NMMC Bharti 2026: नोकरीच्या शोधात असणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापानेवरील गट अ, गट ब आणि गट क संवर्गातील विविध पदाच्या 132 जागावर सरळसेवेने भरती प्रक्रिया रबावली जात आहे. NMMC Bharti 2026 विषयी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर खालील विविध पदांच्या 132 जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. NMMC Bharti 2026 मधील पदनिहाय रिक्त जागा पहा.
सहायक आयुक्त – 05 जागा
महापालिका उपसचिव – 01 जागा
सहायक विधी अधिकारी – 01 जागा
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 08 जागा
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – 04 जागा
वैद्यकशास्त्र तज्ञ – 16 जागा
शल्य चिकित्सक – 10 जागा
स्त्रीरोग तज्ञ – 21 जागा
बालरोग तज्ञ – 17जागा
क्ष किरण तज्ञ – 11 जागा
विकृतीशास्त्र तज्ञ – 02 जागा
इंटेन्सिव्हिस्ट – 04 जागा
बधिरीकरण तज्ञ – 05 जागा
अस्थीव्यंग तज्ञ – 04 जागा
त्वचारोग तज्ञ – 01 जागा
रक्त संक्रमण अधिकारी – 01 जागा
मेडिकल रेकॉर्ड किपर अधिकारी – 01 जागा
वैद्यकीय अधिकारी (उरोरोग व क्षयरोग तज्ञ) – 02 जागा
कनिष्ठ वैदयकीय अधिकारी – 17 जागा
पशुवैदयकीय अधिकारी – 01 जागा
एकूण जागा 132
NMMC Bharti 2026 Online Form
नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 04 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 11:59 पर्यंत खाली दिलेल्या वेबसाईटवरून ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे.
ऑनलाईन फॉर्म बरोबरच शुल्क ऑनलाईन भरावायचे असून खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये शुल्क आकारण्यात आला आहे.
NMMC Bharti 2026 Age Limit
दि.01/12/2025 या दिनांकास उमेदवार खालील नमूद केलेल्या विहीत वयोमर्यादेतील असावा.
अ) अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे
ब) मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे
क) नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमीत आस्थापनेवर कार्यरत असलेले मागासवर्गीय उमेदवारांसाठी 50 वर्षे मर्यादेपर्यंत व खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 45 वर्षे मर्यादेपर्यंत अशी वयोमर्यादा शिथील.
ड) नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर करार पध्दतीवर कार्यरत असलेल्या कर्मचा-यांना वयोमर्यादा शिथील.