NMMS Exam Result 2026: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दिनांक 28 डिसेंबर, 2025 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल (NMMS Exam Result 2026 )आज दिनांक 24/02/2026 जाहीर करण्यात आला आहे.
NMMS Exam Result 2026: एनएमएमएस परीक्षेचा निकाल जाहीर; इथे पहा डायरेक्ट निकाल
NMMS Exam Result 2026
पालक आणि विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादीखालील संकेतस्थळावर पाहायला मिळणार आहे.
https://2026.mscenmms.in/result
RTE फॉर्म भरण्यासाठी लिंक
https://shaleyshikshan.com/rte-admission-online-form-2026/
RTE Online form 2026-27: अखेर!!! आर.टी.ई प्रवेशाची वेबसाईट सुरु; इथे पहा सूचना
NMMS Exam Result 2026 link
विद्यार्थी पालक आणि पालकांना परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in/ या संकेतस्थळावर दि. 24/02/2026 रोजी पासून पाहता येईल. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणयादी दि. 24/02/2026 रोजी परिषदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in/ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
NMMS Exam Result 2026 Correction
सदर यादीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड, संचकोड, माध्यम इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. 05/03/2026 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
- ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष, अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- सर्व दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
- सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बानलेस उत्तरपत्रिका देण्यात आलेली असल्याने पेपरची गुणपडताळणी केली जात नाही.
- शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी जाहीर झाल्यानंतर निवडयादीत कोणताही बदल करण्यात येणार नाही.
- सदर परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित 40% गुण मिळणे आवश्यक आहेत.
- (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचीत जमाती (ST) व दिव्यांग विद्यार्थ्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित 32% गुण मिळणे आवश्यक आहेत)
