Free Tablet Yojana 2026 Maharashtra: JEE / NEET /MHT-CET-2026-28 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरीता शासनाची एक महत्वाची योजना सुरु करण्यात आली आहे. ज्यात खालील संवर्गातील पात्र विद्यार्थ्यांसाठी Free Tablet Yojana 2026 लागू करण्यात आली आहे. खालीलप्रमाणे Free Tablet Yojana 2026 चा तपशील देण्यात आला आहे.
Free Tablet Yojana 2026 Maharashtra: फॉर्म भरा; महाज्योती मोफत टॅबलेट योजनेचे फॉर्म सुरु
Free Tablet Yojana 2026 Maharashtra
महाराष्ट्र राज्यातील Free Tablet Yojana 2026 या योजनेसाठी खालील संवर्गातील विद्यार्थी पात्र आहेत.
- इतर मागास वर्ग (OBC)
- विमुक्त जाती (VJ A)
- भटक्या जमाती (NT-B)
- भटक्या जमाती (NT-C)
- भटक्या जमाती (NT-D)
- विशेष मागास प्रवर्ग (SBC)
या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत JEE/NEET/MHT-CET Batch- 2026-28 च्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यासाठी वरील प्रवर्गातील विद्याथ्यांकडून महाराष्ट्रातील Free Tablet Yojana 2026 ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. सदर योजनेअंतर्गत महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण व टॅब देण्यात येईल.
Free Tablet Yojana 2026 Maharashtra पात्रता
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा असावी.
- विद्यार्थी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा असावी तसेच विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा असावी.
- सन-2026 मध्ये इयत्ता 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरीता पात्र राहतील.
- विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
- विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.
Free Tablet Yojana 2026 Maharashtra कागदपत्रेः-
- आधार कार्ड (पुढील व मागील बाजुसहित)
- रहिवासी दाखला (Domicile Certificate)
- जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
- वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Valid Non-Creamy Layer Certificate)
- इयत्ता 10 वी ची गुणपत्रिका
- दिव्यांग असल्यास दाखला
- अनाथ असल्यास दाखला
How to Apply for Free Tablet Yojana 2026
- प्रथम महाज्योतीच्या खालील लिंकवर क्लिक करावे.
- Mahajyoti tab registration 2026 फॉर्म भरण्यासाठी लिंक www.mahajyoti.org.in
- फॉर्म भरण्यासाठी लिंक https://neet.mahajyoti.org.in/2026/mobile_verification.php
- अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन जोडावे.

समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे:-
- प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.
- दिव्यांगाकरीता 4% जागा आरक्षित आहे.
अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.
Free Tablet Yojana 2026 Maharashtra अटी:-
- अर्ज करण्याची अंतिम दि. 30/05/2026 आहे
- पोस्टाने किंवा ई-मेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 10 वी मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% व शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% गुण असणे अनिवार्य आहे.
- सदर प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात इयत्ता 11 वी ला विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा पुरावा व बोनाफाईड सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक राहिल, जे विद्यार्थी सदरचे कागदपत्रे सादर करणार नाही, अशा विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल.
- कोणत्याही माध्यमातुन व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल.
- अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावाः संपर्क क्र 0712-2870120/21