Anganwadi Bharti 2025 Maharashtra: राज्यामध्ये विविध जिल्हयात अंगणवाडी भरती सुरू; जाहिराती पहा

Anganwadi Bharti 2025 Maharashtra: राज्यामध्ये महिला व बालविकास विभागांतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसच्या तब्बल 19 हजार च्या जवळपास जागा भरण्यात येणार असल्याचे नुकतेच महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केल्या आहेत. त्यानुसार Anganwadi Bharti 2025 या प्रक्रियेला महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी लागणारी पात्रता माहिती नसल्यामुळे अनेक पात्र  उमेदवार  या भरती प्रक्रियेपासून वंचित राहतात म्हणून याठिकाणी Anganwadi Sevika आणि Madatnis Bharti  या पदाबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Anganwadi Bharti 2025 Maharashtra: राज्यामध्ये विविध जिल्हयात अंगणवाडी भरती सुरू; जाहिराती पहा

Anganwadi Bharti 2025 Maharashtra

Anganwadi Bharti 2025 Maharashtra

एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्हयात Anganwadi Bharti केली जाते. या पदाच्या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जात नाही.  रिक्त जागेवर केवळ शैक्षणिक पात्रता आणि पदासाठीच्या आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या महिला उमेदवाराना सरळ नियुक्ती दिली जाते.

Anganwadi Bharti 2025 शैक्षणिक पात्रता 

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी उतीर्ण असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर पात्र महिला उमेदवार ज्या ठिकाणी राहते तेथील मातृभाषा येणे आवश्यक आहे. उच्च शिक्षण घेतले असल्यास त्यास गुण दिले जाते त्यानुसार मेरिट यादी तयार केले जाते.

Anganwadi Bharti 2025 Maharashtra वयाची अट 

पात्र उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष आणि कमाल 35 वर्ष या दरम्यान असणे आवश्यक आहे. विधवा उमेदवारांसाठी 5 वर्षे वयामध्ये सवलत देण्यात आली आहे. वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (TC), किंवा दहावीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

Anganwadi Bharti 2025 वेतन 

अर्थसंकल्प 2023 मध्ये जाहीर केल्यानुसार खालील प्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका याना मानधन खालीलप्रमाणे राहील त्याशिवाय इतर कोणतेही भत्ते दिली जाणार नाहीत.

  • अंगणवाडी सेविका मानधन 10,000 रु,
  • मिनी अंगणवाडी सेविका मानधन 7,500 रु.
  • अंगणवाडीस मदतनीस मानधन  5,500 रुपये

Anganwadi Bharti 2025 फॉर्म कसा भरावा ?

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीचे फॉर्म पूर्णतः ऑफलाईन भरावयाचा असतो. यासाठी भरती जाहीर झाल्यानंतर तालुका अंगणवाडी ऑफिसमध्ये फॉर्म दिला जातो. खालीलप्रमाणे काही जिल्ह्याची भरती प्रक्रिया सुरू आहे.

जिल्हानिहाय Anganwadi Bharti 2025

Leave a Comment

error: कॉपी करताय???