Savitribai Phule Mahiti Marathi : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले | बालिका दिवस

Savitribai Phule Mahiti Marathi: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (दि. 03 जानेवारी 1831 – 10 मार्च 1897) भारतातील पहिल्या शिक्षिका, भारतीय श्रीमुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या आणि आद्य आधुनिक विद्रोही मराठी कवयित्री. Savitribai Phule यांचा जन्म दि. 03 जानेवारी 183 रोजी सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले | बालिका दिवस : Savitribai Phule Mahiti Marathi

सावित्रीबाई यांचा विवाह सन 1840 मध्ये जोतीराव गोविंदराव फुले (Jyotirao Govindrao Phule) यांच्याशी झाला. लग्नानंतर जोतीरावांनी त्यांना घरीच शिक्षण द्यायला सुरुवात केली.

सावित्रीबाई फुले – पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका

दि. 01 जानेवारी, 1848 रोजी जोतीरावांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मागासवर्गीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि सावित्रीबाई वयाच्या 17 व्या वर्षापासून त्या शाळेत विनावेतन शिकवू लागल्या. Savitribai Phule या शाळेच्या पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या. काही धर्ममार्तंडांनी धर्म बुडाला अशी ओरड केली व ते सावित्रीबाईंवर धर्मबुडवी म्हणून शेणमाती फेकू लागले. तरी सुध्दा सर्व विरोधाला धैर्याने तोंड देत त्यांनी आपली आगेकूच चालूच ठेवली.

Savitribai Phule Mahiti Marathi

सन 1851 मध्ये फुले दांपत्याने चिपळूणकरांच्या वाड्यातील आणि रास्ता पेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना केली. दि.10 सप्टेंबर 1853 या दिवशी जोतीरावांनी आपल्या काही सहकाऱ्यासह मागासवर्गीय लोकांस विद्या शिकविण्याकरिता मंडळी या नावाची संस्था स्थापन केली. सन 1863 साली जोतीराव व सावित्रीबाईंनी गंजपेठेतील राहत्या घरात विधन स्त्रियांच्या समस्या लक्षात घेऊन बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.

सावित्रीबाई फुले – दत्तक पुत्र

त्यातीलच एका काशीबाई नावाच्या विधवेचा यशवंत नामक मुलगा फुले दांपत्याने दत्तक घेतला. समता, स्वातंत्र्य आणि विवेकनिष्ठा वा तत्त्वांवर आधारित नवा आधुनिक समाज निर्माण करण्याचे जोतीरावांचे ध्येय होते. त्यासाठी दि. 24 सप्टेंबर, 1873 रोजी त्यांनी सत्यशोधक समाजाची (Satyashodhak Society) स्थापना केली. दि.28 नोव्हेंबर 1890 रोजी जोतीरावांचे निधन झाले. जोतीरावांनंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ती अखेरपर्यंत सांभाळली. सन 1893 साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

सावित्रीबाई फुले – निधन

सन 1876-77 आणि सन 1896 या काळात महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला होता. त्या वेळी सावित्रीबाईंनी गोरगरिबांना खूप मदत केली. सत्यशोधक समाजाद्वारे ठिकठिकाणी अन्नछत्रे उघडून सुमारे 2000मुलामुलीची भोजनाची व्यवस्था त्यांनी केली. सन 1897 पासून पुण्यात प्लेगची साथ आली, तेव्हा मृत्यूला न घाबरता सावित्रीबाईनी प्लेगबाधित रुग्णाची सेवाशुश्रूषा केली; पण अखेर त्यांना प्लेगची बाधा होऊन त्यातच त्यांचे दि 10 मार्च 1897 रोजी  दुर्देवी निधन झाले.

Savitribai Phule Granth sampada

सावित्रीबाई या एक प्रतिभासंपन्त्र कवयित्री होत्या, मात्र दीर्घकाळ त्यांचे साहित्य महाराष्ट्राला ज्ञात नव्हते. सन 1988 मध्ये अभ्यासक डॉ. मा. गो. माळी यांनी सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय या ग्रंथाद्वारे त प्रकाशात आणले.

सावित्रीबाईंच्या काव्यफुले (1854) या काव्यसंग्रहात एकूण 41 कविता आहेत. सावित्रीबाईचा दुसरा कवितासंग्रह बावनकशी सुबोध रत्नाकर (1892) म्हणजे जोतीरावांचे काव्यमय असे आद्यचरित्रच होय. या कवितासंग्रहामध्ये वैदिक काळ ते इग्रजी राजवट आणि फुलेंची चळवळ असा भारतीय इतिहासाचा मोठा पट सावित्रीबाईंनी मांडला आहे.

सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता

सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून सन 1995 पासून 03 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन बालिकादिन (Balika Din) म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाईंच्या कार्याचे कांतिकारी स्वरूप लक्षात घेऊन त्यांना क्रांतिज्योती ही उपाधी दिली गेली. तसेच दि.09 ऑगस्ट 2014 या दिवशी पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University Pune असं करण्यात आले. Savitribai Phule Mahiti Marathi

सावित्रीबाई फुले – भाषण

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष,

पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो
सर्वांना माझा नमस्कार
Krantijyoti Savitribai Phule या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सावित्रीबाई यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले असे आहे. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 साली झाला. 1840 साली सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिराव फुले (Mahatma Jyotiba Phule) यांच्याशी झाला.
.
 दिनांक 1 जानेवारी 1848 साली भिडे वाड्यात ज्योतिराव व सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. तत्कालीन कर्मठ समाजाच्या विरोधाचा सामना करून सावित्रीबाईंनी स्वतः शिक्षण घेतले आणि नंतर शिक्षिका बनुन मुलींना शिक्षण दिले. विधवा महिला व विधवा गरोदर महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधक गृह समर्थपणे चालवल्या.
आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी काव्य फुले व बावनकशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह लिहिले. स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीदवाक्य होते आणि अनाथांना आश्रय मिळावा हे त्यांचे कार्यक्षेत्र होते. 10 मार्च 1897 साली सावित्रीबाईंची निधन झाले.
सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद…!!!

Leave a Comment

error: कॉपी करताय???