RTE Lottery Date 2026: RTE 25% अंतर्गत म्हणजेच शिक्षण हक्क कायद्यांतर्गत वंचित व दुर्बल घटकासाठी असणाऱ्या 25% राखीव जागा वरील मोफत प्रवेशाची RTE Lottery Date 2026 बाबत शासनाच्या वतीने नुकतेच परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
RTE Lottery Date 2026: प्रतीक्षा संपली!!! आरटीई मोफत प्रवेशाच्या लॉटरीची तारीख जाहीर
RTE Lottery Date 2026
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (RTE 2009) नुसार दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण राज्यात ऑनलाइन राबविण्यात येते. त्यानुसार 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी RTE 25% अंतर्गत MAHARASHTRA RTE ADMISSION LOTTRY लाइव पद्धतीने काढण्यात येणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 मधील कलम 12 (सी) (1) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळांमध्ये आरटीई 25 टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे.
RTE Lottery Date
त्यानुसार सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत (लॉटरी) सोमवार, दि. 06/04/2026 रोजी सकाळी 11:00 वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथे आयुक्त (शिक्षण) यांच्या हस्ते होणार आहे. सदर सोडतीचे थेट प्रक्षेपण यु-ट्युबची लिंकद्वारे सर्वांना पाहता येणार आहे.
RTE वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा
RTE थेट प्रक्षेपण यु-ट्युबची लिंक
- आरटीई 25टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया असून या प्रक्रियेत लॉटरी पध्दतीने सोडत काढून प्रवेश पात्र लाभार्थी यांची शाळानिहाय यादी घोषित केली जाते.
- यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप केला जात नाही.
- पालकांना बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभने दिले जात असतील तर अशा प्रलोभनांना कृपया बळी पडू नये असे अवाहन शिक्षण संचालक (प्राथमिक) यांचेमार्फत करण्यात येत आहे.
RTE Lottery Date Letter 2026

अशा प्रकारचे गैरप्रकार आपल्या निदर्शनास आल्यास याबाबत संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / प्रशासन अधिकारी मनपा/ नपा, संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे (depmah2@gmail.com), आयुक्त (शिक्षण), पुणे (educommoffice@gmail.com) यांचेकडे ई-मेलद्वारे अथवा समक्ष आपली तक्रार पुराव्यासह नोंदविण्यात यावी.
तथापि, असा कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर नियमानुसार फौजदार स्वरुपाची कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.