Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024: अर्ज करा; ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना मिळवा 60000 पर्यन्त लाभ

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024: शासनाच्या वतीने विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यातील एक महत्वाची योजना म्हणून Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 ओळखली जाते. महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ चालवली जाते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024: अर्ज करा; ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना मिळवा 60000 पर्यन्त लाभ

dnyanjyoti-Savitribai-Phule-Aadhar-Yojana-2024

योजने विषयी संपूर्ण माहिती आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

काय आहे Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 ?

महाराष्ट्र शासनाने राज्यातील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इ. मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयामध्ये व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक, पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या व वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश मिळाला नसल्यास ‘Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024‘ लागू करण्यास मान्यता दिली आहे.

पात्र विद्यार्थ्यांना Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024मध्ये  किती लाभ मिळणार

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 या योजनेमध्ये विद्यार्थ्यांस भोजन, निवास या सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी तसेच निर्वाह भत्त्यासाठी रु. 38000 ते रु. 60000 पर्यंत रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येते.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 निकष/पात्रता

  • सदरील योजना ही इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू आहे.
  • या योजनेमध्ये विद्यार्थ्यांस इयत्ता 12 वी मध्ये किमान 60 टक्के गुण आवश्यक आहेत
  • विद्यार्थी हा वसतिगृह प्रवेशास पात्र असावा
  • विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा
  • पालकाचे उत्पन्न रु. 2.50 लाख पेक्षा जास्त नसावे,
  • विद्यार्थ्यांचे कमाल वय 30 वर्षांपेक्षा अधिक नसावे,
  • विद्यार्थी हा कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा,
  • महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती किमान 75 टक्के असावी आदी प्रमुख निकष / पात्रता आहे.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 साठी कोणती कागदपत्रे लागणार

  1. जातीचा दाखला,
  2. उत्पनाचा दाखला,
  3. 12 वी चे गुणपत्रक, बोनाफाईड
  4. बँक खाते आधार संलग्न केल्याचा पुरावा
  5. बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत,
  6. विद्यार्थी दिव्यांग असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र
  7. महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा, आधार कार्डविद्यार्थी भाडयाने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी)
  8. स्वयंघोषणापत्र (दिलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबत)
  9. कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र
  10. भाडयाने राहत असल्याबाबतचे भाडे चिट्ठी व भाडे करारपत्र / करारनामा

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 अर्ज सादर करावयाची मुदत व अर्ज कुठे सादर करावयाचा आहे ?

  • ठाणे  विभागासाठी उच्च शिक्षणाच्या द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज दि. 15 जुलै 2024 पर्यंत तसेच प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दि. 20 ऑगस्ट 2024 पर्यंत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ४ था मजला, दत्तवाडी, खारेगावं, कळवा, जि. ठाणे. ४००६०५ येथे आवश्यक कागदपत्रांस सादर करावेत.
  • इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यानी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन फॉर्म भरवेत आणि सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय येथे कागदपत्रे जमा करावी
  • सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय लिंक https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/
  • ऑनलाइन फॉर्म लिंक https://mahadbt.maharashtra.gov.in/

8 thoughts on “Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024: अर्ज करा; ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना मिळवा 60000 पर्यन्त लाभ”

Leave a Comment

error: कॉपी करताय???