UDID Card GR 2024: विविध योजनांच्या लाभ मिळविण्यासाठी वैश्विक ओळखपत्र बंधनकारक

Unique Disability Identity Card GR: केंद्र शासनाच्या धर्तीवर दिव्यांगत्त्वासंदर्भातील सर्व लाभ मिळविण्यासाठी शासनाच्या वतीने वैश्विक ओळखपत्र (Unique Disability Identity Card-UDID Card) बंधनकारक करणेबाबत आज दि  27 जून 2024 रोजी नवीन शासन निर्णय पारित करण्यात आला आहे. त्यामुळे आता UDID Card ला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.  विविध योजनांच्या लाभ मिळविण्यासाठी वैश्विक ओळखपत्र बंधनकारक असले बाबतच्या UDID Card GR 2024 विषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UDID Card GR 2024

विविध योजनांच्या लाभ मिळविण्यासाठी वैश्विक ओळखपत्र बंधनकारक: UDID Card GR 2024

केंद्र / राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या विविध योजना / नोकरी मधील आरक्षण / पदोन्नती / सवलती इ. चा लाभ मिळण्यासाठी राज्यातील दिव्यांगांसाठी वैश्विक ओळखपत्र (UDID Card) अनिवार्य करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत.

UDID Card GR 2024

केंद्र / राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या विविध योजना / सवलती इ.चा लाभ मिळण्यासाठी राज्यातील दिव्यांगांसाठी वैश्विक ओळखपत्र (UDID Card) अनिवार्य करण्यात येत असून ज्या दिव्यांगांकडे कोणतेही दिव्यांगत्त्व प्रमाणपत्र नाही, त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 14 सप्टेंबर, 2018 च्या शासन निर्णयान्वये / भविष्यात वेळोवेळी स्थापन करण्यात आलेल्या / येणाऱ्या वैद्यकीय मंडळामार्फत दिव्यांगत्त्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID Card) प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे.

UDID Card GR 2024: ज्या दिव्यांग व्यक्तींकडे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक14 सप्टेंबर, 2018 चा शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी शासनाने नेमून दिलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले दिव्यांगत्त्व प्रमाणपत्र आहे, त्यांनी उक्त शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय मंडळामार्फत दिव्यांगत्त्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID Card) प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे. वैश्विक ओळखपत्र (UDID Card) प्राप्त करून घेण्यासाठी नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्षात सदर ओळखपत्र प्राप्त होईपर्यंतच्या कालावधीसाठी संबंधित दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्त्वाच्या सवलती / योजना यांचा लाभ घेण्यासाठी त्यांचेकडे असलेले दिव्यांगत्त्व प्रमाणपत्रासोबत वैश्विक ओळखपत्रासाठीचा नाव नोंदणी क्रमांक (Enrolment Number) सादर करणे अनिवार्य राहील.

ज्या दिव्यांग व्यक्तींकडे शासनाने वेळोवेळी नेमून दिलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले दिव्यांगत्व प्रमाणपत्र नसेल, तथापि त्यांचेकडे शासकीय रुग्णालयांमधून दिलेले अन्य वैद्यकीय/दिव्यांगत्त्व प्रमाणपत्र असेल व त्या आधारे जर ते दिव्यांगांसाठीच्या सवलती / योजना यांचा लाभ घेत असतील, तर अशा दिव्यांग व्यक्तींना सदर शासन परिपत्रकाच्या दिनांकापासून एका वर्षाच्या मुदतीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 14 सप्टेंबर, 2018 च्या शासन निर्णयानुसार / भविष्यात वेळोवेळी स्थापन करण्यात आलेल्या / येणाऱ्या वैद्यकीय मंडळाकडून दिव्यांगत्त्व प्रमाणपत्र / वैश्विक ओळखपत्र (UDID Card) प्राप्त करून घेणे अनिवार्य राहील. जे दिव्यांग व्यक्ती उक्त मुदतीनंतरसुद्धा सदर प्रमाणपत्र प्राप्त करून घेणार नाहीत, ते दिव्यांगांसाठीच्या सवलती / योजना इ. लाभ मिळण्यास पात्र राहणार नाहीत.

तरी सर्व मंत्रालयीन विभाग / त्यांचे प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व विभाग / कार्यालये त्याचप्रमाणे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांना सूचित करण्यात येते की, त्यांनी उक्त सूचना त्यांचे नियंत्रणाखालील संबंधित दिव्यांग कर्मचाऱ्यांना द्याव्यात, तसेच त्यांचेकडून सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन होत असल्याबाबत खातरजमा करण्यात यावी.

अशा सूचना वरील शासन निर्णय नुसार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्येक दिव्याग व्यक्तीना UDID Card काढणे बंधनकारक झाले आहे. UDID Card Link https://www.swavlambancard.gov.in/ या लिंकवर आपण आपली नोंदणी करू शकता.

2 thoughts on “UDID Card GR 2024: विविध योजनांच्या लाभ मिळविण्यासाठी वैश्विक ओळखपत्र बंधनकारक”

  1. खुप छान माहिती पण UDID Card हे लवकर प्राप्त होत नाही.ते एक महिन्याच्या आत मिळावे.

    Reply

Leave a Comment

error: कॉपी करताय???