TAIT Hall Ticket 2025 Download : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अर्थात MSCE Pune च्या वतीने मे जून 2025 मध्ये घेतल्या जाणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-2025) परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. TAIT Hall Ticket 2025 Download करण्यासाठीची लिंक खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

TAIT Hall Ticket 2025 Download : शिक्षक अभियोग्यता परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध डाउनलोड करा
TAIT Hall Ticket 2025 Download
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थानाच्या शाळामध्ये PAVITRA या सांगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करण्यासाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-2025) या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे.
TAIT Exam Date & Hall Ticket 2025 Download
- सदर परीक्षा दिनांक 27 मे ते 30 मे 2025 आणि 02 जून ते 05 जून 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहे
TAIT Hall Ticket 2025 Download link
https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/prccla_may25/login.php?appid=058d17379cda3e13915d38f26d6a1788
How to download TAIT Hall Ticket 2025
- Tait Admit card / Hall ticket डाउनलोड करण्यासाठी प्रथम वरील लिंकवर क्लिक करावे.
- त्यानंतर आलेल्या वेबपेज वर आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड / जन्म दिनांक (DD-MM-YY) लिहावा.
- त्याखाली दिलेला कॅप्चा नोंदवून लॉगिन करावे.
- आपल्यासमोर आपले TAIT Call Letter आलेला असेल.
- क्लीक टू प्रिंट वर क्लिक करून आपले TAIT Hall Ticket 2025 Download करावे.
- TAIT Admit card वरील फोटो व माहितीची खात्री करावी.
- TAIT Admit card च्या मागील बाजूवर दिलेल्या सूचनाचे बारकाईने वाचन करावे.
TAIT Hall Ticket 2025 Instructions
1. सदर परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षेच्या स्थळात (Site) प्रवेश करण्यासाठी आपणास दिलेला यूजर आई डी / पासवर्ड नमूद करावा लागेल. संगणकाच्या पडद्यावर दिसणारे तुमचे नांव आणि इतर तपशील बरोबर आहे याची पडताळणी करावी. आपणास उपलब्ध करुन देण्यात आलेला यूजर आई डी / पासवर्ड बाबत गुप्तता पाळणे आवश्यक आहे.
2. कृपया आपल्या सोबत नवीनतम फोटो चिकटवलेले हे प्रवेशपत्र आणि सद्य स्थितीत वैध असे मूळ स्वरूपातील ओळखपत्र आणावे. प्रवेशपत्रावर असणारे नाव (ऑनलाईन नोंदणीच्यावेळी जे उमेदवाराने दिलेले असेल) व ओळखपत्रावरील नमूद असलेल्या नावाशी तंतोतंत जुळावयास हवे. विवाहानंतर ज्या महिला उमेदवारांचे पहिले/मधले/अंतिम नाव बदलले आहे त्यांनी हयाची खास दखल घ्यावी. जर प्रवेश पत्रावरील फोटो/नाव आणि ओळखपत्रावरील फोटोत/नावात कोणताही फरक असेल तर अशा उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही. ज्या उमेदवारांनी आपल्या नावात बदल केला असेल, अशा उमेदवारांनी राजपत्रित अधिसूचना/विवाह प्रमाणपत्र/शपथपत्र उपस्थित केले तरच त्यांना परीक्षेस बसण्यास अनुमती देण्यात येईल.
3. बायोमेट्रिक डाटा (अंगठय़ाचा ठसा) आणि फोटो परीक्षेच्या ठिकाणी परीक्षेपूर्वी घेतला जाईल. बायोमेट्रिक डाटा च्या सत्यता पडताळणीचा अंतिम निर्णय (जुळतो अथवा जुळत नाही) MSCE चा असेल व उमेदवारांना बंधनकारक असेल. बायोमैट्रिक डाटा परीक्षा दरम्यान कधीही घेण्यास/सत्यता पडताळणीस विरोध केल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल. या संदर्भात खालील मुद्दे लक्षात घ्या :
- (क) जर बोटांवर कसलाही थर असेल (शाई/मेहंदी/रंग इत्यादी) तर धुवून टाका आणि परिक्षेच्या दिवसाआधी तो थर संपूर्णपणे गेला आहे याची खात्री करून घ्या.
- (ख) जर बोटांना मळ किंवा धूळ लागली असेल तर बोटांचे ठसे (Finger prints) घेण्याआधी धुवून घ्या आणि हातांची बोटं सुकली आहेत याची खात्री करून घ्या.
- (ग) दोन्ही हातांची बोट सुकलेली आहेत याची खात्री करा आणि जर बोट ओलसर असतील तर प्रत्येक बोट पूसा.
- (घ) ठसा घेतल्या जाणा-या अंगठयाला जर जखम/मार लागला असेल तर त्वरित परिक्षा केंद्रावर संबंधित अधिका-यास कळवा. (या मुद्यांचे पालन करण्यास उमेदवार असमर्थ ठरल्यास परिक्षेस बसु दिले जाणार नाही.)
परीक्षेच्या स्वरुपाबद्दल माहिती/सूचना देणारी पुस्तिका (Information Handout) MSCE च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर माहिती पुस्तिका संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन त्याचे अध्ययन करावे.
पर्यवेक्षकाच्या उपस्थितीत उमेदवारांनी प्रवेशपत्रावर विहित ठिकाणी त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठयाचा ठसा स्पष्टपणे उमटवावा व स्वाक्षरी करावी.
