment

error: कॉपी करताय???