Pariksha Pe Charcha 2025: परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची तारीख जाहीर; इथे पहा लाईव्ह

Pariksha Pe Charcha 2025: मा. पंतप्रधान महोदय यांच्यासमवेत “परीक्षा पे चर्चा 2025 ” या आठव्या आवृती असलेल्या या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत केंद्रशासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या वतीने आणि राज्य शासनाच्या वतीने परिपत्रक जारी करण्यात आले आहे. Pariksha Pe Charcha 2025 हा कार्यक्रम कसा पाहता येईल कुठे पाहता येईल याविषयी सविस्तर पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pariksha Pe Charcha 2025: परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची तारीख जाहीर; इथे पहा लाईव्ह

Pariksha Pe Charcha 2025 कार्यवाही 

राज्य शासनाच्या वतीने काढलेल्या परिपत्रकानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),  शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, शिक्षणाधिकारी, प्राथमिक/माध्य. जि.प. (सर्व), शिक्षण निरिक्षक (पश्चिम, दक्षिण, उत्तर), मुंबई,  प्रशासन अधिकारी/शिक्षणप्रमुख/शिक्षणाधिकारी मनपा/नपा, (सर्व) यांना कळविण्यात आले आहे की मा. पंतप्रधान महोदय हे “परीक्षा पे चर्चा- 8” या कार्याक्रमांतर्गत इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतचे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे समवेत आभासी माध्यमाद्वारे (Virtual Mode) दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता नवी दिल्ली येथून संवाद साधणार आहेत.

कुठे पाहता येणार Pariksha Pe Charcha 2025 कार्यक्रम 

  • परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे प्रसारण खालील माध्यमातून होणार आहे.
  • सदर कार्याक्रमाचे DD National, DD News, DD India या दूरदर्शन वाहिनीवरून प्रत्यक्ष प्रक्षेपण देशभर करण्यात येणार आहे.
  • सदर कार्यक्रम रेडिओद्वारे All India Redio Medium Wave, All India FM Channel वर सुध्दा प्रसारित करण्यात येणार आहे.
  • सदर कार्यक्रम http://www.youtube.com/watch?v=G5UhdwmEEls / या वेब साईटवर पाहता येईल,
  • सदर कार्यक्रम शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे यु-ट्युब वाहिनी किंवा स्वंयप्रभा वाहीनीवर पाहता येईल.
  • सदर कार्यक्रमाचे फेसबुकवर सुध्दा प्रत्यक्ष प्रक्षेपण करण्यात येणार आहे..

“परीक्षा पे चर्चा-८” हा कार्यक्रम दाखविण्यासाठी / ऐकण्यासाठी शाळास्तरावरील नियोजन व कार्यवाही खालील प्रमाणे करावी :-

  • शाळेतील दूरसंच, वीजपुरवठा या बाबी सुरू असल्याची खात्री करावी.
  • शाळेतील दूरसंच किंवा वीजपुरवठा उपलब्द नसल्यास किंवा सुरू होण्यास अडचणी असल्यास संगणक/लॅपटॉप/मोबाईल इ. चा आवश्यकतेनुसार वापर करावा.
  • अतिदुर्गम भागात जिथे दूरदर्शन पाहण्याची सुविधा शक्य नाही, अशा ठिकाणी रेडिओची व्यवस्था करून मुलांना मा. पंतप्रधान यांचा संवाद ऐकवता येईल.
  • सदर कार्यक्रम बघत असतानाचे विदयार्थ्यांचे फोटो घ्यावेत.
  • शिक्षक, पालक, अधिकारी यांना सदर कार्यक्रमाचे फोटो सामाज माध्यमावर पोस्ट करण्यासाठी प्रात्साहन दयावेत.
  • शाळाप्रमुख/मुख्याध्यापक/शिक्षक यापैकी एकाने परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थी बघत असतानाचे किमान 1 व जास्तीत जास्त5 फोटो https://www.mygov.in/ या वेबसाईटवर अपलोड करता येतील. एका फोटो किमान साईज 2mb. असावी.
  • प्रत्येक शाळेत या दिवशी हा र्काक्रम विदयार्थ्यांना दाखविणेसाठी नियोजन करण्याबाबत कळविण्यात यावे.

    जिल्हा, तालुकास्तरीय अधिकारी यांनी या दिवशी शाळा भेटीचे नियोजन करावे.

  • तरी मा. पंतप्रधान महोदय यांचा “परीक्षा पे चर्चा 2025” हा कार्यक्रम आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमधील, इयत्ता 6 वी ते 12 वी च्या विदयार्थ्यांना पाहण्यास/ऐकण्यास उपलब्ध होण्यासाठी योग्य ती कार्यवाही आपल्या स्तरावरून तात्काळ करण्यात यावी. सहभागी मुलांचा विभागनिहाय अहवाल कार्यक्रम संपल्यानंतर 02 तासात सादर करावा.

Pariksha Pe Charcha 2024 मध्ये झालेला कार्यक्रम पहा

 

18 thoughts on “Pariksha Pe Charcha 2025: परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची तारीख जाहीर; इथे पहा लाईव्ह”

Leave a Comment

error: कॉपी करताय???