RTE Admission 2024-25 Maharashtra: राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून आरटीई कायद्यामध्ये (RTE Act) मोठा बदल केला आहे. त्यामुळे यंदाच्या RTE Admission Process मध्ये पालकांना नवीन बदल दिसून येणार आहेत. दरवर्षी आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील बालकांना नामांकित खाजगी विनाअनुदानित शाळेमध्ये RTE अंतर्गत Free Admission दिला जात असे. परंतु आता आरटीई कायद्यामध्ये मोठा बदल; आता सरकारी शाळांना प्राधान्य दिला जाणार आहे. पाहूया सविस्तर खालीलप्रमाणे
RTE Admission 2024-25 Maharashtra: आरटीई कायद्यामध्ये मोठा बदल; आता सरकारी शाळांना प्राधान्य
RTE Admission 2024-25 Maharashtra: आरटीई कायद्यामध्ये मोठा बदल; आता सरकारी शाळांना प्राधान्य
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आरटीई मोफत प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल केला आहे. शासनाच्या वतीने तसा अध्यादेशही (राजपत्र) जारी करण्यात आला आहे.
RTE Admission 2024-24 मधील बदल
- शिक्षण हक्क कायदा RTE 2009 अंतर्गत आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमधील 25% जागा आरक्षित असतात.
- यामध्ये English Medium School ची संख्या जास्त आहे. राज्यभरातून साधारण 1 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना RTE 25%Admission दिले जाते. या विद्यार्थ्यांची शाळेची फीस शासनाकडून भरली जाते.
- परंतु आरटीई कायद्यातील नवीन बदलामुळे आता RTE Admission 2024-25 Maharashtra मध्ये शासकीय किंवा अनुदानित शाळेच्या 1 किलोमीटर परिसरात असलेल्या विना अनुदानित शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
- अलीकडेच प्राथमिक शाळेच्या वेळा बदलल्या नंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक खाजगी शाळेमधील दर्जेदार शिक्षणापासून आर्थिक व सामाजिक मागास प्रवर्गातील बालके वंचित राहू शकतात अशी पालकमधून चर्चा करण्यात येत आहे.
RTE प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे
RTE मोफत प्रवेश संपूर्ण माहिती
RTE Admission 2024-25 Maharashtra अंतर्गत या शाळा अपात्र
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE 2009) राज्यामध्ये सामाजिक, आर्थिकदृष्ट्या वंचित व दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या खासगी शाळांमधील 25% प्रवेशांबाबत शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. आता ज्या खासगी शाळेच्या एक किलोमीटर परिसरात सरकारी किंवा अनुदानित शाळा आहेत, अशा शाळांमधील 25% जागांवर वंचित व दुर्बल घटकांतील मुलांचे प्रवेश केले जाणार नाहीत. थोडक्यात RTE Admission 2024-25 Maharashtra मध्ये या शाळा आरटीईअंतर्गत या प्रवेशांसाठी पात्र नसतील.
RTE Admission 2024-25 Maharashtra लवकरच सुरू
महाराष्ट्र बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क नियम, 2024 मध्ये हे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक Private School 25% Admission साठी राबविल्या जाणाऱ्या केंद्रीय प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडणार आहेत. परिणामी प्रवेशासाठीच्या जागांची संख्याबळ कमी होणार आहे. पालकांना आपल्या घराजवळील सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक राहणार आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून हे बदल लागू होतील. त्यामुळे गेले काही महिने उशीर झालेल्या RTE Admission Process ला सुरू होणार आहे.
RTE Admission 2024-25 Portal Link
RTE Admission 2024-25 Maharashtra अंतर्गत मोफत प्रवेशासाठी पालकांनी वेळोवेळी RTE Portal च्या अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे भेट दिली पाहिजे RTE Admission 2024-25 साठी https://education.maharashtra.gov.in/ इथे क्लिक करा त्यानंतर आलेल्या पेज वर असलेल्या RTE 25 % Admission यावर क्लिक करावे
RTE Admission 2024-25 Maharashtra New Rules
शासनाला मिळालेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, 2011 सुधारित करण्यासाठी खालील नियम तयार करीत आहे ते म्हणजे :-
- या नियमांस महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (सुधारित) नियम, 2024 असे म्हणावे.
- महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, 2011 मधील नियम 4 (यापुढे सदर नियम असा उल्लेख करण्यात येईल.) उप नियम (5), नंतर खालील शर्तीचा समावेश करावा, जसे की:-
- “परंतु असे की, महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (वंचित व दुर्बल गटातील बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर कमीत कमी 25 टक्के प्रवेश करण्याची पद्धत) नियम, 2013 नुसार वंचित व दुर्बल घटकातील 25 टक्के प्रवेशाकरीता ज्या खाजगी विना अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात शासकीय शाळा व अनुदानित शाळा आहेत अशी शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून निवडण्यात येणार नाही.”
- नियम 8 च्या उप नियम (2), नंतर खालील शर्तीचा समावेश करावा, जसे की:-
- “परंतु असे की, नियम 4 च्या उप नियम (5) खाली निवडण्यात आलेली कोणतीही खाजगी विना अनुदानित शाळा कलम 12 च्या उप कलम 2 नुसार प्रतिपूर्तीकरिता पात्र ठरणार नाही.”
RTE Admission 2024-25 Maharashtra
RTE Admission 2024-25 Maharashtra FAQ
प्रश्न RTE चा full form / Long form काय आहे ?
RTE चा full form / Long form Right to Educationआहे यास Right to Education act असेही ओळखले जाते. यानुसार मुलांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे.
प्रश्न RTE Admission 2024-25 Maharashtra मध्ये खाजगी शाळेमध्ये प्रवेश मिळेल का?
होय, RTE Admission 2024-25 Maharashtra मध्ये खाजगी शाळेमध्ये प्रवेश मिळेल परंतु ती शाळा सरकारी अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेपासून 1 किलोमीटर अंतरापासून दूर असली पाहिजे आणि विद्यार्थ्या निववासापासून 1 किलोमीटर च्या आत पाहिजे
ye galat nirnay he