RTE online form Last Date 2026: आरटीई फॉर्म मुदतवाढी बाबत मोठी बातमी; या तारखेपर्यंत पालकांना फॉर्म भरता येणार

RTE online form Last Date 2026: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दुर्बल व वंचित घटकाकरीता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश सन2026 प्रक्रियेसाठी मुदतवाढ देणेबाबत नुकतेच परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आले आहे. त्यानुसार खाली दिलेल्या तारखेपर्यंत (RTE online form Last Date 2026) पालकांना फॉर्म भरता येणार आहेत. परिपत्रक शेवटी दिले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTE 1KM च्या अटीबाबत वाचा

RTE online form Last Date 2026

  • बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (सी) (1) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा या शाळांमध्ये आरटीई 25टक्के सन 2026-27 या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पदधतीने राबविण्यात येत आहे.
  • शासन निर्णय दि. 12/02/2026 नुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना 25टक्के प्रवेश प्रक्रिया राबविणेबाबत सुधारित सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
  • त्यानुसार क्षेत्रिय स्तरावरील सर्व संबंधित कार्यालय व बालकांच्या पालकांनी खालील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

RTE online form Last Date 2026

  • बालकांच्या पालकांकडून आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. 17/02/2026 ते दि. 10/03/2026 या कालावधीपर्यंत https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
  • तरी आपणास कळविण्यात येते की, आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी बुधवार, दि. 18/03/2026 पर्यंत मुदतवाढ येत आहे.

RTE Online form 2026-27 link

RTE Admission 2024-25 Registration Link क्लिक करा

RTE Admission 2026 -27 Registration Link for Parent Student  क्लिक करा

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login

  • याबाबत आपल्यास्तरावरुन संबंधितांना कळविण्यात यावे असे विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व, शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई मनपा / शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर/दक्षिण/पश्चिम, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. सर्व, प्रशासन अधिकारी म.न.पा./ न.पा. सर्व,  गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, सर्व यांना उद्देशून परिपत्रक जरी करण्यात आले आहे.

RTE Online Admission Date 2026

Leave a Comment

error: कॉपी करताय???