TAIT Exam 2025 | शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे ऑनलाइन फॉर्म सुरू, संपूर्ण माहिती पहा

 TAIT Exam 2025: महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे TAIT Shikshak Bharti करिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT Exam 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन मे व जून 2025 महिन्यात करण्यात येणार आहे. TAIT Exam 2025 बाबत संपुर्ण माहिती खालीलप्रमाणे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 TAIT Exam 2025

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT Exam 2025

2022 नंतर पहिल्यांदाच TAIT Exam 2025 घेतली जात आहे. ही परीक्षा मे जून 2025 मध्ये घेतली जाणार असून यासाठी ऑनलाइन फॉर्म मागविण्यात आले आहेत. TAIT Exam Online Form 2025 भरण्याविषयी माहिती खालीलप्रमाणे

TAIT Exam Date 2025 

  • ऑनलाइन फॉर्म भरण्यास सुरू – दि 26.04.2025
  • ऑनलाइन फॉर्म शेवट – दि 10 .05 .2025
  • TAIT Exam Date 2025 – दि  25 मे -05 जून 2025
  • ऑनलाइन फॉर्म लिंक : https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/

TAIT Exam 2025 माध्यम 

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षेचे माध्यम मराठी, हिन्दी, इंग्रजी, उर्दू माध्यम असणार आहे.

TAIT Exam 2025 Syllabus

  •  120 मिनिटाच्या होणाऱ्या या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी  60% अभियोग्यता तर 40% बुद्धिमत्ता यावर आधारित प्रश्न असणार आहेत.
  • 200  प्रश्न हे 200 गुणसाठी असणार असून 120 गुणसाठी अभियोग्यता असेल तर बूद्धिमत्ता या घटकसाठी 80 प्रश्न असणार आहेत.

TAIT Exam 2025 Fees 

  • खुला प्रवर्ग 950/-
  • राखीव प्रवर्ग 850/-
  • शुल्क ना परतावा असेल
  • शुल्क शिवाय बँकेने आकारलेले शुल्क भरणा करावा लागेल.

TAIT Exam Admit Card 2025

परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रे www.mscepune.in संकेतस्थळावर विशिष्ट लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील. त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्यावेळी उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशपत्रावरील सूचनांचे पालन उमेदवाराने करणे बंधनकारक आहे.

परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेन्स यांपैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्र व ओळखपत्र या दोन्ही मधील नावांमध्ये कोणत्याही स्वरूपाची तफावत असू नये. आपण नमुद केलेला आधार नंबर आणि आपल्या आधार नंबर मध्ये तफावत असु नये.

How to Apply for TAIT Exam 2025

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत :

  • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/ या लिंकव्दारे विहित पद्धतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादरकरणे आवश्यक आहे..
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराच्या नावाची नोंद करताना ती आधार कार्डामधील नोंदीप्रमाणे असणे आवश्यकं आहे.
  • परीक्षेच्या वेळी/निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ओळखपत्र म्हणून सदर आधारकार्ड दाखवणे अनिवार्य आहे.
  • ऑनलाईन अर्जामधील नावात व आधारकार्डामधील नावाच्या नोंदीमध्ये कोणतीही तफावत आढळल्यास आपली उमेदवारी रद्द होईल.
  • उमेदवाराने अर्जामध्ये त्याचा मोबाईल क्रमांक व पर्यायी मोबाईल क्रमांक तसेच ईमेल आयडी नमूद करणे आवश्यक आहे. याच मोबाईल क्रमांकावर व ईमेल आयडीवर या कार्यालयाकडून वेळोवेळी आपल्याशी संपर्क साधला जाणार आहे. त्यामुळे सदर मोबईल क्रमांक व ईमेल आयडी नियुक्तीची प्रक्रिया होईपर्यंत कार्यरत राहील याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
  • परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • पासपोर्ट साईज फोटो- उमेदवाराने त्याचा नवीनतम स्कॅन केलेला पासपोर्ट साईज (4.5सेमी X 3.5 सेमी) फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.

आकारमान 200 X 300 pixels

फाईल साईज 20 kb-50 kb

  • स्वाक्षरी – उमेदवाराने त्याची पांढ-या कागदावर काळ्या शाईने स्वाक्षरी करून स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोडकरणे आवश्यक आहे.

आकारमान 140 X 60 pixels

फाईल साईज 10kb-20 kb

  • डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी उमेदवाराने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी (3सेमी X 3 सेमी) पांढऱ्या कागदावर काळ्या निळ्या शाई मध्ये) स्कॅन केलेली प्रतिमा अपलोडकरणेआवश्यक आहे.
  • ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी वापरावी.

आकारमान – 240 X 240 pixels in 200 DPI

फाईल साईज 20 kb – 50 kb

स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र

उमेदवाराने त्याच्या स्व-हस्ताक्षरातील इंग्रजीतील खालील प्रतिज्ञापत्र (10 सेमी X 5 सेमी पांढऱ्या कागदावर काळ्या/निळ्या शाई मध्ये लिहिलेले) अपलोड करणे आवश्यक आहे.

आकारमान 800 X 400 pixels in 200 DPI

फाईल साईज 50 kb 100 kb

स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा नमुना

“I………………(Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”

सदरचे प्रतिज्ञापत्र उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात इंग्रजीमध्येच लिहून त्याची स्कॅन प्रत अपलोडकरणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्र टंकलिखित केलेले, दुसऱ्या व्यक्तीने अथवा अन्य भाषेत लिहिलेले, आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. (लिहू न शकणाऱ्या अंध अथवा अल्पदृष्टी उमेदवारांनी टंकलिखित प्रतिज्ञापत्रावर स्वतःच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा उमटवून सदरच्या प्रतिज्ञापत्राची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.)

 

Leave a Comment

error: कॉपी करताय???