उमेदवाराने सोबत बॉल पॉइंट पेन आणावयाचे आहे. उमेदवार आपल्यासोबत स्वतःचे स्टॅप पॅड आणू शकतात. कच्चे काम करण्यासाठी कागद पुरवला जाईल. परीक्षा संपल्यावर कच्चे काम केलेले कागद प्रवेश पत्रासह पर्यवेक्षकाकडे जमा करावे लागतील.
तुम्हाला वर नमूद केलेल्या ऑनलाईन परिक्षेस बसण्यासाठी तुमचे वय, शैक्षणिक अर्हता, अनुभव इ. ची सत्यता न तपासता अनुमति देण्यात आली आहे. परीक्षेला बसण्यापूर्वी MSCE ची सर्व पात्रता व निकष पूर्ण करतो हे पडताळून बघण्याची जबाबदारी सर्वस्वी उमेदवाराची राहील.
बरोबर आणि चुकीच्या उत्तरांमधील सारखेपणाचे आकृतीबंध उघडकीस आणण्यासाठी तुमच्या प्रतिसादांचे (उत्तरांचे) अन्य उमेदवारांच्या प्रतिसादांबरोबर विश्लेषण केले जाईल. ह्या संदर्भात वापरलेल्या विश्लेषणात्मक पध्दतीमध्ये जर का असे अनुमान निघाले/आढळून आले की, प्रतिसादांचे आदान प्रदान झालेले आहे अणि मिळवलेले गुण हे यथार्थ /स्विकारण्यायोग्य नाहीत, तर तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
हया प्रवेशपत्रावर छापलेल्या वेळेच्या 15 मिनिटे अगोदर उमेदवारास परीक्षास्थानी यावयास हवे. उशीरा येणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेस बसू दिले जाणार नाही.
पुस्तके, वह्या, परिगणक यंत्र (Calculator), पेजर, मोबाईल फोन, स्मार्ट वॉच व इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य इत्यादी प्रकारची साधने/साहित्य परीक्षा केंद्राच्या परीसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास, स्वतःजवळ बाळगण्यास, त्याचा वापर करण्यास अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे. सदर नमूद केलेली अनधिकृत साधन / साहित्य परीक्षेच्यावेळी संबंधित परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच ठेवावे लागेल. अशा साधन / साहित्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील, याची नोंद घ्यावी. कोणताही उमेदवार त्याच्या/तिच्या उत्तरांपासून नक्कल करू शकणार नाही यासाठी उमेदवाराने जागरूक राहावे लागेल.
परीक्षेचा दिनांक / सत्र / परीक्षा स्थान यामधील कोणत्याही बदलाच्या विनंतीची दखल घेतली जाणार नाही.
सदर प्रवेशपत्र म्हणजे MSCE द्वारे अथवा कुठल्याही संस्थेद्वारे नोकरीत प्रवेशाची हमी नव्हे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
उमेदवाराच्या निवडी संदर्भात उमेदवाराकडून किंवा उमेदवाराच्या वतीने होणारा कोणताही प्रचार किंवा राजकीय दबाव अशामुळे उमेदवारास अपात्र समजले जाईल.
कृपया नोंद घ्यावी की कोणताही उमेदवार परीक्षेसाठी एकाच वेळी उपस्थित राहू शकतो/ते. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास उमेदवारांना प्रवेशपत्रामध्ये नमूद केलेल्या दिवशी व वेळी एकदाच परीक्षेस उपस्थित राहण्याचा सल्ला दिला जातो. उर्वरीत सर्व प्रवेशपत्रे उमेदवारांना परत करावी लागतील.
15. परीक्षेच्या व्यवस्थेमध्ये ऐनवेळीस काही व्यत्यय येण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाही. अशा प्रसंगी असा व्यत्यय सुधारण्याचा पूर्णतः प्रयत्न केला जाईल, ज्यामध्ये उमेदवारांना एका जागेहून दुसऱ्या जागेस हलविणे किंवा परीक्षेस विलंब होणे गृहित आहे. पुन्हा परीक्षा घेणे याबाबतचा निर्णय हा परीक्षा घेणाऱ्या संस्थेचा/मंडळाचा अंतिम राहील. उमेदवार पुन्हा परीक्षेसाठी कोणताही दावा करणार नाही. या विलंबीत झालेल्या प्रक्रियेस उमेदवार एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलण्यास तयार नसेल किंवा परीक्षा प्रक्रियेत भाग घेण्यास तयार नसेल अशा उमेदवारांना प्रक्रियेमधुन संपूर्णपणे वगळण्यात येईल.
परीक्षेची सामग्री तथा त्याबद्दलची कोणतीही अन्य माहिती, संपूर्ण किंवा भागामध्ये उघड करणे, प्रकाशित करणे, पुन्हा निर्माण करणे, ट्रांसमिट करणे, जमा करणे किंवा प्रसारण आणि जमा करणारे किंवा परिक्षा केंद्रामध्ये दिला जाणारा कागद घेऊन जाणारे, किंवा परीक्षेच्या सामग्रीचा बेकायदेशीर बाळगण्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
दिव्यांग व्यक्तिंनी (PwBD) त्यांच्या व्यवस्थेविषयीच्या माहितीसाठी परिक्षेच्या 30 मिनिटे आधी चाचणी केंद्र प्रशासकांशी संपर्क साधावा. दिव्यांग उमेदवारांबाबत आवश्यक प्रपत्र-1, प्रपत्र-2 व प्रपत्र 3 परीक्षा केंद्रावरील केंद्रसंचालक किंवा परीक्षा निरीक्षक यांच्याकडे जमा करावीत.
उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी “The Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024” ची नोंद घ्यावी.
Please