RTE Online Admission 2025-26 : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम अर्थात RTE Act 2009 अंतर्गत वंचित घटकातील मुलांना राज्यातील स्वयं अर्थ सहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा या शाळेमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर मोफत प्रवेश दिला जातो. ही प्रक्रिया पूर्णता: ऑनलाईन असून राज्यस्तरावरून राबविण्यात येते. आता नवीन वर्ष 2025-26 साठी RTE Online Admission प्रक्रिया सुरु झाली आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

RTE Online Admission 2025-26: आरटीई ऑनलाईन मोफत प्रवेशासाठी यंदा १०८२४३ जागा
RTE Online Admission 2025-26: आरटीई ऑनलाईन मोफत प्रवेशासाठी यंदा १०८२४३ जागा
मागील वर्षी RTE Admission Online Process मागे पडल्यामुळे प्रवेशासाठी विलंब झाला होता. यावर्षी RTE Online Admission 2025-26 साठी विलंब होऊ नये म्हणून प्रक्रिया लवकर सुरु करण्यात आली आहे.RTE Online Admission 2025-26 च्या प्रक्रियेमधील पहिला टप्पा पूर्ण झाला असून हा टप्पा शाळा व विद्यार्थी संख्या नोंदविण्याचा होता. यानुसार 2025-26 साठी राज्यातील 8827 शाळांनी नोंदणी केली असून या शाळामधून तब्बल 1 लाख 8 हजार 243 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. मागील वर्षापेक्षा या वर्षीची संख्या वाढली असल्यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
RTE Online Admission साठी कोणती मुले पात्र?
RTE Online Admission 2025-26 साठी खालील 12 संवर्गातील विद्यार्थी पात्र आहेत.अनुसूचित जातीअनुसूचित जमाती
- विमुक्त जाती (अ)
- भटक्या जमाती (ब)
- भटक्या जमाती (क)
- भटक्या जमाती (ड)
- इतर मागासवर्ग (OBC)
- विशेष मागासवर्ग (SBC)
- सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास घटक
- HIV बाधित /प्रभावित बालके
- अनाथ बालके
- दिव्यांग बालके
यांचा समावेश होतो. तर आर्थिक दुर्बल घटकामध्ये ज्या पालकांचे उत्पन्न आर्थिक वर्षांमध्ये एक लाखापेक्क्षा कमी असेल त्यांचा समावेश होतो.
- जिल्हा निहाय प्रवेशासाठी जागा
- अहिल्या नगर – 3287 जागा
- अकोला – 1992
- अमरावती – 2420
- भंडारा – 827
- बीड – 2167
- बुलढाणा – 2818
- चंद्रपूर – 1527
- छ संभाजीनगर – 4408
- धाराशिव – 1151
- धुळे – 1125
- गडचिरोली – 500
- गोंदिया – 1011
- हिंगोली – 790
- जळगाव – 3168
- जालना – 2086
- कोल्हापूर – 3257
- लातूर – 2173
- मुंबई – 4685
- मुंबई – 1368
- नागपूर – 7005
- नांदेड – 2728
- नंदुरबार – 359
- नाशिक – 5296
- पालघर – 5142
- परभणी – 1381
- पुणे – 17828
- रायगड – 4578
- रत्नागिरी – 782
- सांगली – 1997
- सातारा – 1858
- सिंधुदुर्ग – 268
- सोलापूर – 2662
- ठाणे – 11326
- वर्धा – 1291
- वाशीम – 1011
- यवतमाळ – 1971
एकूण – 108243
RTE 25% Admission पोर्टल 2025 – 26
शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या RTE प्रवेश प्रक्रियेसाठी पहिल्या टप्यात शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या वर्षीकरिता RTE 25 % प्रवेश प्रक्रिये अंतर्गत RTE प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2024 पासून सुरु होत आहॆ. सर्व आरटीई 25 टक्के प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती RTE च्या वेबसाईटवर अपडेट करण्यात आली आहे.
FAQ वारंवार विचारली जाणारे प्रश्न
- RTE अंतर्गत मोफत प्रवेशकोणत्या वर्गासाठी दिला जातो?
इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर मोफत प्रवेश दिला जातो.
- RTE अंतर्गत इयत्ता दुसरी पासून पुढील इयत्तेत प्रवेश दिला जातो का?
नाही, RTE Act 2009 नुसार केवळ इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्गामध्ये प्रवेश दिला जातो.
- RTE अंतर्गत Free Admission साठी फॉर्म कसा भरावा?
RTE अंतर्गत free admission साठी शासनाने दिलेल्या वेळेत ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो.
- RTE ची अधिकृत वेबसाईट काय आहे?
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new
FAQ वारंवार विचारली जाणारी प्रश्न
प्रश्न – वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र (वडिलांचे/बालकाचे): उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता असते का?
उत्तर वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र (वडिलांचे/बालकाचे): उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकतानाही.
प्रश्न: जातीचा दाखला कोणत्या अधिकारी यांनी दिलेला असावा?
उत्तर तहसीलदार/ उपजिल्हाधिकारी/उपविभागीय महसूल अधिकारी याांचे प्रमाणपत्र. पालकाचा (वडिलांचा/बालकाचा) जातीचा दाखला आवश्यक. परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही.
प्रश्न : RTE मोफत प्रवेश दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळतो का?
उत्तर होय, RTE मोफत प्रवेश दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळतो. दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश वंचित घटकामध्ये केला जातो.
प्रश्न RTE Admission साठी दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाण पत्राचा पुरावा कोणता असाव?
उत्तर दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाण पत्राचा पुरावा जिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकीय अधीक्षक, अधिसुचित जिल्हा शासकीय रुग्णालय याांचे 40 टक्के आणि त्या पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
एच.आय.व्ही. बाधित / प्रभावित असल्यास प्रवेश मिळतो का कोणते पुरावे आवश्यक आहे?
होय. प्रवेश मिळतो आवश्यक कागदपत्रे: जिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र
अ) कोव्हीड प्रभावित बालक (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले) अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागद पत्रे – वंचित गटातील बालकांमध्ये कोव्हीड प्रभावित बालक (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले) प्रवर्गातील बालकांचा समावेश करण्यात आला आहे.
अ) सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबधित पालकाचे मृत्यु प्रमाणपत्र
ब) कोव्हीड 19 मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र. (Medical Certification of Cause of Death (Form No.4), (SeeRule7)) सदर मृत्यू कोव्हीड 19 शी संबधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे शासकीय/पालिका/महानगरपालिका, रुग्णालय अथवा आय.सी.एम.आर. नोंदणीकृत खाजगी रुग्णालय/प्रयोगशाळा यांचा अहवाल.