Savitrimai Phule Shikshak Puraskarv 2024-25: क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2024-25 करीता आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत नुकतेच परिपत्रक करण्यात आले आहे. यासाठी दि.16.07.2025 च्या शासन निर्णयाचा संदर्भ देण्यात आला आहे. लिंक आणि शासन निर्णय खालीलप्रमाणे देण्यात आला आहे.

Savitrimai Phule Shikshak Puraskar 2024-25: राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराची ऑनलाइन नोंदणी सुरू
Savitrimai Phule Shikshak Puraskar 2024-25
शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज अणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते.
राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार लिंक
संदर्भीय शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी हे पुरस्कार वस्तुनिष्ठ निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत. आवेदने सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकांनी पुढे नमूद केल्यानुसार वेबलिंकवर https://forms.gle/ixTDiuvgqqEwVuaA7 या लिंकवर आपली आवेदने दिनांक 18 जुलै, 2025 रोजी सकाळी 10:00 वाजलेपासून दिनांक 31 जुलै, 2025 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत सादर करावीत.
Savitrimai Phule Shikshak Puraskar 2024-25 Time Table
सोबत पुरस्काराचे वेळापत्रक जोडले आहे. त्याप्रमाणे आपल्या स्तरावरील कालमर्यादित कार्यबाही होणे आवश्यक आहे. सदर वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत आपणांस संचालनालय स्तरावरुन अवगत करण्यात येईल.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2024-25 वेळापत्रक
- दि. 17.07.2025 प्रसिध्दी करणे
- दि. 18.07 ते दि. 31.07.2025: ऑनलाईन नोंदणी कालावधी
- दि. 01 ते 03.08. 2025 संचालनालय स्तरावरील काम
- दि. 04 ते 08. 08. 2025 जिल्हास्तरावरून प्रत्यक्ष शाळा भेट
- दि. 11 ते 14. 08. 2025: जिल्हास्तरावरील मुलाखत/पडताळणी करुन शिफारशी संचालनालयाकडे सादर करणे
- दि. 18 ते 21. 08. 2025 राज्यस्तरावरील मुलाखत/पडताळणी
- दि. 22 ते 24. 08. 2025 : राज्य शिक्षक पुरस्कार संबंधित संचालनालय स्तरावरील काम पूर्ण करणे.
- दि. 25.08.2025 राज्य निवड समिती सदस्यांची अंतिम बैठक आयोजित करणे
- दि. 28.08.2025 निवड समितीने अंतिम शिफारस केलेल्या शिक्षकांच्या यादीसह माहिती शासनास सादर करणे
- दि. 01.09.2025: शासन निर्णय निर्गमित
- दि. 05.09.2025 : शिक्षक पुरस्कार समारंभ
सदरील बाबत आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून देखील स्वतंत्रपणे सूचना/लेखी आदेश निर्गमित करुन सर्व संबंधित शिक्षकांपर्यंत माहिती पोहचेल असे पाहावे.