RTE Admission 2025-26: आरटीई मोफत प्रवेशाची प्रक्रिया आता अंतिम टप्यात पोहचली आहे. 10 फेब्रुवारी 2025 रोजी RTE Lottery 2025-26 जाहीर करण्यात आली त्यानुसार दिनांक 14 फेब्रुवारी 2025 पासून प्रवेशासाठी निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार पालकांना 15 दिवसाचा कालावधी RTE Admission 2025-26 साठी देण्यात आला आहे. त्यास आता शेवटची दोन दिवस उरले आहेत. परंतु RTE Admission साठी निवड झालेल्या 1लाख 1967 विद्यार्थ्यापैकी केवळ 29 हजार 140 विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले आहेत.

RTE Admission 2025-26 : आरटीई मोफत प्रवेशाचे 25% प्रवेश निश्चित; आणखी 80 हजारापेक्षा जास्त प्रवेश पेंडिंग
RTE Admission 2025-26 Selection List
शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये आरटीई 25% मोफत प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पाहण्यासाठी RTE Website – https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new वरील Selected / मूळ निवड यादी वर क्लिक करून पाहता येणार आहे.
RTE Admission 2025-26 Documents
आरटीई प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 14 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्याच्या कालावधीमध्ये बालकांच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षाकित प्रती घेऊन जायचे आहे. यासोबतच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट आपल्या लॉगिन मधून काढून घेऊन जायची आहे. (RTE Login इथून करा) अडचण आल्यास पडताळणी समितीकडे जाऊनही प्रिंट काढता येईल. तसेच कागदपत्रे जमा करताना RTE Portal वरील हमी पात्राची प्रिंट देखील घेऊन जावी. (RTE हमीपत्र डाउनलोड करा)
RTE Admission 2025-26 लॉटरी अशी खात्री करा
आरटीई ऑनलाईन प्रवेश 2025-26 साठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना RTE Lottery SMS त्यांच्या मोबाईलवर आलेले आहेत. परंतु पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE Portal वरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून RTE Lottery लागली किंवा नाही याची खात्री करून घ्यावी.
RTE Admission 2025-26 रिसीट घेणे
आरटीई प्रवेशासाठी दिलेली शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 पूर्वी प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या पालकांनी वर दिल्याप्रमाणे कागदपत्रे जमा करावी आणि विहित मुदतीत ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा. तसेच आपला ऑनलाईन प्रवेश निश्चित झाला असल्याची रिसीट पडताळणी समितीकडून घ्यावी.
RTE Admission 2025-26 Waiting List
नवीन वर्षांमध्ये प्रवेशासाठी निश्चित झालेल्या झालेल्या विद्यार्थ्यांना शिवाय प्रतीक्षा यादी (Waiting List) तील विद्यार्थ्यांना पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांच्या फेरीनंतर मॅसेज येतील. परंतु पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्याची मुदत संपने आवश्यक आहे. असे असले तरीही पालकांनी RTE Portal वरील अर्जाची स्थिती या टॅब वरून स्थिती जाणून घेता येईल.
- RTE Portal लिंक : https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new
- पालकांसाठी RTE check लिंक : https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login
- RTE प्रवेशासाठी वयाची अट इथे पहा
- RTE प्रवेशासाठी कागदपत्रे पहा
RTE Admission 2025-26 District Wise Confirm
आजपर्यंत जिल्हा निहाय प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या खालीलप्रमाणे.
- अहिल्या नगर – 1407
- अकोला – 713
- अमरावती – 731
- भंडारा – 312
- बीड – 706
- बुलढाणा – 835
- चंद्रपूर – 564
- छ संभाजीनगर – 678
- धाराशिव – 292
- धुळे – 259
- गडचिरोली – 118
- गोंदिया – 435
- हिंगोली – 311
- जळगाव – 1145
- जालना – 408
- कोल्हापूर – 1028
- लातूर – 279
- मुंबई – 1151
- मुंबई – 421
- नागपूर – 1087
- नांदेड – 491
- नंदुरबार – 118
- नाशिक – 1302
- पालघर – 1687
- परभणी – 241
- पुणे – 4061
- रायगड – 981
- रत्नागिरी – 129
- सांगली – 445
- सातारा – 850
- सिंधुदुर्ग – 19
- सोलापूर – 993
- ठाणे – 3423
- वर्धा – 546
- वाशीम – 305
- यवतमाळ – 670
एकूण – 29140