Jijau Maa Saheb marathi mahiti : महाराष्ट्राच्या इतिहासातील अनन्य साधारण स्थान असणाऱ्या Maa Jijau यांची आज जन्म सोहळा आहे. खालीलप्रमाणे Jijau Maa Saheb यांचा अल्प परिचय व कार्यें यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. शालेय शिक्षणवर सविस्तर वाचा

Jijau Maa Saheb Marathi Mahiti 2025 | जिजाऊ माँ साहेब जीवन व कार्य मराठी माहिती
Jijau Maa Saheb marathi mahiti | जिजाऊ माँ साहेब जीवन व कार्य मराठी माहिती
12 जानेवारी राजमाता जिजाऊंचा जन्मदिवस. हा दिवस राज्यभरातील शाळा महाविद्यालय बरोबरच इतर सर्व विभागामधून वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आदर्श माता राजमाता जिजाउंच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने याठिकाणी Jijau Maa Saheb यांच्या विषयी Marathi Mahiti देण्यात आली आहे
जिजाऊ माँ साहेब अल्प परिचय (Maa Jijau Saheb)
Jijau Maa Saheb या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री व शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी. महाराष्ट्राच्या इतिहासातील त्यांचे स्थान अनन्य साधारण आहे; कारण त्या केवळ स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर दीनदुबळ्यांच्या, रयतेच्या मातोश्री होत्या. त्यांचे मूळ घराणे सिंदखेडच्या जाधवराव देशमुखांचे, सुखवस्तू शूर जहागीरदारांचे होते.
Jijau Maa Saheb marathi mahiti
जिजाबाईंचा जन्म दि. 12 जानेवारी 1598 रोजी झाला. जिजाबाई शहाजीराजांच्या पुण्याच्या जहागिरीत इ. स. 1636 पूर्वीच रहावयास आल्या. पुण्याच्या मुक्कामात त्यांनी बाल शिवाजींना लष्करी शिक्षणाबरोबर रामायण, महाभारत, भागवत आदींतील कथा सांगितल्या. विशेषतः शांतिपर्वातील राजकीय विचार आणि महाभारत युद्ध यांतील कथा सांगितल्या.
जिजाबाईंनी विश्वासू सरदारांच्या मदतीने पुणे जहागिरीची उत्तम व्यवस्था लावली. पुण्यात लालमहाल प्रासाद बांधला. शहाजींच्या राजकारणाचे, धोरणांचे त्यांना ज्ञान होते. पुणे प्रांताच्या राज्यकारभारातील बारीकसारीक गोष्टींत लक्ष घालून त्यांनी अनेक वेळा न्यायनिवाडे केले. राजगडावर त्यांचा मुक्काम असताना खंडोबाच्या जेजुरी येथील मार्तंडभैरव मंदिराच्या गुरवपणाविषयी तंटा निर्माण झाला. त्याचा निवाडा जिजाबाईंनी केला होता. त्यावर मातोश्री साहेब (जिजाबाईंनी) जे आश्वासन दिले आहे, तसेच माझेही आश्वासन राहील, असे दि. 13 जुलै 1653 च्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात.
Jijau Maa Saheb
शिवाजी महाराज मातोश्रींच्या निर्णयास विरोध करत नसत. जिजाबाई महाराजांच्या राज्यकारभारात अखेरपर्यंत (1674) जातीने लक्ष घालीत. राज्यकारभारात शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत त्या राज्याची सर्व जबाबदारी सांभाळत असत. छत्रपती शिवाजी महाराज आग्राभेटीवर गेले असता त्यांनी सर्व कारभार जिजाबाईंच्या हाती सुपुर्द केला होता आणि त्यांना सहकार्य करण्याचे अभिवचन विश्वासू कारभाऱ्यांकडून घेतले होते.
जिजाऊ माँ साहेब -निधन
जिजाबाई स्वाभिमानी, धाडसी, करारी, दृढनिश्चयी आणि स्वतंत्र वृत्तीच्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी म्हणजेच दिनांक 17 जून, 1674 रोजी त्यांचे पाचाड (रायगड) येथे निधन झाले.
