NMMS Exam Answer key 2025 | एन. एम एम एस उत्तरसूची जाहीर, इथे पहा संपूर्ण माहिती

NMMS Exam Answer key 2025 | राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) रविवार दि. 28 डिसेंबर, 2025 रोजी घेण्यात आली होती. सदर NMMS Exam 2025 ची अंतरिम (संभाव्य) उत्तरसूची जाहीर करण्यात आली असून एनएमएमएस परीक्षा विषयी संपुर्ण माहिती व वेबसाईट खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

nmms-exam-answer-key-2025

NMMS Exam Answer key 2025

परीक्षा परिषद अर्थात MSCE च्या वतीने आज दिनांक प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले असून त्याद्वारे खालीलप्रमाणे माहिती देण्यात आली आहे. (MAHATET Answer Key साठी इथे पहा )

NMMS Exam Answer key Link

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दि. 28 डिसेंबर, 2025 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतरिम (संभाव्य) उत्तरसूची परिषदेच्या https://www.mscepune.in/ https://2026.mscenmms.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

  • या उत्तरसूचीवर प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नांवर आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात करता येईल.
  • सदर ऑनलाईन निवेदन शाळांकरीता त्यांच्या लॉगिनमध्ये Dashboard वर व पालकांसाठी https://2026.mscenmms.in/ या संकेतस्थळावर Interim Answer key (अंतरिम उत्तरसूची) या हेडिंगखाली स्वतंत्ररित्या उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
  • त्रुटी / आक्षेपबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दि. 09 जानेवारी 2026 ते दि. 16 जानेवारी 2026 रोजी पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
  • दिनांक 16 जानेवारी 2026 विहित मुदती नंतर त्रुटी आक्षेपबाबतचे निवेदन स्विकारले जाणार नाही.
  • उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) प्राप्त त्रुटी /आक्षेपाबाबतच्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही.
  • उपरोक्तनुसार विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.
  • विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल असे कळविण्यात आले आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. 8 वी साठी परीक्षा रविवार दि. 28 डिसेंबर, 2026 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आली. या परीक्षेची अंतरिम (संभाव्य) उत्तरसूची परिषदेच्या https://www.mscepune.in/https://2026.mscenmms.in/ या संकेतस्थळावर दि. 09 जानेवारी, 2026 पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कृपया महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे, आकाशवाणी व दूरदर्शनवरुन या परीक्षेच्या सोबतच्या प्रसिध्दीपत्रकास विनामूल्य प्रसिध्दी देण्यात यावी, अशी विनंती आहे.

5 thoughts on “NMMS Exam Answer key 2025 | एन. एम एम एस उत्तरसूची जाहीर, इथे पहा संपूर्ण माहिती”

Leave a Comment

error: कॉपी करताय???