Mahajyoti Tab Registration 2025-27: अर्ज करा; महाज्योती मोफत टॅब्लेट योजनेंतर्गत दहावी उतीर्ण विद्यार्थ्याना मिळणार टॅब्लेट

Mahajyoti Tab Registration 2025-27: महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर च्या वतीने दरवर्षी खालील पात्र विद्यार्थ्याना मोफत टॅब्लेट योजनेंतर्गत दहावी उतीर्ण विद्यार्थ्याना टॅब्लेट दिले जाते. या योजनेची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. फॉर्म भरण्यासाठी लिंक शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahajyoti Tab Registration 2025-27

  • महाज्योती नागपूरच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती- विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत JEE/NEET/MHT-CET Batch- 2025-27 च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
  • सदर योजनेअंतर्गत महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येईल.
  • इयत्ता10 वी मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थांना किमान 60 % व शहरी भागातील विद्यार्थांना किमान 70 % गुण असणे आवश्यक आहे.

Eligibility for Mahajyoti Tab ragistration 2025-27

योजनेच्या लाभासाठी पात्रताः-

  • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा असावी.
  • विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील -असावा/असावी.
  • विद्यार्थी नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/असावी.
  • सन-2025 मध्ये इयत्ता 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरीता पात्र राहतील.
  • विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. या बाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे, जोडणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.

Documents for Mahajyoti Tab Registration 2025-27

अर्ज करण्याकरीता आवश्यक कागदपत्रेः-

  1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजुसहित)
  2. रहिवासी दाखला (Domicile Certificate)
  3. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
  4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Valid Non-Creamy Layer Certificate)
  5. इयत्ता 10 वी ची गुणपत्रिका
  6. इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) व प्रवेश पावती
  7. दिव्यांग असल्यास दाखला
  8. अनाथ असल्यास दाखला

mahajyoti.org.in registration

Mahajyoti-Tab-Registration-2025-27

समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :-

  • प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.
  • दिव्यांगाकरीता 4% जागा आरक्षित आहे.
  • अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.

How to Apply Mahajyoti Tab Registration 2025-27

अर्ज कसा करावा :-

  • महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for JEE/NEET/MHT-CET- Batch-2025-27 Training” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
  • Mahajyoti Tab Registration 2025-27 साठी येथे  क्लिक करा 
  • अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन जोडावे.

अटी व शर्ती :-

  • अर्ज करण्याची अंतिम दि.31/05/2025 आहे.
  • पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, Mahajyoti Nagpur यांचे राहतील.
  • कोणत्याही माध्यमातुन व अंतीम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल.
  • अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावाः Mahajyoti Contact Number  0712-2870120/21

53 thoughts on “Mahajyoti Tab Registration 2025-27: अर्ज करा; महाज्योती मोफत टॅब्लेट योजनेंतर्गत दहावी उतीर्ण विद्यार्थ्याना मिळणार टॅब्लेट”

    • Majhi mulgi 2024 madhe 10 vi uttirn jhali ahe Ata ti 12 vi science shikat ahe ti nit chi tayyari karat ahe
      Mahajyoti tab 2025-27 registration application karu shakta yet ka?

      Reply
  1. Me JEE che क्लासेस लावत आहे ऑनलाइन क्लासेस साठी मला टॅबलेट ची गरज आहे

    Reply
  2. Hi. I am badal atmaram rathod and am in class 11th and I got 74.60 % in class 10 th and now I am doing online classes of jee due to some family issues and I don’t have a own mobile or tob that why I am feeling this form and if I get tab it will help me in study. Thanks you

    Reply
  3. Sir or mam I need a tablet for my upcoming education I don’t afford it by me so I request to you please give me and support me I will do best my self and I also support other students who cannot afford that ..

    Reply

Leave a Comment

error: कॉपी करताय???