स्वामी विवेकानंद – अल्प परिचय
स्वामी विविकानंद यांचा जन्म दि. 12 जानेवारी 1863 रोजी झाला. एकोणिसाव्या शतकात बंगालमध्ये होऊन गेलेले एक जगद्विख्यात संन्यासी आणि थोर विचारवंत. मूळ नाव वीरेश्वर. रूढ झालेले नाव नरेंद्रनाथ. नरेंद्रांवर बालवयात आईकडून धार्मिक, तर मोठा झाल्यावर वडिलांकडून आधुनिक बुद्धिवादी विचारसरणीचे संस्कार झाले.
स्वामी विवेकानंद – शिक्षण
मेट्रपॉलिटन इन्स्टिट्यूट, प्रेसिडेन्सी कॉलेज आणि जनरल असेंब्लीज इन्स्टिट्यूशन येथे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण होऊन नरेंद्र 1884 साली बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
महाविद्यालयीन जीवनात त्यांनी जगाचा इतिहास आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञान यांचा विशेष अभ्यास केला. मिल आणि स्पेन्सर यांच्या ग्रंथांचा खोल परिणाम त्यांच्या मनावर झाला. बंकिमचंद्र चतर्जीच्या आनंदमठ (1882) ह्या कादंबरीमुळे देशभक्तीची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली.
स्वामी विवेकानंद – प्रभाव
स्वामी विवेकानंदावर सर्वांत अधिक परिणाम झाला तो केशवचंद्र सेन आणि शिवनाथ शास्त्रीयांच्या ब्राह्मो समाजाचा. त्या समाजाचे रितसर सदस्यत्व नरेंद्राने स्वीकारले. मूर्तिपूजेला विरोध आणि सामाजिक सुधारणांचे महत्त्व हे विचार तेथून उचलले. नरेंद्रांच्या ठायी आरंभापासून संन्यासाची ओढ होती. रामकृष्ण परमहंस (1836-86) यांच्या भेटीनंतर तिला खरी जाग आली.
स्वामी विवेकानंद – शिकागो सर्वधर्मपरिषद
कन्याकुमारीजवळच्या समुद्रात असलेल्या एका शिलाखंडावर ध्यानमग्न अवस्थेत बसलेले असताना या समाजाला जाग आणण्याचा संकल्प त्यांनी केला. त्यानंतर अमेरिकेत जाऊन शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्मपरिषदेस हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहिले. 11 सप्टेंबर 1993 या दिवशी त्यांनी केलेल्या पाच मिनिटांच्या पहिल्या भाषणाने सारी सभा मंत्रमुग्ध झाली आणि सतरा दिवस चाललेल्या त्या परिषदेवर सर्वांत अधिक प्रभाव त्यांचा पडला. वेदान्ताचे छोटेछोटे वर्ग घेतले, लंडन आणि न्यूयॉर्क येथे वेदान्त सोसायट्यांची स्थापना केली.
डॉ. राइट, इंगरसोल, विल्यम जेम्स, माक्स म्यूलर, डॉ. पॉल डायसेन असे तत्त्वज्ञही प्रभावित होऊन गेले. जे. जे. गुडविन, सेव्हियर पतिपत्नी, ओली बुल, सिस्टर ख्रिस्तिन, जोसेफाइन मॅक्लाउड अशा पाश्चात्त्य शिष्यांनी आपली जीवने विवेकानंदांच्या चरणी वाहिली. मिस मार्गारेट नोबल किंवा भगिनी निवेदिताया त्यांत आग्रगण्य होत. 1897 च्या जानेवारीत भारतामध्ये परत आल्यावर कोलंबोपासून अलमोड्यापर्यंत विवेकानंदांचे भव्य स्वागत झाले.
स्वामी विवेकानंद – समाधी
भारताच्या आधुनिक युगाशी मेळ घालणारा व भविष्यातील समन्वयशील मानवसंस्कृतीची दिशा दाखवणारा असा श्रेष्ठ महापुरुष दुसरा दाखविता येत नाही. 1899 च्या जूनमध्ये विवेकानंद पुन्हा यूरोप अमेरिकेत गेले, ते 1900 डिसेंबरमध्ये परत आले. त्याआधी दीड दोन वर्षांपासून अविश्रांत परिश्रमामुळे त्यांचे शरीर थकत चालले होते. 04 जुलै 1902 या दिवशी रात्री त्यांनी बेलूर मठात महासमाधी घेतली.
स्रोत सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