RTE Online Form 2025 Last Date: राज्यात यंदा आरटीई मोफत प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीची नोंदणी प्रक्रिया आता मुदतवाढीनंतर अंतिम टप्यात आहे. शेवटचे दोन दिवस उरले असताना तब्बल तीन लाख च्या जवळपास आरटीई ऑनलाइन फॉर्म नोंदणी झाली आहे. खालीलप्रमाणे RTE Online Form Registration Link आणि जिल्हा निहाय नोंदणी झालेली संख्या दिली आहे.
RTE Online Form 2025 Last Date: आरटीई मोफत प्रवेशासाठी यंदा तीनपट फॉर्म नोंदणी; जिल्हानिहाय आकडेवारी पहा
RTE Online Form 2025 Last Date: आरटीई मोफत प्रवेशासाठी यंदा तीनपट फॉर्म नोंदणी; जिल्हानिहाय आकडेवारी पहा
आरटीई ऑनलाइन फॉर्म नोंदणीसाठी देण्यात आलेली मुदत आत शेवटचे दोन दिवस आहेत परंतु शनिवार आणि रविवार मुळे भाडे करारनामा करण्यासाठी शासकीय सुट्ट्या येत असल्यामुळे अडचणी निर्माण झालेल्या आहेत.
- RTE Portal लिंक : https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new
- पालकांसाठी RTE फॉर्म लिंक : https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login
- RTE प्रवेशासाठी वयाची अट इथे पहा
- RTE प्रवेशासाठी कागदपत्रे पहा
RTE Online Form 2025 Last Date
आर टी ई ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2025 देण्यात आली आहे.
जिल्हानिहाय RTE Maharashtra Online Form 2025
RTE Maharashtra Online Form 2025 साठी जिल्हा निहाय नोंदणी खालीलप्रमाणे झालेली आहे.
01 फेब्रुवारी पर्यन्त राज्यामध्ये 02 लाख 93 हजार पेक्षा जास्त पालकानी ऑनलाइन अर्ज भरला आहे. त्यामध्ये जिल्हयानुसार फॉर्म भरलेली संख्या खालीलप्रमाणे आहे.
खालीलप्रमाणे जिल्हानिहाय फॉर्म नोंदणी संख्या देण्यात आली आहे.
- अहिल्या नगर – 8579
- अकोला – 5725
- अमरावती – 7735
- भंडारा – 2612
- बीड – 5446
- बुलढाणा – 6281
- चंद्रपूर – 3878
- छ संभाजीनगर – 15889
- धाराशिव – 2332
- धुळे – 3573
- गडचिरोली – 887
- गोंदिया – 3132
- हिंगोली – 2391
- जळगाव – 9311
- जालना – 5358
- कोल्हापूर – 4549
- लातूर – 6127
- मुंबई – 12755
- मुंबई – 12755
- नागपूर – 29225
- नांदेड – 9253
- नंदुरबार – 991
- नाशिक – 16743
- पालघर – 4981
- परभणी – 3347
- पुणे – 59591
- रायगड – 9450
- रत्नागिरी – 887
- सांगली – 3085
- सातारा – 4614
- सिंधुदुर्ग – 161
- सोलापूर – 5865
- ठाणे – 24815
- वर्धा – 4817
- वाशीम – 2737
- यवतमाळ – 5939
एकूण – 293136
RTE Online Form 2025 Last Date
वारंवार विचारली जाणारी प्रश्न FAQ
- दिव्यांग विद्यार्थाना फॉर्म भरता येतो का ?
उत्तर: होय, त्यासाठी किमान 40% दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- RTE ऑनलाइन भरलेला फॉर्म चुकलं असेल तर दुरुस्ती करता येते का ?
उत्तर : होय, दोन पातळीवर दुरुस्त करता येते. पालकांनी फॉर्म फायनल संबमीट केला नसल्यास पूर्ण डिलिट करून नव्याने फॉर्म भरता येतो. अंतिम सबमीट केला असल्यास जिल्हा कार्यालयातून डिलिट करता येतो.
- ऑनलाइन भरलेला आरटीई फॉर्म जिल्हा स्तरावरून दुरुस्ती कसा करावा ?
उत्तर: फॉर्म भरताना झालेली चूक लक्षात आल्यानंतर योग्य त्या कारणसह शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे अर्ज करावा. शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या लॉगिनवरून दुरुस्ती साठी प्रक्रिया केली जाते. पुनः आहे तो फॉर्म भरता येतो .
- एका बालकाचे एकापेक्षा जास्त फॉर्म भरता येतील का?
उत्तर : कोणत्याही पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे एकापेक्षा जास्त अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही सर्व बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.
- निवासाचा पुरावा म्हणून गॅस बुक जोडता येईल का?
उत्तर : नाही, 2025-26 या वर्षासाठी निवासी पुरावा महणून गॅस बुक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे निवासाचा पुरावा म्हणून गॅस बुक जोडता येणार नाही.
- निवासाचा पुरावा म्हणून बँक पास बुक जोडता येईल का?
उत्तर : होय , 2025-26 या वर्षासाठी निवासी पुरावा म्हणून बँक पास बूक जोडता येईल. परंतु केवळ राष्ट्रीयकृत बँकेचा पासबुक निवासाचा पुरावा म्हणून जोडता येणार आहे.
- आरटीई फॉर्म भरताना किती शाळा निवडता येतात ?
उत्तर : आरटीई फॉर्म भरताना 10 शाळा निवडता येतात.
- आरटीई फॉर्म भरला म्हणजे नबर लागतोच का?
उत्तर : नाही, आरटीई फॉर्म भरला म्हणजे नंबर लागतोच असे नाही, त्यासाठी लॉटरी प्रक्रियेतून निवड केली जाते. ही सर्व प्रक्रिया संगणक आधारित असते
- अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास काय करावे?
उत्तर: अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास लॉगिन बॉक्स खालीदिलेल्या forgot password यावर क्लिक करून पासवर्ड रिसेट करावा