Maha FYJC Admissions 2025 |अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर: या तारखेपासून प्रत्यक्ष नोंदणी करता येणार

Maha FYJC Admissions 2025: इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी पहिल्या फेरीचे शासनाकडून नुकतेच वेळापत्रक जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार FYJC Admissions 2025 साठी  राज्यातील 20 लाखांपेक्षा जास्त जागांवर प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maha FYJC Admissions 2025

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्याना शासनाच्या आधिकृत संकेतस्थळ https://mahafyjcadmissions.in/ वर नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे. साधारणपणे इयत्ता अकरावीमध्ये (Maha FYJC Admissions) प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रे लागणार आहेत.

FYJC Admissions Website 

TAIT 2025 संपूर्ण माहिती 

TAIT Exam 2025 | शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे ऑनलाइन फॉर्म सुरू, संपूर्ण माहिती पहा

Documents For Maha FYJC Admissions 2025

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रे तयार ठेवण्यात यावी-

  • इयत्ता दहावी /समकक्ष परीक्षेचे गुणपत्रक
  • इयत्ता दहावी शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत
  • विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • EWS पात्रता प्रमाणपत्र
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त प्रमाणपत्र
  • आजी माजी सैनिक पाल्य प्रमाणपत्र
  • आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू विद्यार्थी यांच्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी किंवा विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे प्रमाणपत्र
  • अनाथ विद्यार्थ्यांनी विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग यांचे प्रमाणपत्र.
  • परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित देशातील भारतीय दूतावासाची सही व शिक्का असलेले दाखला व गुणपत्रक.
  • हस्तांतरण आदेश आणि सामीलीकरण पत्र (Transfer order and joining letter)
    (राज्य शासन/केंद्र सरकार/ खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बदली झालेल्या पालकांसाठी)

Maha FYJC Admissions 2025 Timetable 

maha fyjc admissions 2025.

Maha FYJC Admissions 2025

राज्यातील विभागनिहाय प्रवेशासाठी उपलब्ध जागा खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

maha-FYJC-Admissions-2025

राज्याची एकूण प्रवेश क्षमताः 20,43,254

  • विज्ञानः 8,52,206
  • वाणिज्यः 5,40,312
  • कला: 6,50,682

महत्त्वाच्या सूचनाः

जे विद्यार्थी CAP किंवा कोटामार्फत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करतात, त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली समजली जाईल. एकदा उमेदवाराने संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास, त्याचा प्रवेश निश्चित मानण्यात येईल.

  • नोंदणी शुल्क डिजिटल माध्यमातूनच स्वीकारला जाईल.
  • सर्व संबंधितांनी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
  • व्यवस्थापन / इन-हाऊस / अल्पसंख्याक कोट्यांतील प्रवेश 6 जून 2025  पासून सुरू होतील.
  1. अधिक माहितीसाठी संपर्क:
  2. वेबसाईट: www.mahafyjcadmissions.in
  3. ई-मेल: support@mahafyjcadmissions.in

Leave a Comment

error: कॉपी करताय???