RTE Online form 2026-27: अखेर!!! आर.टी.ई प्रवेशाची वेबसाईट सुरु; इथे पहा सूचना

RTE Online form 2026-27: सकाळपासून प्रतीक्षा करणाऱ्या पालकांना दिलासा मिळाला आहे. कारण  RTE Online form 2026-27 आता सुरु झाले आहे. परंतु आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते पालकांनी खालील सूचना वाचाव्यात. RTE WEBSITE सुरु करताना काही अडथळे आल्यास पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा. RTE Online form 2026-27 link आणि इतर सूचना खालीलप्रमाणे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTE Online form 2026-27 link

RTE Admission 2024-25 Registration Link क्लिक करा

RTE Admission 2026 -27 Registration Link for Parent Student  क्लिक करा

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login

RTE Online form 2026-27 बाबत पालकांकरीता सूचना

  • RTE Admission 2026-2027  या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पालन करूनच अर्ज भरून पूर्ण करावा.
  • पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि Google Location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे.
  • पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.
  • आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावा.
  • एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही!
  • सन 2026-27 साठी फक्त 1 किमी अंतरपर्यंतच्या शाळा उपलब्ध होतील.
  • प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे आवश्यक आहे.

RTE Online form 2026-27 Document

  • अर्ज भरत असताना  आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत.
  • लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.
  • अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.
  • एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये.
  • एकाच बालकाचे  2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे  दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज  लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.
  • अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला  मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.
  • अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.
  • अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .
  • RTE 25% प्रवेश 2026-2027 या वर्षाकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 28/02/2026 पर्यंत राहील.
  • दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.
  • सन 2026-2027 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .
  • सन 2026-2027 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.
  • अर्ज भरताना location चुकू नये म्हणून Google Map वर पत्ता टाकून मिळालेले Latitude, Longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही

https://shaleyshikshan.comबालकाच्या जन्मतारखेबाबत : दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित rtemah2020@gmail.com वर इमेल पाठवावा.

नावामध्ये थोडासा बदल जरी केला तर तो फॉर्म शोधून वगळून टाकण्यात येईल .
उदा .

  1. Abhijeet and Abhijit are same.
  2. Sameeksha – Samiksha
  3. Nitin – Neeteen – Netin
  4. Anup – Anuup – Aanup
  5. Vikram – Veekrm -Vikkaram
  6. Usuf – Yusuf – Yusuupf All are same. अशा सर्व शक्यता सिस्टिम मध्ये शोधून तो फॉर्म वगळून टाकण्यात येईल .
  7. चेक लिस्ट : जन्मदिनांक, बालकाचे पहिले नाव, वडिलांचे नाव, आडनाव आणि आईचे नाव.

Leave a Comment

error: कॉपी करताय???