Kendrapramukh Bharti Exam 2025: अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेली केंद्र प्रमुख भरती २०२५ या परीक्षेच्या तारखेबाबत अनेक पात्र शिक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला लागली होती. आता प्रतीक्षा संपली ! केंद्रप्रमुख (समूह साधन केंद्र समन्वयक) परीक्षेची तारीख जाहीर करण्याबाबत राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने Kendrapramukh Bharti Exam 2025 बाबत प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे.
Kendrapramukh Bharti Exam 2025: प्रतीक्षा संपली ! केंद्रप्रमुख (समूह साधन केंद्र समन्वयक) परीक्षेची तारीख जाहीर

Kendrapramukh Bharti Exam 2025
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2025 महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण2022/प्र.क्र. 81/टीएनटी 1, दि. 15/09/2022व शासन निर्णय दि. 29/08/2025 अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2025” या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे.
Kendrapramukh Bharti Exam 2025 Date
- राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आलेली परिपत्रकानुसार Kendrapramukh Bharti Exam 2025 दि. 32/02/2026 व 04/02/2026 या कालावधीत प्रत्येकी तीन सत्रामध्ये आयोजन करण्यात येत आहे.
केंद्रप्रमुख भरती 2025 Admit Card
परीक्षेविषयीच्या परीपत्रकानुसार Kendra Pramukh Exam Admit Card ऑनलाईन पद्धतीने परीक्षार्थी/उमेदवारांच्या लॉगिनमध्ये लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. खालील अधिकृत लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल
https://ibpsreg.ibps.in/mscepoct25/
तरी परीक्षार्थी/उमेदवारांनी वेळोवेळी www.mscepune.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.