Savitrimai Phule Shikshak Puraskar 2025-26: राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार ऑनलाइन नोंदणी सुरू

Savitrimai Phule Shikshak Puraskar 2025-26: क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2025-26 करीता आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत नुकतेच परिपत्रक करण्यात आले आहे. यासाठी दि.16.07.2025 च्या शासन निर्णयाचा संदर्भ देण्यात आला आहे. लिंक आणि शासन निर्णय खालीलप्रमाणे देण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Savitrimai Phule Shikshak Puraskar 2025-26

शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज अणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते.

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार लिंक 

संदर्भीय शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी हे पुरस्कार वस्तुनिष्ठ निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत. आवेदने सादर करू इच्छिणाऱ्या राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांमधील इच्छुक शिक्षकांनी पुढे नमूद केल्यानुसार वेबलिंकवर https://forms.gle/EgZ266AqNDxFJDZW8 या लिंकवर आपली आवेदने दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 10:00 वाजलेपासून दिनांक 10 जुलै, 2026 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत सादर करावीत.

Savitrimai Phule Shikshak Puraskar 2025-26

Savitrimai Phule Shikshak Puraskar 2025-26 Timetable 

सोबत पुरस्काराचे वेळापत्रक अपडेट केले जाणार आहे. त्याप्रमाणे आपल्या स्तरावरील कालमर्यादित कार्यबाही होणे आवश्यक आहे. सदर वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत आपणांस संचालनालय स्तरावरुन अवगत करण्यात येईल.

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2025-26 वेळापत्रक

शासन निर्णय पहा 

  • पुरस्कार बाबत प्रसिध्दी करणे
  • पुरस्कार बाबतऑनलाईन नोंदणी कालावधी
  • संचालनालय स्तरावरील काम
  • जिल्हास्तरावरून प्रत्यक्ष शाळा भेट
  • जिल्हास्तरावरील मुलाखत/पडताळणी करुन शिफारशी संचालनालयाकडे सादर करणे
  • राज्यस्तरावरील मुलाखत/पडताळणी
  • राज्य शिक्षक पुरस्कार संबंधित संचालनालय स्तरावरील काम पूर्ण करणे.
  • राज्य निवड समिती सदस्यांची अंतिम बैठक आयोजित करणे
  • निवड समितीने अंतिम शिफारस केलेल्या शिक्षकांच्या यादीसह माहिती शासनास सादर करणे
  • शासन निर्णय निर्गमित
  • शिक्षक पुरस्कार समारंभ

सदरील बाबत आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून देखील स्वतंत्रपणे सूचना/लेखी आदेश निर्गमित करुन सर्व संबंधित शिक्षकांपर्यंत माहिती पोहचेल असे पाहावे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जात असल्याची माहिती शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.

Leave a Comment

error: कॉपी करताय???